श्री गणेश उपनिषद From Wikipedia, the free encyclopedia
श्री गणेश अथर्वशीर्ष हे एक नव्य उपनिषद आहे.[1] ते अथर्ववेदाशी संबंधित आहे.यामध्ये गणेशविद्या सांगितलेली असून गणेशाच्या उपासकांमध्ये या उपनिषदाला विशेष महत्त्व आहे.[2][3] श्री गणपती अथर्वशीर्ष हे श्री गणक ऋषी यांनी लिहिले आहे.[4]
थर्व म्हणजे चंचल आणि अथर्व म्हणजे स्थिर. शीर्ष म्हणजे मस्तक. ज्याच्या पठणामुळे बुद्धीला स्थिरता येते असे उपनिषद म्हणजे अथर्वशीर्ष होय असा याचा अर्थ लावला जातो.[5][6]
यामध्ये प्रथम गणपतीच्या सगुणब्रह्माची उपासना सांगून शेवटी तो गणपती म्हणजे परब्रह्म होय असे त्याचे उदात्तीकरण केले आहे.गणपती हा तीन देहांच्या पलीकडचा असला तरी "गं" हे त्याचे तांत्रिक शरीर आहे आणि तोच त्याचा महामंत्रही आहे. गणपती हा विश्वाचा आधार असून तो ज्ञान आणि विज्ञानमय आहे. व्रातपती, शिवाच्या गणांचा अधिपती असा असलेल्या गणपतीला यामध्ये नमस्कार केलेला आहे.[7] यानंतर याची फलश्रुती सांगितलेली आहे. या उपनिषदाचे एक सहस्र वेळा पठण केल्याने जे हवे ते प्राप्त होईल असे म्हणले आहे.[4]
आंतरबन्धू विकिप्रकल्प पुनर्निर्देशन: गणपती अथर्वशीर्ष हा लेख/ हि लेखमाला मराठी विकिस्रोत या बंधू प्रकल्पात s:mr:गणपती अथर्वशीर्ष येथे स्थानांतरीत केला गेला/ केली गेली आहे. आणि s:वर्ग:मराठी विकिपिडिया प्रकल्पातून स्थानांतरीत वर्गिकरणाने वर्गीकृत केले आहे.
* नेमके काय केले आहे? मी काही मदत करू शकतो का?: |
---|
सध्या मराठी 'विकिपिडिया'मध्ये मुख्यत्वे मूळ स्रोत ग्रंथाचा भरणा चुकीने झाला आहे.वस्तुतः गणपती अथर्वशीर्ष आणि मराठी भाषेतील कॉपीराईटफ्री-प्रताधिकार मुक्त विशेषतः सन १९५२ पुर्वी मृत्यू झालेल्या सर्व साहित्यिकांचे तत्सम मूळ ग्रंथसंपदा गणपती अथर्वशीर्ष नावाने मराठी विकिस्रोत या संबंधीत बन्धू प्रकल्पात स्थानांतरीत केली आहे. आपण केलेले कॉपीराईटफ्री-प्रताधिकार मुक्त लेखन http://mr.wikisource.org येथे व्यवस्थित हलवले गेले आहे का ? याची खात्रीकरून घेण्यात मराठी विकिस्रोत प्रकल्पात s:mr:गणपती अथर्वशीर्ष लेख/लेखमाला तपासून साहाय्य करा. |
* असे का?: |
---|
मराठी भाषेतील 'विकिपिडिया'मध्ये आपले स्वागत आहे. विकिपिडिया प्रकल्पाचा मूख्य् उद्देश ज्ञानकोश निर्मिती व्हावी असा मर्यादीत आहे. विकिपीडिया हे दालन पूर्वप्रकाशित गणपती अथर्वशीर्ष ग्रंथा करिता मूळीच नाही. प्रताधिकार मुक्त (कॉपीराईट फ्री) पूर्वप्रकाशित गणपती अथर्वशीर्ष ग्रथांकरिता कृपया विकिस्रोत या बन्धूप्रकल्पाकडे जावे. |
ॐ नमस्ते गणपते, तूचि प्रत्यक्ष तत्त्व सत्। तूचि केवल कर्ता बा, तूचि धर्ताहि केवल। तूचि केवल संहर्ता, तूचि ब्रह्महि सर्वहे। तू साक्षात् नित्य तो आत्मा॥१॥
ऋत मी सत्य मी वदे ॥२॥
करी रक्षण तू माझे, वक्त्या-श्रोत्यांस रक्ष तू। दात्या-घेत्यांस तू रक्ष, गुरू - शिष्यांस रक्ष तू। मागुनी पुढुनी डाव्या, उजव्या बाजूने पण वरूनी खालुनी माझे, सर्वथा कर रक्षण॥३॥
जसा वाङ्मय आहेस, तू चिन्मयहि बा तसा। जसा आनन्दमय तू, तू ब्रह्ममयही तसा। देवा तू सच्चिदानन्द, अद्वितीयहि तू तसा। प्रत्यक्ष ब्रह्म तू, ज्ञान-विज्ञान-मयही तसा ॥४॥
सर्व हे जग उत्पन्न, तुझ्यापासुनि होतसे। त्याची स्थिती तुझ्यायोगे, विलयेल तुझ्यात ते। भासते ते तुझ्या ठायी, तू भूमि जल अग्नि तू। तूचि वायुनी आकाश, वाणी स्थाने ही चार तू ॥५॥
तू जसा त्रिगुणां-पार, त्रिदेहांच्याहि पार तू। तू अवस्था-त्रयां-पार, त्रिकालांच्याहि पार तू। तू मूलधार चक्रात, देहाच्या नित्य राहसी। इच्छा-ज्ञान-क्रिया रूपी, शक्ती त्या तूचि तीनही। ध्याती नित्य तुला योगी, तू ब्रह्मा तूचि विष्णूही। तू रुद्र, इंद्र, तू अग्नी, तू वायू, सूर्य ,चन्द्रही तू ब्रह्म, तूचि भू, तूची अन्तरिक्ष,नी स्वर्गही। तूचि ॐ कार हे बीज, वर्णिती ज्यास वेदही॥ ६॥
आधी ‘ग’ कार उच्चार, ‘अ’ कार तदनन्तर। त्यानंतर अनुस्वार, अर्धचन्द्रे सुशोभित। ॐ कार-युक्त हे बीज, मन्त्ररूपचि हे तव । ‘ग’ कार रूप हे पूर्व, असे मध्यम रूप ‘अ’। अन्त्य रूप अनुस्वार, बिन्दू उत्तर रूपसा। नाद सांधतसे यांना, सन्धीचे नाम संहिता। गणेश विद्या ती हीच, आहे गणक हा ऋषी। छन्द हा निचृद्-गायत्री, देवता श्रीगणेश ही । ॐ गं रूपी गणेशाला, नमस्कार सदा असो ॥७॥
एकदन्तास त्या आम्ही, देवाधीशास जाणतो। आणि त्या वक्रतुण्डाते, आम्ही ध्याने उपासतो। त्यासाठी सर्वदा आम्हा, तो दन्ती प्रेरणा करो ॥ ८॥
एकदन्ता चतुर्हस्ता, पाश - अंकुश धारका । द्न्तनी वरदा मुद्रा, धारका मूषक - ध्वजा। लम्बोदरा रक्तवर्णा , शूर्प-कर्णा गजानना । रक्त - वस्त्रा विघ्न-हर्त्या, गिरिजानन्दन-वर्धना। रक्त-चन्दन-लिप्तांगा, रक्त-पुष्पा-सुपूजिता । भक्तावरी दया कर्त्या ,अच्युता जग-कारणा। सृष्टिपूर्वी प्रकटल्या, प्रकृती पुरूषा परा । या ध्यातो नित्य तो योगी, योग्यांमध्ये वरिष्ठसा ॥ ९॥
वन्दन व्रातपतिला, गणाधेशास वन्दन । वन्दन प्रमथेशाला, एकदन्तास वन्दन। लम्बोदरा शिवसुता, विघ्नहर्त्यास वन्दन। वांछिला वर देणाऱ्या अय, तव मूर्तिस वन्दन ॥१०॥
या अथर्वशीर्षाचे जो अध्ययन करतो तो ब्रह्मरूप होतो. त्याला कोणत्याच विघ्नांची बाधा होत नाही. तो सर्व बाजूंनी सुखांत वाढतो. (हिंसा, अभक्ष्यभक्षण, परदारागमन, चौर्य व पापसंसर्ग) या पांचही महापापांपासून मुक्त होतो. संध्याकाळी पठण करणारा दिवसा (अजाणपणे) केलेल्या पापाचा नाश करतो. सकाळी पठण करणारा रात्री (नकळत) केलेल्या पापांचा नाश करतो. संध्याकाळीं व सकाळी पठण करणारा पाप (प्रवृत्ती) रहीत होतो. सर्व ठिकाणी (याचे) अध्ययन करणारा विघ्नमुक्त होतो. धर्म, अर्थ, काम व मोक्ष मिळवितो. हे अथर्वशीर्ष (अनधिकारी) शिष्य-भाव नसलेल्या माणसाला सांगू नये. जर कोणी अशा अनधिकाऱ्यास मोहाने देईल तर तो मोठाच पापी होतो. या अथर्वशीर्षाच्या सहस्र आवर्तनांनी जी जी कामना मनुष्य करील ती ती या योगे सिद्ध होईल. ॥११॥
या अथर्वशीर्षाने जो गणपतीला अभिषेक करतो, तो उत्तम वक्ता होतो, चतुर्थीच्या दिवशी कांही न खाता जो याचा जप करतो तो विद्यासंपन्न होतो, असे अथर्वण ऋषींचे वाक्य आहे. (याचा जप करणाऱ्याला) ब्रह्म व आद्या (म्हणजे माया) यांचा विलास कळेल. तो कधीच भीत नाही. ॥१२॥ जो दुर्वांकुरांनी हवन करतो तो कुबेरासम होतो. जो साळीच्या लाह्यांनी हवन करतो, तो यशस्वी सर्वंकष बुद्धिमान होतो. जो सहस्र मोदकांनी हवन करतो, त्याला इष्टफल प्राप्त होते. जो घृतयुक्त समिधांनी हवन करतो त्याला सर्व मिळते, अगदी सर्व काही प्राप्त होते. ॥१३॥
आठ ब्राह्माणांना योग्य प्रकारे (याचा) उपदेश केल्यास, करणारा सूर्यासारखा तेजस्वी होतो. सूर्यग्रहणांत, महानदीच्या काठी किंवा गणपती प्रतिमेजवळ जप केल्यास हा मंत्र सिद्ध होतो. (असा मंत्र सिद्ध करणारा) महाविघ्नापासून मुक्त होतो. महादोषापासून मुक्त होतो. महापापापासून मुक्त होतो. तो सर्वज्ञ होतो. तो सर्वसंपन्न होतो, जो हे असे जाणतो. असे हे उपनिषद आहे. ॥१४॥[8]
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.
Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.