ऑक्टोबर २१ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील २९४ वा किंवा लीप वर्षात २९५ वा दिवस असतो.
ठळक घटना आणि घडामोडी
सोळावे शतक
- १५२० - फर्डिनांड मॅगेलन मॅगेलनच्या सामुद्रधुनीत पोचला.
एकोणिसावे शतक
- १८२४ - जोसेफ ऍस्पडिनने पोर्टलॅंड सिमेंटचा पेटंट घेतला.
- १८६७ - मॅनिफेस्ट डेस्टिनी-मेडिसिन लॉजचा करार - स्थानिक अमेरिकन लोकांना पश्चिम ओक्लाहोमामध्ये स्थलांतर करणे भाग पाडले गेले.
- १८७९ - थॉमस अल्वा एडिसनने पहिल्यांदा कार्बन तंतू वापरून विजेचा दिवा चालवला. साडेतेरा तास चालल्यावर हा दिवा विझला.
- १८९५ - जपानने फॉर्मोसाचे प्रजासत्ताक जिंकले.
विसावे शतक
- १९४३ - नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या नेतृत्वात आझाद हिंद सेनेचे प्रामुख्याने भारताचे पहिले स्वतंत्र सरकार स्थापन केले.
- १९४४ - दुसरे महायुद्ध-लेयटे गल्फची लढाई - एच.एम.ए.एस. ऑस्ट्रेलिया वर जपानी विमानांनी आत्मघातकी हल्ला चढवला.
- १९४५ - फ्रांसमध्ये स्त्रीयांना पहिल्यांदाच मतदानाची संधी.
- १९५९ - अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष ड्वाइट डी. आयझेनहॉवरने वटहुकुम काढून वर्नर फोन ब्रॉन व त्याच्या सहकाऱ्यांना अमेरिकन सैन्याच्या आधिपत्याखालून काढून घेउन नासामध्ये काम करण्यास फर्मावले.
- १९६६ - वेल्सच्या ऍबरफॅन गावावर कोळश्याच्या खाणीतून आलेल्या ढिगाऱ्याखाली अनेक बालकांसह १४४ ठार.
- १९६९ - सोमालियात लश्करी उढाव. सियाद बारे सत्तेवर.
- १९८३ - निर्वात जागेतून १/२९,९७,९२,४५८ सेकंदात प्रकाशाने पार पाडलेल्या अंतर ही मीटरची व्याख्या ठरवली गेली.
- १९९४ - सोलमधील सेओंग्सू पूल कोसळून ३२ ठार.
एकविसावे शतक
जन्म
- १६६० - जॉर्ज अर्न्स्ट स्टाल, जर्मन रसायनशास्त्रज्ञ.
- १६७५ - हिगाशीयामा, जपानी सम्राट.
- १६८७ - निकोलस बर्नोली, स्विस गणितज्ञ.
- १७१२ - सर जेम्स स्ट्युअर्ट, ब्रिटिश अर्थशास्त्रज्ञ.
- १७९० - आल्फोन्स द लामार्टीन, फ्रेंच कवी, लेखक, राजकारणी.
- १८२१ - एदुआर्द हाइन, जर्मन गणितज्ञ.
- १८३३ - आल्फ्रेड नोबेल, स्विडीश रसायनशास्त्रज्ञ.
- १८५१ - जॉर्ज उलियेट, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १८८७ - कृष्ण सिंग बिहारचे पहिले मुख्यमंत्री भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे नेते
- १९१४ - मार्टिन गार्डनर, अमेरिकन गणितज्ञ.
- १९१६ - राम मराठे, मराठी संगीतकार.
- १९१७ - राम फाटक, मराठी संगीतकार, गायक.
- १९२३ - सद्गुरू श्री वामनराव पै, जीवन विद्या मिशनचे संस्थापक.
- १९२३ - फारुख अब्दुल्ला, नॅशनल कॉन्फरन्सचे नेते आणि
जम्मू आणि काश्मीरचे माजी मुख्यमंत्री
- १९४० - जॉफ बॉयकॉट, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १९४४ - कुलभूषण खरबंदा हिंदी चित्रपट अभिनेते
- १९४९ - बिन्यामिन नेतान्याहू, इस्रायेलचा नववा पंतप्रधान.
- १९५२ - ट्रेव्हर चॅपल, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
- १९५७ - वॉल्फगांग केटर्ल, जर्मन भौतिकशास्त्रज्ञ.
- १९५९ - केन वाटानाबे, जपानी अभिनेता.
- १९६९ - सलमान विन हमाद बिन इसा अल खलिफा, बहरैनचा युवराज.
- १९७१ - डेमियन मार्टिन, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
मृत्यू
- १२६६ - बिर्जर यार्ल, स्टॉकहोमचा स्थापक.
- १४२२ - चार्ल्स सहावा, फ्रांसचा राजा.
- १५०० - गो-त्सुचिमिकाडो, जपानी सम्राट.
- १५०५ - पॉल स्क्रिप्टोरिस, जर्मन गणितज्ञ.
- १६८७ - सर एडमंड वॉलर, इंग्लिश लेखक.
- १७७७ - सॅम्युएल फूट, इंग्लिश नाटककार व अभिनेता.
- १८०५ - होरेशियो नेल्सन, इंग्लिश दर्यासारंग.
- १८७२ - जाक बॅबिने, फ्रेंच भौतिकशास्त्रज्ञ.
- १८७३ - योहान सेबास्टियन वेलहावेन, नॉर्वेजियन कवी.
- १९९८ - अजित, हिदी चित्रपट अभिनेता.
- २०१२ - यश चोप्रा, भारतीय चित्रपट निर्माते हिंदी चित्रपट दिग्दर्शक.
- २०१५ - सुहास विठ्ठल मापुस्कर पद्मश्री पुरस्कारविजेते मराठी समाजसेवक.
प्रतिवार्षिक पालन
- सफरचंद दिन - युनायटेड किंग्डम.
- अनिवासी चिनी दिन - चीन.
बाह्य दुवे
- बीबीसी न्यूजवर ऑक्टोबर २१ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)
ऑक्टोबर १९ - ऑक्टोबर २० - ऑक्टोबर २१ - ऑक्टोबर २२ - ऑक्टोबर २३ (ऑक्टोबर महिना)
Wikiwand in your browser!
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.
Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.