सीतामढी जिल्हा

भारताच्या बिहार राज्यातील एक जिल्हा. From Wikipedia, the free encyclopedia

सीतामढी जिल्हा

सीतामढी जिल्हा हा बिहारच्या ३८ जिल्ह्यांपैकी एक जिल्हा आहे. १९७२ साली शेजारील मुझफ्फरपूर जिल्ह्याचे विभाजन करून हा जिल्हा निर्माण करण्यात आला. सीतामढी जिल्हा बिहारच्या उत्तर भागात भारत-नेपाळच्या सीमेलगत वसला असून सीतामढी येथे त्याचे मुख्यालय आहे. रामायणामधील सीतेचा जन्म ह्या स्थळी झाला असे मानण्यात येते.

जलद तथ्य
सीतामढी जिल्हा
बिहार राज्यातील जिल्हा
Thumb
सीतामढी जिल्हा चे स्थान
बिहार मधील स्थान
देश  भारत
राज्य बिहार
मुख्यालय सीतामढी
क्षेत्रफळ
 - एकूण २,२९४ चौरस किमी (८८६ चौ. मैल)
लोकसंख्या
-एकूण ३४,२३,५७४ (२०११)
-लोकसंख्या घनता १,५०० प्रति चौरस किमी (३,९०० /चौ. मैल)
-साक्षरता दर ५२%
प्रशासन
-लोकसभा मतदारसंघ सीतामढी
-खासदार सुनील कुमार पिंटू
संकेतस्थळ
बंद करा
Thumb
सीतामढी येथील जानकी कुंड

२०११ साली सीतामढी जिल्ह्याची लोकसंख्या सुमारे ३४ लाख होती. बज्जिका ही मैथिलीची एक बोली ह्या भागात वापरली जाते. सीतामढी हा भारतामधील सर्वात अविकसित २५० जिल्ह्यांपैकी एक असून ह्या जिल्ह्याला केंद्र सरकारकडून मदत मिळत आहे.

बाह्य दुवे

Wikiwand - on

Seamless Wikipedia browsing. On steroids.