From Wikipedia, the free encyclopedia
सक्रिय दीर्घिकीय केंद्रक (इंग्रजी: Active Galactic Nucleus (AGN), लघुरूप: एजीएन) हा दीर्घिकेच्या केंद्राजवळचा दाट (compact) भाग आहे. याची तेजस्विता विद्युतचुंबकीय वर्णपटाच्या सर्व भागांत किंवा कमीत कमी काही भागांत सरासरीपेक्षा खूप जास्त असते. हे जास्तीचे उत्सर्जन रेडिओ, सूक्ष्मतरंग, अवरक्त, दृश्य, अतिनिल, क्ष-किरण आणि गॅमा किरण या तरंगलांबींमध्ये आढळून आले आहे. ज्या दीर्घिकांमध्ये एजीएन असते अशा दीर्घिकांना सक्रिय दीर्घिका म्हणतात. एजीएन मधील प्रारण त्याच्या केंद्रस्थानी असणाऱ्या प्रचंड वस्तुमानाच्या कृष्णविवराचे वस्तुमान वृद्धिंगत (ॲक्रिशन[श 1]) होत असल्याने होते असे मानले जाते. एजीएन विद्युतचुंबकीय प्रारणाचे विश्वातील सर्वात तेजस्वी स्रोत आहेत. त्यांचा वापर अतिशय दूरच्या गोष्टी शोधण्यासाठी केला जाऊ शकतो.
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.
Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.