Remove ads
भारतातील एक राजकीय पक्ष From Wikipedia, the free encyclopedia
समता पार्टी हा एक राजकीय पक्ष आहे जो जॉर्ज फर्नांडिस आणि नितीश कुमार यांनी 1994 मध्ये स्थापन केला होता. 2000 मध्ये पहिल्यांदा नितीश कुमार 8 दिवसांसाठी बिहारचे मुख्यमंत्री झाले, नंतर त्यांनी 2003 मध्ये जनता दल (युनायटेड)ची स्थापना केली आणि समता पक्षाचे विलीनीकरण केले, परंतु ब्रह्मानंद मंडळाच्या विरोधामुळे समता पक्ष विलीनीकरण झाले नाही.निवडणूक आयोगाने पक्ष चालवण्यास परवानगी दिली, त्यानंतर ब्रह्मानंद मंडल पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष झाले[२]. बिहार विधानसभा निवडणुकीत 2020[३] मध्ये, पक्षाने उदय मंडल[४] यांच्या नेतृत्वाखाली 10 जागा लढवल्या पण पक्षाला कोणतेही यश मिळाले नाही. समता पक्षाची संघटनात्मक निवडणूक नोव्हेंबर 2021 मध्ये झाली ज्यामध्ये पुन्हा ब्रह्मानंद मंडल राष्ट्रीय अध्यक्ष आणि उदय मंडल राष्ट्रीय सरचिटणीस म्हणून निवडून आले[५].
समता पक्ष | |
---|---|
पक्षाध्यक्ष | उदय मंडल[१] |
स्थापना | 1994 |
संस्थापक | जॉर्ज फर्नांडिस |
मुख्यालय | Q32/A, शर्मा कॉलोनी, बुध बिहार फेज - २, नई दिल्ली - ११००८६ |
विभाजित | जनता दल |
युती | NDA (1994 - 2003) |
राजकीय तत्त्वे | समाजवाद, राष्ट्रवाद |
संकेतस्थळ | समता पक्ष.ऑर्ग |
नाव | कालावधी | राज्य | |
---|---|---|---|
नितीश कुमार[६] | ३ मार्च २००० | १० मार्च २००० | बिहार |
राधा बिनोद कोईजम[७] | १ फेब्रुवारी २००१ | १ जून २००१ | मणिपुर |
शिवसेनेत फूट पडल्यानंतर निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे यांच्या गटाला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) असे नवीन नाव आणि निवडणूक चिन्ह म्हणून मशाल या चिन्हाचे वाटप केले, ज्यावर समता पक्षाने दावा केला आहे. समता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष उदय मंडल यांनी मशाल चिन्हासाठी दिल्ली उच्चन्यायालयात याचिका दाखल केली आहे,तिथे ही मागणी फेटाळली. हे प्रकरण आता सर्वोच्च न्यायालयात दाखल झाले आहे,परंतु अंतरीम स्थगितीसुद्धा मिळाली नाही.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.
Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.