व्हिक्टोरिया, ऑस्ट्रेलिया
From Wikipedia, the free encyclopedia
From Wikipedia, the free encyclopedia
व्हिक्टोरिया Victoria | ||
ऑस्ट्रेलियाचे राज्य | ||
| ||
ऑस्ट्रेलियाच्या नकाशावर व्हिक्टोरियाचे स्थान
| ||
देश | ऑस्ट्रेलिया | |
राजधानी | मेलबर्न | |
क्षेत्रफळ | २,३७,६२९ वर्ग किमी | |
लोकसंख्या | ५४,०२,६०० | |
घनता | २२.९२ प्रति वर्ग किमी | |
वेबसाईट | http://www.vic.gov.au | |
व्हिक्टोरिया हे ऑस्ट्रेलिया देशातील दुसरे सर्वाधिक लोकसंख्येचे राज्य आहे. येथील ७०% लोक राजधानी मेलबर्न येथे राहतात.
व्हिक्टोरिया हा प्रदेश राज्य म्हणून १९०१ साली ऑस्ट्रेलियात सामील झाला. याची सुरुवात इ.स. १८३० पासून एक शेतीप्रधान व्यवसाय असलेले राज्य अशी झाली. १८५१ साली बेंडीगो Bendigo. व बॅलाराट Ballarat या ठिकाणी लागलेल्या सोन्याच्या शोधामुळे या राज्याची भरभराट झाली. येथे आयर्लंड व चीन येथून अनेक लोक आले. ऑस्ट्रेलियाच्या न्यु साउथ वेल्स New South Wales या राज्या नंतर सर्वात जास्त लोकसंख्या असलेले हे राज्य आहे. इ.स. २००६ साली झालेल्या जनगणने नुसार येथे ४९,३२,२४२ इतकी लोकसंख्या आहे. या राज्याचे मेलबर्न हे राजधानीचे शहर आहे. राज्याचे जीलाँग Geelong , बॅलाराट Ballarat, बेंडीगो Bendigo, शेपर्टन Shepparton, मिलदुरा Mildura, वार्नांबुल Warrnambool and theला ट्रोब व्हॅली Latrobe Valley. हे मुख्य शहरी विभाग आहेत.
व्हिक्टोरियातील सुमारे ६०% लोक धर्माने ख्रिश्चन आहेत. १३२६३४ लोकसंख्येमुळे बौद्ध धर्म हा दुसऱ्या क्रमांकाचा धर्म आहे. सुमारे एक लाख मुस्लिम लोक आहेत. तसेच सुमारे ४० हजार ज्यु आहेत. या राज्यातील २० % लोक कोणताही धर्म मानत नाहीत.
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.
Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.