जागतिक बँक (इंग्लिश: World Bank, वर्ल्ड बँक) ही एक आंतरराष्ट्रीय वित्त आणि पतपुरवठा संस्था आहे. हीची स्थापना डिसेंबर २७, इ.स. १९४५ मध्ये झाली. ब्रेटन वुडस् पद्धती (इंग्लिश: Bretton Woods System) समितीच्या जागतिक आर्थिक नियंत्रण शिफारशीं वापरण्यात आल्या होत्या. या समिती मध्ये ४५ मित्रराष्ट्रे होती. विकसनशील देश व अविकसित देश यांना विकासासाठी कर्जपुरवठा करणारी संस्था असे याचे स्वरूप आहे. या बंकेने पहिले कर्ज फ्रांस या देशाला दिले.
गरीबी दूर करण्यासाठी ही बँक जगभरात विषेश प्रयत्नशील आहे.
जागतिक बँकेची उद्दिष्टे खालील प्रमाणे आहेत :
- सरकारांचे सबलीकरण व सरकारी अधिकाऱ्यांना प्रशिक्षण
- अर्थव्यवस्थांचा विकास
- भ्रष्टाचार निर्मूलन
- गरीबी हटाव
- संशोधन व शिक्षण
शिक्षणासाठी जागतिक बँक विषेश परिश्रम घेते. या साठी आंतरजालाधारित प्रशिक्षण व इतर पर्यायांचा उपयोग केला जात आहे.
भारतासहित अनेक देशांना या बँकेने विविध प्रकल्पासाठी कर्जे दिली आहेत. त्यापैकी भारतातील गुजरात मधील नर्मदा नदी वरील विवादास्पद धरण सरदार सरोवर प्रकल्पाचे कर्ज या बेंकेने प्रकल्पातील धोके दिसून आल्याने परत घेतली आहे.
इ.स. १९९८ सालातल्या मंदीच्या काळात या जागतिक बँकेने मेक्सिको व इंडोनेशिया या देशांना दिलेला सल्ला आर्थिक दॄष्ट्या अतिशय धोक्याचा ठरला आहे.
विरोधी बाजू
याच वेळी बँकेचे विरोधक असेही म्हणतात की बँकेची काही लपवलेली उद्दीष्टेही आहेत. जसे की दुसऱ्या महायुद्धा नंतर साम्राज्य लयाला जात चाललेल्या इंग्लंडला नवीन आर्थिक साम्राज्य उभारण्यासाठी या बँकेचा उपयोग करून घेतला आहे. बँकेचे माजी अध्यक्ष व अर्थतज्ज्ञ जोसेफ स्तिगलित्झ (इंग्रजी:Joseph E. Stiglitz) यानीही इ.स. १९९९ मध्ये बँकेच्या उद्दीष्टांशी सुसंगत नसलेल्या धोरणांवर टीका केली होती.
बाह्य दुवे
जागतिक बँक Archived 2021-08-01 at the Wayback Machine. (मराठी माहिती )
समर्थक बाह्य दुवे
- "अधिकॄत संकेतस्थळ" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)
- "डुइंग बिझनेस.ऑर्ग" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)
- "आयसिम्युलेट @ जागतिक बँक" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)
विरोधी बाह्य दुवे
- "इसेन्शियल अॅक्शन.ऑर्ग" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)
- "डीसी इंडिमीडिया" (इंग्लिश भाषेत). 2008-12-05 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2008-01-03 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
- "सीएडीटीएम" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)
- "डब्ल्यूएएलएचआय" (इंग्लिश भाषेत). 2009-01-29 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2008-01-03 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
Wikiwand in your browser!
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.
Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.