Remove ads
दिनांक From Wikipedia, the free encyclopedia
सौदी अरेबियन एरलाइन्स किंवा सौदिया (अरबी: الخطوط الجوية العربية السعودية) ही सौदी अरेबिया देशाची राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी आहे. १९४५ साली स्थापन झालेल्या सौदियाचे मुख्यालय जेद्दा येथे असून तिच्या ताफ्यामध्ये १५३ विमाने आहेत.[१] सध्या सौदियामार्फत जगातील ८० शहरांमध्ये प्रवासी व माल वाहतूकसेवा पुरवली जाते.
| ||||
स्थापना | १९४५ | |||
---|---|---|---|---|
हब |
रियाध - किंग खालिद आंतरराष्ट्रीय विमानतळ दम्मम - किंग फहाद आंतरराष्ट्रीय विमानतळ जेद्दाह - किंग अब्दुलअझीझ आंतरराष्ट्रीय विमानतळ मदिना | |||
फ्रिक्वेंट फ्लायर | अल-फुर्सान | |||
अलायन्स | स्कायटीम | |||
विमान संख्या | १५३ | |||
मुख्यालय | जेद्दाह, सौदी अरेबिया | |||
संकेतस्थळ | http://www.saudiairlines.com |
सौदिया अरेबियन एर लाइन ही स्वतंत्र झेंडाधारी मुख्य ठिकाण जेद्दा असणारी विमान सेवा आहे. ही एर लाइन मुख्यतः जेद्दा-किंग अब्दुलजीज अंतरराष्ट्रीय विमानातळावरून (JED) चालविली जाते. रियाध-किंग खालिद आंतरराष्ट्रीय विमानतळ (RUH), आणि दमन-किंग फाद आंतरराष्ट्रीय विमानतळ (DMM) ही याची इतर मुख्य केद्रे आहेत. कंपनीने २८ नोव्हेंबर १९९९ रोजी न्यू दमन हा विमानतळ व्यावसायिक तत्त्वावर चालविण्यासाठी घेतला.. त्यानंतर देहरान आंतरराष्ट्रीय विमानतळ हा लष्करी विमानतळ म्हणून उपयोगात आणला. मध्य पूर्व देशांत मोठ्या प्रमाणात महसूल प्राप्त होण्याच्या दृष्टीने एमिरेटस आणि कतार एरवेझ नंतर या एरवेझचा तिसरा क्रमांक लागतो. मध्य पूर्व, आफ्रिका, आशिया, युरोप आणि उत्तर अमेरिका या देशांचा समावेश असणाऱ्या १२० ठिकाणी ही एर लाइन देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय नियमित सेवा देणारी एर लाइन आहे.[२] रमझान आणि हज यात्रेच्या वेळी सरकारसाठी देशी आणि आंतरराष्ट्रीय विमान सेवा पुरवली जाते.. सौदिया एर लाइन ही अरब एर प्रवासी संघटनेची सभासद आहे. या एरलाइनने स्काय टीम एर लाइन्स बरोबर २९ मे २०१२ रोजी हितैक्य साधले..[३]
जेव्हा सन १९४५ मध्ये अमेरिकेचे अध्यक्ष रुझवेल्ट यांनी डग्लस DC-3 हे विमान भेट म्हणून किंग अब्दुल अजीज इब्न सौद यांना दिले, तेव्हा या राष्ट्राचा नागरी विमान सेवा क्रमाक्रमाने चालू करण्याच्या विकासाचा मार्ग खुला झाला. सप्टेंबर १९४५मध्ये स्वतंत्र झेंडाधारी सौदियाची सौदी अरेबियन एर लाइन अस्तित्वात आली. ही सौदी सरकारचे पूर्ण मालकीची लष्करी मंत्रालयाच्या अधिकारात ट्रान्स वर्ल्ड एर लाइन्सशी व्यवस्थापकीय कराराने चालणारी विमान सेवा झाली.
सुरुवातीपासूनच शहराला अतिशय जवळ असणारे जेद्दा-कांडार विमानतळ झेंडाधारी केंद्र झाले आहे. पॅलेस्टाइन येथील लिड्डा (सध्याच्या इस्राइलचे लोड – बेन-गुरियन आंतरराष्ट्रीय विमानतळ) ब्रिटिश मन डेट हे हजच्या यात्रेकरूंना तत्पर सेवा देत आहे. ह्या एर लाइनने जेद्दा–रियाध-होफुफ-देहरान या मार्गावर DC 3 ही पांच विमाने मार्च १९४७मध्ये चालू केली त्याचबरोबर जेद्दा आणि कैरो ही सेवाही त्याच महिन्यात चालू केली. सन १९४८ च्या सुरुवातीला दमास्कस आणि बैरूत विमान सेवा सुरू झाली. सन १९४८नंतर सन २०११ पर्यंत या विमान कंपनीने विमान सेवा देण्यात खूपच प्रगती केली. सन २०१२ च्या शेवटी शेवटी सौदिया विमान कंपनीने ६४ विमाने विकत घेतली. त्यांत ५ बोईंग आणि ५८ एर बसचा समावेश होता. सन २०१५मध्ये आणखी ८ बोईंग 787-9 विमाने सामील होणार होती.
सौदियाची इतर वेगवेगळी विमाने खालील प्रकारची आहेत.
कांही लष्करी सी-130 विमानेसुद्धा सौदिया रंगाने रंगवून रोयल सौदी एर फोर्सच्या मदतीने त्यांचा उड्डाणासाठी वापर केला जातो.
या विमान कंपनीने एरोफ्लोट, एर युरोप, एर फ्रान्स, अलितालिया, गल्फ एर, केन्या एरवेझ, कोरियन एर, कुवेत एरवेझ, मिडल ईस्ट एरलाइन्स, श्रीलंकन एर लाइन्स यांच्याशी विमान सेवेचा कायदेशीर करार केलेला आहे.[४]
विमान | वापरात | ऑर्डर | प्रवासी क्षमता | |||
---|---|---|---|---|---|---|
F | C | Y | एकूण | |||
एरबस ए-३२०-२०० | ३५ | — | ० | १२ | १३२ | १४४ |
० | २० | ९६ | ११६ | |||
एरबस ए-३२१-२०० | १५ | — | ० | २० | १४५ | १६५ |
एरबस ए-३३०-२०० | ३ | ० | ||||
एरबस ए-३३०-३०० | १६ | ० | ३६ | २६२ | २९८ | |
बोईंग ७४७ | १६ | — | ० | ३२ | ४०२ | ४३४ |
बोईंग ७७७-२०० ईआर | २३ | — | २४ | ३८ | १७० | २३२ |
० | १४ | ३२७ | ३४१ | |||
बोईंग ७७७-३०० ईआर | १२ | ८ | २४ | ३६ | २४५ | ३०५ |
० | ३० | ३८३ | ४१३ | |||
बोईंग ७८७ | — | १६ | ठरायचे आहे | |||
एम्ब्रेयर ई-१७० | १५ | — | ० | ६ | ६० | ६६ |
सौदी अरेबियन एरलाइन्सच्या विमानांमधून अहलाण व सहलण (नमस्कार आणि स्वागत) हे मासिक उपलब्ध असते. इस्लामी नियमांनुसार विमानांतून मद्य आणि वराहमांस (पोर्क) दिले जात नाही. एरबस ए३३०-३०० आणि बोईंग ७७७-३०० प्रकारच्या विमानांतून वायफायद्वारे महाजाल सेवा उपलब्ध आहेत. काही विमानात प्रवाशांसाठी प्रार्थनेची सोयही केलेली आहे.
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.
Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.