सुभाष पाटील
From Wikipedia, the free encyclopedia
सुभाष पाटील (सुभाष किसनराव पाटील, जन्म १४ जुलै, १९६१) हे मराठवाडा विकास सेना पक्ष्याचे संस्थापक अध्यक्ष आहेत.[1] सुभाष पाटलांना मराठवाड्यात शिवसेनेचा विस्तार केल्यामुळे औरंगाबादमधील पक्षाचे पहिले जिल्हाप्रमुख म्हणून १९८५ ते १९९१ पर्यंत काम करायला मिळाले.[ संदर्भ हवा ] १९८६ च्या साली, तत्कालीन राज्य सरकारने "रासुका" खाली वर्षभर अकोला जेलमध्ये डांबले. जेलमधून सुटल्यावर त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये प्रवेश केला.[ संदर्भ हवा ] त्यांनी औरंगाबाद येथील रेल्वे ब्रॉडगेज व्हावी यासाठीच्या व वैधानिक विकास मंडळासाठीच्या आंदोलनाचे यशस्वी नेतृत्व केले. मराठवाड्याच्या प्रत्येक प्रश्नासाठी उभारलेल्या जनआंदोलांत त्यांचे सक्रिय नेतृत्व होते.[ संदर्भ हवा ] १९९६-९७ मध्ये जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील निवडणुकांचे नेतृत्व करून त्यांनी भू-विकास बँकेवर सेनेचे तीन सदस्य प्रथमच निवडून आणले. ते मराठवाडा जनरल व औद्योगिक कामगार संघटनेचे अध्यक्ष होते.[ संदर्भ हवा ] महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा मराठवाडा प्रमुख म्हणून २०१७ साली झालेल्या निवडणुकीत सुभाष पाटील ह्यांनी जिल्हा परिषदेत १२ व पंचायत समितीत १५ सदस्य निवडून आणले. शिवाय १८ नगरसेवक निवडून आणले. मनसेचा मराठवाड्यातील एकमेव आमदारही निवडून आणला.[ संदर्भ हवा ]
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.
नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. |
सुभाष पाटील हे कन्नड सहकारी कारखान्याचे संचालक (१९९२ ते १९९७), कन्नड जिल्ह्यातील नावडी येथील सुवर्णपालेश्वर सहकारी पाणीपुरवठा संस्थेचे. अध्यक्ष, विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्थांचे आणि के.बी. पाटील शिक्षण प्रसारक मंडळाचे चेरमन आहेत. [ संदर्भ हवा ]
संदर्भ
Wikiwand - on
Seamless Wikipedia browsing. On steroids.