डॉ. सदानंद श्रीधर मोरे (देहूकर) (जन्म : २५ जून, १९५२) हे मराठी लेखक, कवी, नाटककार, समीक्षक, इतिहास संशोधक, प्रवचनकार आणि कीर्तनकार आहेत. संत साहित्याचे (विशेषतः तुकारामांचे) ते अभ्यासक आहेत.[ संदर्भ हवा ]
| ह्या लेखाला एकही संदर्भ दिला गेलेला नाही. विश्वसनीय स्रोत जोडून या लेखातील माहितीची पडताळणी करण्यात मदत करा. संदर्भ नसल्याने प्रस्तुत लेखाची उल्लेखनीयता ही सिद्ध होत नाही. संदर्भहीन मजकूराची पडताळणी करता येत नसल्याने व उल्लेखनीयता सिद्ध होत नसल्याने हा लेख काढून टाकला जाऊ शकतो याची नोंद घ्यावी. |
जलद तथ्य सदानंद मोरे, जन्म ...
बंद करा
सदानंद मोरे यांनी एकदा तत्त्वज्ञान हा विषय, आणि दुसऱ्यांदा प्राचीन भारतीय संस्कृती आणि इतिहास हा विषय घेऊन, असे दोनदा एम.ए. केले आहे.[ संदर्भ हवा ]
‘द गीता – अ थिअरी ऑफ ह्यूमन ॲक्शन ‘ या विषयावर मोरे यांचे पीएच.डी.चे संशोधन होते. त्यासाठी लिहिलेल्या प्रबंधाला सर्वोत्कृष्ट प्रबंधलेखनाचा गुरुदेव दामले पुरस्कार मिळाला.[ संदर्भ हवा ]
डॉ.सदानंद मोरे यांनी विद्यापीठीय अनुदान मंडळाकडून मिळालेल्या ‘कारकीर्द ॲवार्ड‘ या योजनेअंतर्गत ‘कृष्ण : द मॅन अँड हिज मिशन ‘ या विषयावर पोस्ट डॉक्टरल संशोधन केले आहे.[ संदर्भ हवा ]
डॉ. सदानंद मोरे पेशाने तत्त्वज्ञान या विषयाचे प्राध्यापक आहेत. पुणे विद्यापीठातील तत्त्वज्ञान विभागासहित विविध अन्य अध्यासनांचे ते समन्वयक आहेत.[ संदर्भ हवा ]
तुकाराम महाराजांचे वंशज म्हणून मिळालेला सांस्कृतिक वारसा बहुविद्या शाखीय व्यासंगाने अधिक समृद्ध करणारे विचारवंत म्हणून त्यांना लोक मानतात.[ संदर्भ हवा ] मोरे यांनी अनेक संतसाहित्यविषयक तसेच सामाजिक ग्रंथांचे लेखन व संपादन केले आहे. विविध परिसंवाद आणि कार्यशाळांतून त्यांनी अनेक शोधनिबंधांचे वाचन केले आहे आणि अनेक व्याख्याने दिली आहेत.[ संदर्भ हवा ]
डॉ. सदानंद मोरे हे इ.स. २०१५ साली पंजाबमधील घुमान येथे पार पडलेल्या ८८व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संंमेलनाचे अध्यक्ष होते.[ संदर्भ हवा ] जळगाव येथे आयोजित राज्यस्तरीय सूर्योदय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष.[ संदर्भ हवा ]
- अनुभवामृत- वासुदेवी टीका सह-संपादन (आळंदी देवस्थान प्रकाशन)
- अर्भकाचेसाठी (प्रेस्टिज प्रकाशन, पुणे १९९८)
- उजळल्या दिशा – बौद्ध तत्त्वज्ञानावर आधारित नाटक (अक्षर प्रकाशन, मुंबई २००१). सदानंद मोरे यांचे हे पहिलेच नाटक अतुल पेठे यांनी दिग्दर्शित केले होते.
- उंबरठ्यावर
- कर्मयोगी लोकमान्य
- कर्मवीर दादासाहेब गायकवाड स्मृती ग्रंथ सह-संपादन (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, पुणे)
- Kŗsna -The man and his mission (गाज प्रकाशन, अहमदनगर १९९५)
- गर्जा महाराष्ट्र
- द गीता – अ थिअरी ऑफ़ ह्यूमन ॲक्शन -(श्री सद्गुरू प्रकाशन, नवी दिल्ली)
- गीतारहस्याची निर्मिती-मीमांसा (केसरी मराठा प्रकाशन, पुणे १९९२)
- जागृतीकार पाळेकर (चरित्र -जे पी एस पी, पुणे १९९६)
- ताटीचे अभंग – एक विवेचन (भागवत प्रबोधन, देहू १९९५)
- तुका म्हणे (उत्कर्ष प्रकाशन, पुणे, २००१)
- तुकाराम गाथा संपादन (देहू देवस्थान प्रकाशन)
- तुकाराम दर्शन (गाज प्रकाशन, अहमदनगर १९९६)
- त्रयोदशी (नवीन उद्योग प्रकाशन, पुणे १९९५)
- निवडक सकल संत गाथा
- पालखी सोहळा उगम आणि विकास (देहू देवस्थान प्रकाशन, १९९५)
- प्रसादाची वाणी (सकाळ प्रकाशन)
- मंथन – शोध निबंध व लेख संग्रह (प्रकाशक - ऐतिहासिक वस्तू संग्रहालय, अहमदनगर)
- महात्मा फुले यांचे राजकीय विचार (शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर १९९५)
- या सम हा
- वि.का. राजवाडे समग्र साहित्य, प्रस्तावना खंड – संपादन (राजवाडे संशोधन मंडळ, धुळे)
- लोकमान्य टिळक यांचे चरित्र (गंधर्व वेद प्रकाशन)
- लोकमान्य ते महात्मा (२ खंड, राजहंस प्रकाशन, पुणे)
- लोकमान्य बाळ गंगाधर टिळक (मनोविकास प्रकाशन)
- वारकरी साहित्य भूमिका आणि स्वरूप (नाना पाटील ॲकॅडमी पुणे १९९५)
- वाळूचे किल्ले
- विद्रोहाचे व्याकरण
- शिवचरित्र (नाटक)
- क्षितिज
- ज्ञानदेव तुकाराम (देहू देवस्थान प्रकाशन २०००)
- ॲग्रोवन दैनिकात संत तुकारामांच्या साहित्यावर ‘अध्यात्म’ नावाचे सदरलेखन
- महाराष्ट्र टाइम्स, सकाळ, लोकसत्ता आदी दैनिकांतून आणि साप्ताहिक साधना, साप्ताहिक लोकप्रभा, साप्ताहिक विवेक आदींमधून लेखप्रकाशन
- "मराठा समाज : वास्तव आणि अपेक्षा" या पुस्तकाची प्रस्तावना
- साप्ताहिक सकाळमध्ये स्तंभलेखन (विषय : टिळकांकडून गांधींकडे नेतृत्वाचे हस्तांतरण)
- साप्ताहिक सकाळमधून “गर्जा महाराष्ट्र’, “तुकाराम दर्शन’, "महाराष्ट्राची लोकयात्रा" आणि “लोकमान्य ते महात्मा", "विचारांच्या सावल्या" या लेखमाला.
- उजळल्या दिशा या नाटकासाठी राज्य शासनासह १० संस्थांचे पुरस्कार.
- अनंत काणेकर पुरस्कार, मुंबई
- मराठी साहित्य परिषदेचा कमलाकर सारंग स्मृती पुरस्कार
- पुण्याच्या कला गौरव प्रतिष्ठानचा पुरस्कार
- नाट्य गौरव पुरस्कार
- नाट्यदर्पण पुरस्कार, मुंबई
- मुंबईच्या नाट्य परिषदेचा पुरस्कार
- मामा वरेरकर पुरस्कार, मुंबई
- रंगदर्पण पुरस्कार, मुंबई
- शिव मंत्री स्मृती पुरस्कार
- तुकाराम दर्शन या ग्रंथासाठी १९९८ सालच्या साहित्य अकादमी पुरस्कारासह अन्य १५ संस्थांचे पुरस्कार
- अहमदनगर जिल्हा ऐतिहासिक वस्तू संग्रहालय यांचा पुरस्कार
- इचलकरंजीचा ग्रंथोत्तेजक पुरस्कार
- पिंपरी-चिंचवड येथे भरलेल्या ग्राम जागर साहित्य संमेलनाचा पुरस्कार
- ना.गो. चाफेकर पुरस्कार
- प्रो.पी.आर. जिनसीवाले पुरस्कार
- तनपुरे महाराज पुरस्कार (पंढरपूर)
- संत तुकाराम महाराज साहित्य पुरस्कार
- अमेरिकेतील महाराष्ट्र फाऊंडेशनचा पुरस्कार
- पुण्याच्या महाराष्ट्र साहित्य परिषदेचा पुरस्कार
- सत्यशोधक मुकुंदराव पुरस्कार, तारावाडी
- समर्थ रामदास पुरस्कार, माळेगाव
- लोकमान्य ते महात्मा या पुस्तकाला मिळालेले पुरस्कार:-
- कळवा येथील जवाहर वाचनालयाचा गोपीनाथ शिवराम पाटील पुरस्कार
- महाराष्ट्र सरकारचा महात्मा जोतिबा फुले राज्य पुरस्कार
- पुण्याच्या महाराष्ट्र साहित्य परिषदेचा शं.ना. जोशी पुरस्कार
- नाशिकचाच प्रसाद बन वाङमय पुरस्कार
- ना. के. बेहरे पुरस्कार, पुणे
- मराठी ग्रंथालय पुरस्कार, पुणे
- नाशिकच्या सार्वजनिक वाचनालयाचा मु.बा. यंदे साहित्य पुरस्कार
- कोल्हापूरच्या दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेचा राजर्षी छत्रपती शाहू पुरस्कार
- सहकार महर्षी साहित्य पुरस्कार, सोलापूर
- ’द गीता : अ थिअरी ऑफ़ ह्यूमन ॲक्शन’ या पीएच.डी.च्या प्रबंधासाठी सर्वोत्कृष्ट प्रबंधासाठी असलेला गुरुदेव दामले पुरस्कार
- अखिल महाराष्ट्र इतिहास परिषदेत २०१७ चा इतिहासभूषण वा .सी. बेंद्रे पुरस्कार .
- न.चिं. केळकर पुरस्कार - ’कर्मयोगी लोकमान्य’साठी
- सूर्योदय सर्वसमावेशक मंडळ जळगावचा अखिल भारतीय श्री दलुभाऊ जैन मराठी साहित्य भूषण पुरस्कार