शबाना आझमी
भारतीय राजकारणी From Wikipedia, the free encyclopedia
शबाना आझमी ( १८ सप्टेंबर १९५०) ही एक भारतीय अभिनेत्री आहे.ती प्रसिद्ध कवी कैफी आझमी व रंगभूमी कलाकार शौकत आझमी यांची कन्या आहे. ती भारतीय चित्रपट आणि दूरदर्शन संस्था पुणे, या संस्थेची माजी विद्यार्थिनी आहे. तिने सन १९७४ मध्ये आपल्या अभिनयाची कारकीर्द सुरू केली. तिने समांतर सिनेमातही कामे केलीत.[१][२] तिने आपल्या अभिनयाने अनेक पुरस्कार प्राप्त केले.त्यात राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांचा समावेश आहे.तिला सर्वोत्तम अभिनेत्री म्हणून ५ वेळा पुरस्कार मिळाला आहे व अनेक आंतरराष्ट्रीय पुरस्कारही मिळाले आहेत.[१][३] तिला पाच फिल्मफेअर पुरस्कारही मिळाले आहेत.[४] सन १९८८ मध्ये तिला भारत सरकारने पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
शबाना आझमी | |
---|---|
![]() शबाना आझमी, २०१५ मधील एक छायाचित्र | |
जन्म |
शबाना आझमी १८ सप्टेंबर, १९५० हैदराबाद,तेलंगाणा, भारत |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
कार्यक्षेत्र | अभिनय |
वडील | कैफी आझमी |
आई | शौकत आझमी |
पती | जावेद अख्तर |
संदर्भ
Wikiwand - on
Seamless Wikipedia browsing. On steroids.