सुहास भालेकर

From Wikipedia, the free encyclopedia

सुहास भालेकर (११ ऑक्टोबर, इ.स. १९३१ - २ मार्च, इ.स. २०१३; मुंबई, महाराष्ट्र) हे मराठी अभिनेते, दिग्दर्शक होते. यांनी मराठी नाटके, चित्रपट, दूरचित्रवाहिनी मालिका यांतून अभिनय केला.

जलद तथ्य सुहास भालेकर, जन्म ...
सुहास भालेकर
जन्म ११ ऑक्टोबर, इ.स. १९३१
मृत्यू २ मार्च, इ.स. २०१३
मुंबई, महाराष्ट्र, भारत
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय (नाटक, चित्रपट, टीव्ही मालिका)
भाषा मराठी
बंद करा

कारकीर्द

सुहास भालेकरांनी कारकिर्दीची सुरुवात रंगभूमीपासून केली. नाटकांत कामे करण्यास त्यांच्या वडिलांचा विरोध असल्यामुळे, त्यांनी सुरुवातीस साबाजी या नावाने [] लोकनाट्यांतून कामे केली. इ.स. १९६०-७६ या कालखंडात [] शाहीर साबळे आणि पार्टीच्या अनेक लोकनाट्यांमधून भालेकर आणि राजा मयेकर या अभिनेत्यांची जोडगोळी गाजली []. शाहीर साबळे आणि पार्टीच्या अनेक लोकनाट्यांचे दिग्दर्शन त्यांनी केले [].

व्ही. शांतारामांच्या चानी चित्रपटाद्वारे भालेकरांचा चित्रपटक्षेत्रात प्रवेश झाला [].

कारकीर्द

नाट्यकारकीर्द

सुहास भालेकर यांची नाटके/लोकनाट्ये आणि त्यातील भूमिका  :

अधिक माहिती वर्ष (इ.स.), नाटक ...
वर्ष (इ.स.)नाटकभाषाभूमिका/सहभागटिप्पणी
अजब न्याय वर्तुळाचामराठीअजबदासमूळ जर्मन नाटक ब्रेख्तचे द कॉकेशियन चॉक सर्कल
आतून कीर्तन वरून तमाशामराठी
आंधळं दळतंयमराठीपाटीवालालोकनाट्य
एकच प्यालामराठीतळीराम
एक तमाशा सुंदरसामराठीसई परांजपे आणि लिहिलेले आणि दिग्दर्शित केलेल नाटक
कशी काय वाट चुकलातमराठीलोकनाट्य
कोंडू हवालदारमराठीलोकनाट्य
तुझे आहे तुजपाशीमराठीवासूअण्णा
फुटपायरीचा सम्राटमराठीतुक्या
फुलाला सुगंध मातीचामराठीगोविंदनाना
बापाचा बापमराठीलोकनाट्य
बेबंदशाहीमराठीखाशाबा
माकडाला चढली भांगमराठी
मी मंत्री झालोमराठीलखोबा
मृच्छकटिकमराठीमैत्रेय
लग्नाची बेडीमराठीगोकर्ण
सत्तेवरचे शहाणेमराठीपी.ए.
यमराज्यात एक रात्रमराठीलोकनाट्य
बंद करा

चित्रपट-कारकीर्द

सुहास भालेकर यांची भूमिका असलेले चित्रपट:

अधिक माहिती वर्ष (इ.स.), चित्रपट ...
वर्ष (इ.स.)चित्रपटभाषाभूमिकाटिप्पणी
चानीमराठी
इ.स. १९७६शकहिंदीभालेकर आडनावाचा माणूस
इ.स. १९८०गहराईहिंदी
इ.स. १९८२दोन बायका फजिती ऐकामराठीबाबूराव
इ.स. १९८४सारांशहिंदीविश्वनाथ
इ.स. १९९८चायना गेटहिंदी
अर्थहिंदी
चक्रहिंदी
झुंजमराठी
नीलांबरीमराठी
लक्ष्मीमराठी
सुशीलामराठी
बंद करा

दूरचित्रवाणी-कारकीर्द

अधिक माहिती वर्ष (इ.स.), कार्यक्रम ...
वर्ष (इ.स.)कार्यक्रमभाषाभूमिका/सहभागटिप्पणी
इ.स. २००८असंभवमराठीसोपानकाकाका
भाकरी आणि फूलमराठी
बंद करा
सुहास भालेकर यांचे दिग्दर्शन
  • शाहीर साबळे करीत असलेल्या लोकनाट्यांचे दिग्दर्शन बहुतेक वेळा सुहास भालेकर यांचे असे.


मृत्यू

२ मार्च, इ.स. २०१३ रोजी मुंबईतल्या बाँबे हॉस्पिटल येथे भालेकरांचा मृत्यू झाला []. फुप्फुसांच्या आजारामुळे त्यांना बाँबे हॉस्पिटलात दाखल करण्यात आले होते[]. मृत्युसमयी ते ८३ वर्षांचे होते.

त्यांचा मुलगा हेमंत भालेकर हा अभिनेता आहे.

संदर्भ व नोंदी

बाह्य दुवे

Loading related searches...

Wikiwand - on

Seamless Wikipedia browsing. On steroids.