आंतरराष्ट्रीय प्रमाणित पुस्तक क्रमांक (इंग्रजी: International Standard Book Number - इंटरनॅशनल स्टॅंडर्ड बुक नंबर) ज्याला आयएसबीएन म्हणूनही ओळखतात, हा एखादे पुस्तक ओळखण्यासाठी त्याला दिला जाणारा एक अद्वितीय, व्यावसायिक, अंकीय क्रमांक आहे. या क्रमांकाद्वारे जगातल्या जवळपास कोणत्याही पुस्तकाचा शोध घेतला जाऊ शकतो व त्याबद्दल माहिती मिळवली जाऊ शकते. सुरुवातीला ही पद्धत फक्त अमेरिका, युरोप आणि जपानमध्ये प्रचलित होती. पण आता ती संपूर्ण जगात पसरली आहे. आयएसबीएन क्रमांकामध्ये आधी १० अंक असायचे, पण २००७ नंतर त्यात १३ अंक असतात.

१० आणि १३ अंकांच्या आयएसबीएन च्या वेगवेगळ्या भागांनी पुस्तकाबद्दल वेगवेगळी माहिती मिळते.

इतिहास

ब्रिटनचे एक प्रसिद्ध प्रकाशक डब्ल्यू. एच. स्मिथ यांनी डब्लिन, आयर्लंडच्या ट्रिनिटी कॉलेजचे सेवानिवृत्त प्राध्यापक गॉर्डन फोस्टर यांच्याकडून त्यांच्या पुस्तकांना एक क्रमांक द्यायची पद्धत बनवून घेतली. त्यांनी ९ अंकांची प्रणाली बनवली, जिचे नाव "स्टॅंडर्ड बुक नंबरिंग" (एसबीएन म्हणजे प्रमाणित पुस्तक क्रमांक) असे ठेवण्यात आले.[1] १९७० मध्ये आंतरराष्ट्रीय मानकीकरण संघटनेने (ISO) या प्रणालीवर अाधारित नवीन १० अंकीय प्रणालीची घोषणा घोषणापत्र संख्या ISO २१०८ मध्ये केली.[2] त्यालाच आता आयएसबीएन म्हणतात. २००७ मध्ये १० अंकीय प्रणाली बंद करून १३ अंकीय प्रणाली सुरू करण्यात आली. पण अजूनही काही ठिकाणी १० अंकीय आयएसबीएन दिसतात.

संदर्भ

Wikiwand in your browser!

Seamless Wikipedia browsing. On steroids.

Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.

Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.