From Wikipedia, the free encyclopedia
सेंट लुसिया (इंग्लिश: Saint Lucia; फ्रेंच: Sainte-Lucie) हा कॅरिबियनमधील एक द्वीप-देश आहे. सेंट लुसिया पूर्व कॅरिबियन समुद्रामध्ये अटलांटिक महासागराच्या सीमेजवळ एका लहान बेटावर वसला असून तो लेसर अँटिल्सचा भाग आहे. सेंट लुसियाच्या उत्तरेस मार्टिनिक, दक्षिणेस सेंट व्हिन्सेंट तर आग्नेयेस बार्बाडोस ही बेटे आहेत. कॅस्ट्रीझ ही सेंट लुसियाची राजधानी व सर्वात मोठे शहर असून देशाच्या १.७३ लाख लोकसंखेच्या ३२ टक्के रहिवासी कॅस्ट्रीझमध्ये राहतात.
सेंट लुसिया Saint Lucia | |||||
| |||||
ब्रीद वाक्य: "The Land, The People, The Light" | |||||
राष्ट्रगीत: Sons and Daughters of Saint Lucia | |||||
सेंट लुसियाचे जागतिक नकाशावरील स्थान | |||||
राजधानी (व सर्वात मोठे शहर) |
कॅस्ट्रीझ | ||||
अधिकृत भाषा | इंग्लिश | ||||
इतर प्रमुख भाषा | फ्रेंच क्रियोल | ||||
सरकार | संविधानिक एकाधिकारशाही व संसदीय लोकशाही | ||||
- राणी | एलिझाबेथ दुसरी | ||||
- पंतप्रधान | केनी अँथनी | ||||
महत्त्वपूर्ण घटना | |||||
---|---|---|---|---|---|
- स्वातंत्र्य दिवस | २२ फेब्रुवारी १९७९ (युनायटेड किंग्डमपासून) | ||||
क्षेत्रफळ | |||||
- एकूण | ६१७ किमी२ (१९३वा क्रमांक) | ||||
- पाणी (%) | १.६ | ||||
लोकसंख्या | |||||
-एकूण | १,७३,७६५ | ||||
- गणती | {{{लोकसंख्या_गणना}}}
{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}} | ||||
- घनता | २९८/किमी² | ||||
वार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी) | |||||
- एकूण | २.१०१ अब्ज अमेरिकन डॉलर | ||||
- वार्षिक दरडोई उत्पन्न | १२,६०७ अमेरिकन डॉलर | ||||
मानवी विकास निर्देशांक . | ▲ ०.७२३ (उच्च) (८२ वा) (२०११) | ||||
राष्ट्रीय चलन | पूर्व कॅरिबियन डॉलर | ||||
आंतरराष्ट्रीय कालविभाग | यूटीसी - ४:०० | ||||
आय.एस.ओ. ३१६६-१ | LC | ||||
आंतरजाल प्रत्यय | .lc | ||||
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक | १ ७५८ | ||||
इ.स. १६६० साली येथे फ्रेंच दाखल झाले. त्यानंतर १८१४ सालापर्यंत ह्या बेटाचे अधिपत्य मिळवण्यासाठी फ्रान्स व इंग्लंडने १४ वेळा लढाया केल्या. १८१४ साली ब्रिटनने सेंट लुसियाचा कायमस्वरूपी ताबा मिळवला. २२ फेब्रुवारी १९७९ रोजी सेंट लुसियाला स्वातंत्र्य मिळाले. जॉन कॉम्प्टन हा स्वतंत्र सेंट लुसियाचा पहिला पंतप्रधान होता. सध्या सेंट लुसिया राष्ट्रकुल परिषदेचा सदस्य असून येथे ब्रिटनची राणी एलिझाबेथ दुसरीचे औपचारिक अध्यक्षपद आहे.
प्रदेशवाद==अर्थतंत्र== पर्यटन हा सेंट लुसियामधील सर्वात मोठा उद्योग आहे.
क्रिकेट हा सेंट लुसियामधील एक लोकप्रिय खेळ असून सेंट लुसिया वेस्ट इंडीज क्रिकेट संघाचा सदस्य आहे. विद्यमान वेस्ट इंडीज कर्णधार डॅरेन सॅमी हा आंतरराष्ट्रीय सामने खेळलेला येथील पहिला क्रिकेट खेळाडू आहे.
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.
Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.