From Wikipedia, the free encyclopedia
सामोआ (सामोअन: Malo Sa'oloto Tuto'atasi o Samoa; जुने नाव: पश्चिम सामोआ) हा दक्षिण प्रशांत महासागरात वसलेला ओशनिया खंडाच्या पॉलिनेशिया भागातील एक देश आहे. सामोअन द्वीपसमूहाच्या पश्चिम भागामध्ये वसलेल्या सामोआची लोकवस्ती प्रामुख्याने उपोलू व सवई ह्या दोन बेटांवर स्थित आहे. आपिया ही सामोआची राजधानी व प्रमुख शहर आहे.
सामोआ Malo Sa'oloto Tuto'atasi o Samoa Independent State of Samoa सामोआचे स्वतंत्र राज्य | |||||
| |||||
ब्रीद वाक्य: "Fa'avae i le Atua Sāmoa" (देवाने सामोआची निर्मिती केली आहे) | |||||
राष्ट्रगीत: The Banner of Freedom | |||||
सामोआचे जागतिक नकाशावरील स्थान | |||||
राजधानी (व सर्वात मोठे शहर) |
आपिया | ||||
अधिकृत भाषा | सामोअन, इंग्लिश | ||||
सरकार | संसदीय प्रजासत्ताक | ||||
- राष्ट्रप्रमुख | तुफुगा एफी | ||||
- पंतप्रधान | तुलैपा आयोनो सैलेले मलीलेगाओई | ||||
महत्त्वपूर्ण घटना | |||||
---|---|---|---|---|---|
- स्वातंत्र्य दिवस | १ जानेवारी १९६२ (न्यू झीलंडपासून) | ||||
क्षेत्रफळ | |||||
- एकूण | २,८४२ किमी२ (१७४वा क्रमांक) | ||||
- पाणी (%) | ०.३ | ||||
लोकसंख्या | |||||
-एकूण | १,९४,३२० (१६६वा क्रमांक) | ||||
- गणती | {{{लोकसंख्या_गणना}}}
{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}} | ||||
- घनता | ६३.२/किमी² | ||||
वार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी) | |||||
- एकूण | १.०९० अब्ज अमेरिकन डॉलर | ||||
- वार्षिक दरडोई उत्पन्न | ५,९६५ अमेरिकन डॉलर | ||||
मानवी विकास निर्देशांक . | ▼ ०.६९४ (मध्यम) (१०६ वा) (२०१३) | ||||
राष्ट्रीय चलन | सामोअन टाला | ||||
आंतरराष्ट्रीय कालविभाग | यूटीसी+१३:०० | ||||
आय.एस.ओ. ३१६६-१ | WS | ||||
आंतरजाल प्रत्यय | .ws | ||||
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक | ६८५ | ||||
इ.स. १७२२ साली सामोआ बेटांवर पोचलेला याकोब रोग्गेव्हीन हा पहिला युरोपीय शोधक होता. ह्या बेटांच्या अधिपत्यासाठी १९व्या शतकामध्ये जर्मनी, युनायटेड किंग्डम व अमेरिका ह्यांच्यामध्ये अनेक युद्धे झाली. अखेर इ.स. १९०० साली ह्यांमध्ये तह होऊन सामोआ बेटांचा पूर्व भाग अमेरिकन सामोआ ह्या नावाने अमेरिकेच्या अधिपत्याखाली आला, तर पश्चिम सामोआवर जर्मन साम्राज्याची सत्ता आली. पुढील १४ वर्षे हा भूभाग जर्मन सामोआ ह्या नावाने ओळखला जात असे. इ.स. १९१४ मध्ये पहिल्या महायुद्धाच्या सुरुवातीच्या काळात ब्रिटनच्या विनंतीनुसार न्यू झीलंडने सामोआवर आक्रमण केले. १९६२ सालापर्यंत न्यू झीलंडच्या अधिपत्याखाली राहिल्यानंतर सामोआला १ जानेवारी १९६२ रोजी स्वातंत्र्य मिळाले. १५ डिसेंबर १९७६ रोजी सामोआला संयुक्त राष्ट्रसंघामध्ये प्रवेश मिळाला.
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.
Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.