From Wikipedia, the free encyclopedia
सुपर्ण किंवा पिंगट गरुड (शास्त्रीय नाव: Aquila rapax, ॲक़्विला रॅपॅक्स ; इंग्रजी: Tawny Eagle, टॉनी इगल) हा गृध्राद्य कुळातील एक गरुड आहे. तो आफ्रिकेत जवळपास सर्वत्र, व नैर्ऋत्य आशियापासून ते भारतापर्यंत सर्व प्रदेशांत प्रजनन करतो. भारतीय उपखंडात तो बलुचिस्तान, नेपाळ तराई, बंगला देश, उत्तर तमिळनाडू येथे आढळतो.[2] तो लाल-ठिपक्यांची, पांढऱ्या रंगाची दोन ते तीन अंडी घालतो.[3]
पिंगट गरुड | ||||||||||||
---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|
प्रजातींची उपलब्धता | ||||||||||||
शास्त्रीय वर्गीकरण | ||||||||||||
| ||||||||||||
शास्त्रीय नाव | ||||||||||||
ॲक़्विला रॅपॅक्स (टेमिंक, १८२८) | ||||||||||||
ॲक़्विला रॅपॅक्स | ||||||||||||
इतर नावे | ||||||||||||
ॲक़्विला रॅपॅक्स रॅपॅक्स |
सुपर्ण हा आकारमानाने घारीपेक्षा मोठा व नेपाळी गरुडापेक्षा छोटा असतो. त्याची लांबी ६० ते ७५ सेमी पर्यंत असते. त्याचा रंग गडद उडी ते मातकट बदामी असतो. पाय पिसांनी झाकलेले असतात.
तो अपमार्जक व परभक्षक दोन्ही आहे. ससाणे, घारी व छोट्या शिकारी पक्ष्यांकडे भक्ष्य पाहून उत्तेजित होतो व ते भक्ष्य पळवतो. गिधाडांबरोबर मृत जनावरे देखील खातो परंतु अलीकडील काळात हे दृश्य दुर्मीळ झाले आहे.
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.
Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.