शेर ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे.

नांग्या शेर (यूफोर्बिया तिरूकाली) : [शेर, निवळ, नेवाळी शेर, कांडया शेर हिं. सेहुंद, कोनपाल, सैंड क. मोंडुकळ्ळी गु. परदेशी शेर (थोर) सं. त्रिकंटक, वजद्रूम, गंदेरी इं. मिल्क बुश, इंडियन ट्री स्पर्ज लॅ. यूफोर्बिया तिरूकाली कुल-यूफोर्बिएसी]. फुलझाडांपैकी [→ वनस्पति, आवृतबीज उपविभाग ]. हा सु. ६ मी. उंचीचा, बिनकाटेरी, लहान वृक्ष असून त्याचे मूलस्थान आफ्रिका आहे. भारतात बहुतेक सर्वत्र व इतरत्र रूक्ष प्रदेशात तो आढळतो. नांग्या शेर कुंपण म्हणून लावतात. याच्या प्रजातीत सु. २,००० जाती असून भारतात त्यांपैकी सु. ६० जाती आढळतात.

Thumb
शेराचे झाड
Thumb
शेर किंवा पेंसिलचे झाड

या शेराची साल भुरी किंवा हिरवट रंगाची व भेगाळ असून फांद्या पसरट कांड्यासारख्या हिरव्या व बहुधा पर्णहीन असल्यामुळे यास ‘ कांड्या शेर ’ (नांग्या शेर) हे नाव पडले असावे. सर्वच भाग गुळगुळीत असून त्यात पांढरा ⇨ चीक असतो. याला प्रथम लहान, अरूंद व लांबट पाने येतात परंतु लवकरच ती गळून पडतात. फुले एकलिंगी व अपूर्ण असतात. ऑगस्ट-सप्टेंबरात लहान फांद्यांमध्ये पेल्यासारखे (चषकरूप) फुलोरे [→ पुष्पबंध] येतात त्यात स्त्री-पुष्पे अधिक असतात (प्रत्येक नर-पुष्प हे एक केसरदल प्रत्येक स्त्री-पुष्प हे देठावरचे तीन किंजदलांचे मंडल). फुलोरा व फुले यांची संरचना व इतर लक्षणे ⇨ यूफोर्बिएसी अगर एरंड कुलात वर्णन केल्याप्रमाणे असतात. शेराच्या झाडांपासून लाल रंग मिळतो. शेराचा चीक अंगाला लागल्यास कातडी लाल होते व फोड येतात. हा चीक रेचक व कफनाशक असून दातदुखी, कानदुखी, दमा, कावीळ, उपदंश, संधिवात इत्यादींवर उपयुक्त आहे. पोटात घेतल्यास तो दाहक आणि वांतिकारक ठरतो. चामखीळ, संधिवात, तंत्रिका शूल व दातदुखी यांवर बाहेरून तिळाच्या तेलातून हा चीक लावतात. कोवळ्या फांद्या व मुळे यांचा काढा जठरशूलावर गुणकारी ठरतो. ही वनस्पती मत्स्यविष असून उंदीर-घुशींनाही ती विषारी असते. बिहारमध्ये आंब्याच्या लहान रोपट्यांना प्रखर सूर्यप्रकाशापासून संरक्षण देण्याकरिता ती वापरतात. लाकूड हलके, कठीण व बळकट असते. ते किडीपासून सुरक्षित असून तराफे, खेळणी व कोळसा करण्यास वापरतात. कोळसा बंदुकीच्या दारूस उपयुक्त असतो. फांद्यांचे फाटे लावून नवीन लागवड करतात.

यूफोर्बिएसी कुलातील या वनस्पतीचे नांग्या शेर (Euphorbia tirucalli) व विलायती शेर (Euphorbia tithymaloides) असे दोन प्रकार आहेत.

संदर्भ

Wikiwand in your browser!

Seamless Wikipedia browsing. On steroids.

Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.

Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.