एव्हियेशन थर्मोबेरिक बॉम्ब ऑफ इन्क्रीझ्ड पॉवर ऊर्फ सगळ्या बाँबांचा बाप (रशियन: Авиационная вакуумная бомба повышенной мощности (АВБПМ) ) हा रशियात तयार होणारा हवेतून टाकण्यात येणारा व जमिनीवर फुटणारा बाँब आहे.

अमेरिकन सैन्याने तयार केलेल्या मासिव्ह ऑर्डनन्स एर ब्लास्ट बाँब (MOAB) या बाँबापेक्षा याची विस्फोटक्षमता चौपट आहे. अमेरिकन बाँब मदर ऑफ ऑल बाँब्स या नावाने ओळखला जात असल्यामुळे या बाँबाला सगळ्या बाँबांचा बाप असे उपनाव देण्यात आले आहे.

अधिक माहिती

ह्या हवाबंद कुपीतून तयार होणारी ऊर्जा ४४ टन टीएनटी इतकी आहे. ही ऊर्जा बनवण्यासाठी ७.८ टन नवीन प्रकारच्या उच्च विस्फोटकाची गरज असते. हे विस्फोटक नॅनो तंत्रज्ञानाच्या साहाय्याने बनवले आहे. ११ सप्टेंबर २००७ रोजी ह्या बाँबची यशस्वी चाचणी घेण्यात आली.

मासिव्ह ऑर्डनन्स एर ब्लास्ट बाँबबरोबर तुलना

अधिक माहिती परिमाण, मासिव्ह ऑर्डनन्स एर ब्लास्ट बाँब ...
परिमाण मासिव्ह ऑर्डनन्स एर ब्लास्ट बाँब एव्हियेशन थर्मोबेरिक बाँब ऑफ इन्क्रीझ्ड पॉवर
वजन: ८,२०० किलो. ७,१०० किलो.
टीएनटी विस्फोटक्षमता: ११ टन / २०,००० पाउंड ~४४ टन / ८०,००० पाउंड
स्फ़ोट त्रिज्या : १५० मी. (५०० फूट) ३०० मी. (१,००० फूट)
दिग्दर्शन: आय एन एस/जीपीएस माहिती नाही
बंद करा


Wikiwand in your browser!

Seamless Wikipedia browsing. On steroids.

Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.

Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.