From Wikipedia, the free encyclopedia
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ हे महाराष्ट्रातील नांदेड येथे स्थित असून त्याची स्थापना १७ सप्टेंबर १९९४ रोजी झाली.[ संदर्भ हवा ] हे विद्यापीठ साधारणपणे स्वारातीम (SRTMU) या संक्षिप्त नावाने ओळखले जाते. या विद्यापीठाचे नाव मराठवाडा मुक्ती संग्रामाचे जनक स्वामी रामानंद तीर्थ यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ठेवण्यात आले आहे.
SRT | |
ब्रीदवाक्य | सा विद्याया विमुक्तये |
---|---|
मराठीमध्ये अर्थ | सर्वांना शिक्षण मोफत आहे |
Type | शासकीय |
स्थापना | १७ सप्टेंबर १९९४ |
विद्यार्थी | २४,२४७ (२०२०)[ संदर्भ हवा ] |
संकेतस्थळ | http://www.srtmun.ac.in |
हैद्राबाद मुक्तिसंग्राम (स्वातंत्र्य सैनिकांच्या मौखिक नोंदी) हा विद्यापीठाने प्रकाशित केलेला महत्त्वाचा संपादित ग्रंथ आहे.[ संदर्भ हवा ]
या विद्यापीठाच्या परिक्षेत्रात नांदेड, लातूर, परभणी व हिंगोली जिल्हा हे दक्षिण मराठवाड्यातील ४ जिल्हे येतात.
नांदेड नगराच्या दक्षिणेस २० किमी अंतरावर ५९५ एकर (२.४१ चौरस किमी) एवढ्या क्षेत्रात मुख्य विद्यापीठ संकुल आहे व पेठ, ता.जि. लातूर येथे २२ एकर (८९,००० चौरस मिटर) परिसरात उपकेंद्र आहे.[ संदर्भ हवा ][१] विद्यापीठास 'विद्यापीठ अनुदान आयोग' व 'राष्ट्रीय मुल्यांकन व अधिस्विकृती परिषद' यांची मान्यता मिळाली आहे.[ संदर्भ हवा ]
डॉ. मनोहर चासकर हे विद्यमान कुलगुरू आहेत. कुलसचिव, महाविद्यालय व विद्यापीठ मंडळाचे संचालक आणि परिक्षा नियंत्रक हे विद्यापीठाचे तीन प्रमुख अधिकारी असतात.[ संदर्भ हवा ][२]
क्रीडा व शारीरिक शिक्षण आणि विद्यार्थी कल्याणासाठी विद्यापीठात संचालक आहेत. राष्ट्रीय सेवा योजना अधिकारीसुद्धा आहेत.[ संदर्भ हवा ]
विद्यापीठात दुरस्थशिक्षण विभाग आहे, जो नांदेड, लातूर, हिंगोली व परभणी येथील ५९ मान्यताप्राप्त केंद्रात मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू, इतिहास, राज्यशास्त्र, समाजशास्त्र, अर्थशास्त्र व लोक प्रशासन या विषयांत पदव्यूत्तर अभ्यासक्रम चालवतो.[ संदर्भ हवा ]
विद्यापीठ कला, विज्ञान, वाणिज्य, शिक्षण, व्यवसाय प्रशासन व औषधनिर्माणशास्त्र या शाखांतील २७ पदव्यूत्तर पाठ्यक्रम चालवते. तसेच ते ८ पदव्यूत्तर संशोधन पाठ्यक्रमसुद्धा चालवते.[ संदर्भ हवा ]
मराठवाडा विद्यापीठ उपकेंद्रातून निर्मिती
अ.क्र. | नाव | कार्यकाळ |
---|---|---|
१ | जनार्दन वाघमारे | डिसेंबर १९९४-डिसेंबर २००६ |
२ | कॅप्टन व्ही. व्ही. ढोबळे (प्रभारी) | |
३ | शेषेराव सुर्यवंशी | |
४ | मधुकर गायकवाड (प्रभारी) | |
५ | धनंजय येडेकर | |
६ | के.एम. कुलकर्णी (प्रभारी) | |
७ | प्रा. सर्जेराव निमसे | २००८-१३ |
८ | दिलीप उके (प्रभारी) | २०१३ |
९ | पंडित विद्यासागर | २०१३-२०१८ |
१० | डॉ.दिलीपराव म्हैसेकर ( प्रभारी ) | २०१८-२०१८ |
११ | उद्धव भोसले | २०१८-२०२३ |
१२ | प्रकाश महानवर (प्रभारी) | २०२३-२४ |
१३ | मनोहर चासकर | २०२४ ते आजतागायत |
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.
Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.