Remove ads
विवाह संस्था From Wikipedia, the free encyclopedia
"विवाह" हे एक पुरुष व स्त्री अश्या दोन व्यक्तीमधील सामाजिक बंधन आहे. हिंदू धर्मीयांत हा संस्कार आहे, तर अन्य धर्मीयांत हा कायदेशीर करार असतो. विवाह हा संतती किवा वंश पुढे नेण्यासाठीचा कायदेशीर व सामाजिक मार्ग आहे. विवाह संस्था ही संस्कृतीस आणि उपसंस्कृतीस अनुलक्षून विविध पद्धतींनी पतिपत्नींमधले जवळकीचे आणि लैंगिक नाते मान्य करते. विवाहामुळे दोन व्यक्तींचे नव्हे तर दोन कुटुंबे आणि त्यांचे नातेवाईक नात्याने जोडले जातात. या नात्यास लग्नगाठ म्हणतात. लग्न हे पवित्र बंधन आहे.
लग्नपत्रिका (निमंत्रणपत्रिका)
लग्नपत्रिका हा लिखीत आमंत्रणासाठी दिलेला विनंतीवजा मजकूर असतो. त्यामध्ये उपस्थितीच्या विनंतीसोबतच वधु-वराच्या, त्यांच्या आई-बापाच्या, आप्तेष्ठांच्या नावांंचा उल्लेख असतो; तसेच विवाह कार्यासमयीच्या इतर विधींचा(जसे हळदी, गुग्गुळ, गोंधळ, पूजा, देवकार्य, वालंग, जागर, वीर, वरात, केळवण, अक्षतारोपन, बिदाई), स्थल-कालाचा उल्लेख असतो. हल्ली आहेर-धार-भेटवस्तू-पुष्पगुच्छ-पुस्तके-अलंकार स्वीकारले जाणार नाहीत असाही सूचनावजा मज़कूर लिहिण्याचा प्रघात सुरू झाला आहे.
व्यक्तिगत दृष्टिकोनातून विवाह हा पति-पत्नींतील मैत्री आणि भागीदारी आहे. वैवाहिक जीवनातून दोघांच्याही सुखासाठी, विकासासाठी आणि पूर्णत्वासाठी आवश्यक सेवा, सहयोगाची, प्रेमाची, निःस्वार्थ त्यागाची व अनेक गुणांची शिकवण मिळते. नर - नारी यांच्या अनेक आकांक्षा विवाहाद्वारे आणि संतती-प्राप्ति द्वारे पूर्ण होतात. ते जरी जगात नसले, तरी त्यांची संतती त्यांचे नाव आणि कुळाची परंपरा अक्षुण्ण राखेल याची त्यांना खात्री असते. आपली संतती आपल्या संपत्तीची उत्तराधिकारी राहील तसेच वृद्धावस्थेत आपल्याला त्यांना आधार देईल याची त्यांना खात्री असते. पत्नी मनुष्याचा निम्मा अंश आहे, असे हिंदू धर्मामध्ये वैदिक युगापासून असा विश्वास प्रचलित आहे. मनुष्य जोपर्यंत तो पत्नी प्राप्त करून संतती उत्पन्न करत नाही तो पर्यंत तो अपूर्ण आहे (शतपथ ब्राह्मण, ५। २। १। १०)। पुरुष प्रकृतीच्या विना आणि शिव पार्वतीच्या विना अपूर्ण आहे, असे .वैदिक वाङ्मयात सांगितले आहे.
विवाह एक धार्मिक संबंध आहे. प्राचीन युनान, रोम, भारत इत्यादी सर्व सुसंस्कृत देशात विवाहाला धार्मिक बंधन तसेच कर्तव्य समजले जाते. वैदिक युगात यज्ञ करणे प्रत्येक व्यक्तीसाठी अनिवार्य होते, परंतु यज्ञ पत्नीशिवाय पूर्ण नाही होत नाही असे समजले जात होते. म्हणून विवाह सगळ्यांना धार्मिक दृष्टीने आवश्यक होता. पत्नी शब्दाचा अर्थच यज्ञात बरोबरीने बसणारी स्त्री आहे(??). श्रीरामाचा अश्वमेध यज्ञ पत्नीविना पूर्ण झाला नाही, म्हणून त्याला सीताची प्रतिमा स्थापित करावी लागली. याज्ञवल्क्य (१। ८९) ने एका पत्नीचा मृत्यू झाल्यावर यज्ञकार्य चालवण्यासाठी लगेच दुसरी पत्नी आणण्याचे आदेश दिले.. पितरांच्या आत्म्याचा उद्धार पुत्राच्या पिंडदानाने आणि तर्पणानेच होते, या धार्मिक विश्वासाने पण विवाहाला हिंदू धर्मामध्ये विवाह हे धार्मिक कर्तव्य सांगितले आहे.
दोन भिन्नलिंगी व्यक्तींनी संततीची प्राप्ती आणि तिचे संगोपन करण्याच्या उद्देशाने, तसेच समाजाच्या मान्यतेने स्थिर आणि सातत्यापूर्ण लैंगिक जीवन जगण्यासाठी, कायदेशीर दृष्ट्या आवश्यक व समाजमान्य विधींचे पालन करून कौटुंबिक जीवनाची केलेली सुरुवात म्हणजे विवाह होय आणि या विविध विधींचा तसेच संबंधित सामाजिक आणि सांस्कृतिक प्रथांचा समुच्च्य म्हणजे विवाहसंस्था होय. विवाहसंस्थेचे उद्दिष्ट मानवी समाजातील प्रजनन-प्रक्रियेवर नियंत्रण ठेवणे हे आहे.
वैवाहिक विधी : जवळजवळ सगळ्या समाजात विवाहचे संस्कार काही विशिष्ट एक विधीने संपन्न केले जातात. हे संस्कार नरनारींचेचे पति-पत्नी बनण्यासाठीची घोषणा करते. अन्य व्यक्तींना संस्काराच्या या समारंभात बोलावून त्यांना या नवीन दांपत्य-संबंधांचे साक्षीदार केले जाते आणि धार्मिक विधी द्वारें त्याला कायदेशीर मान्यता आणि सामाजिक सहमती प्रदान करण्यात येते. वैवाहिक विधीचा मुख्य उद्देश नवीन संबंधाची जाहिरात करणे, त्याला सुखमय बनवणे तसेच नानाप्रकाराचे अनिष्टांपासून त्याचे रक्षण करणे आहे.
विवाह संस्कार या विधींमध्ये विस्मयकारक वैविध्य आढळते. ह्या संस्कारात चार पायऱ्या असतात. पहिली पायरी हा वधूच्या स्थितीमध्ये होणाऱ्या परिवर्तंन सूचित करणारी विधि आहे. दुसरी पायरी ही विवाहामध्ये कन्यादान करून कन्येच्या पित्याकडून पतीच्या नियंत्रणात जाण्याची स्थिती घोषित करते. इंग्लंड, पैलेस्टाइन, जावा, चीनमध्ये वधूला नवीन घराच्या प्रवेशाच्या वेळेस उंबरठ्यावरून उचलून आत घेऊन जातात. स्काटलैंडमध्ये वडिलांचा लेकीवर अधिकार राहिला नाही हे सूचित करण्यासाठी वधूच्या मागे जुना जोडा फेकतात.यूरोप आणि अफ्रीका मध्ये विवाहाच्या वेळेस दुष्टात्म्यांना मारून पळवून लावण्यासाठी बाण फेंकले जातात आणि बंदुकांचे बार काढतात. अंधकारपूर्ण स्थाने ही दुष्टात्म्याची निवासस्थाने असतात. त्यासाठी विवाहामध्ये अग्नीच्या प्रयोगाने यांचे निर्दालन करतात. विवाहाच्या वेळेस वर तलवार इत्यादी धारण करतो. इंग्लंडमध्ये वधूने दुष्टात्म्यांना पळवून लावण्यासाठी समर्थ समजली जाणारी घोड्याची नाल घेऊन जाण्याचा विधी आहे. तिसरी पायरी ही उर्वरताची प्रतीक आणि संतानसमृद्धीची कामना सूचित करते. भारत, चीन, मलाया मध्ये वधू वर तांदूळ, धान्य तथा फळे टाकण्याचा विधी प्रचलित आहे. ज्या प्रकारे अन्नाचा एक दाणा अनेक नवीन दाणे पैदा करतो त्या प्रकारे वधूकडून प्रचुर संख्येमध्ये संतती उत्पन्न करणयाची आशा ठेवली जाते. स्लाव देशात वधूच्या मांडीवर याच उद्देश्याने मुलगा बसवला जातो. चौथ्या पायरीवरच्या विधी वधू-वराचे ऐक्य आणि अभिन्नतेला सूचित करते. दक्षिणी सेलीबीजमध्ये वर वधूच्या वस्त्रांना शिवून त्यावर एक कापड टाकतो. भारतात आणि इराणमध्ये प्रचलित असलेल्या वस्त्राची गाठ बांधण्याच्या पद्धतीचा पण हाच उद्देश आहे.
विवाहाचा कालावधी आणि तलाक या विषयावर मानव समाजाच्या विभिन्न भागात मोठा वैविध्य दृष्टिगोचर होतो. वेस्टरमार्कच्या मतानुसार सभ्यताच्या निम्न स्तर मध्ये राहीलेली, आखेट आणि आरंभिक कृषि ने जीवनयापन करणारी श्रीलंकाच्या बेद्दा तथा अंडेमान आदिवासी जाती मधील विवाह नंतर पतिपत्नी मृत्यूपर्यत एकत्र येतात आणि त्यांच्यात घटस्फोट होत नाही. ज्या समाजात विवाहला धार्मिक संस्कार मानले जाते त्यांच्यात विवाह अविच्छेद्य संबंध मानले जाते. हिंदू आणि रोमन कॅथाॅलिक इसाई समाज हे याचे सुंदर उदाहरण आहे. परंतु विवाहविच्छेद किंवा घटस्फोटाच्या नियमांविषयी अत्यधिक भिन्नता असूनही काही मूलभूत सिद्धांतांत समानता आहे. विवाह मुख्य रूपाने संततिप्राप्ती आणि दांपत्य संबंधांसाठी केले जातात. परंतु जर काही विवाहांमध्ये हे प्राप्त नाही झाले तर दांपत्य जीवनाला नरकीय किंवा असफल बनवण्यापेक्षा विवाहविच्छेदाची अनुमति दिली गेली पाहिजे. या व्यवस्थेचा दुरुपयोग होऊ नये या दृष्टीने घटस्फोटाचे अधिकार अनेक प्रतिबंधक नियमानुसार विशेष अवस्थेमध्ये दिले जातात. घटस्फोटचा मुख्य आधार व्यभिचार आहे, कारण हे वैवाहिक जीवनाच्या मूळावरच आघात करणारा आहे. याव्यतिरिक्त काही अन्य कारणेपण आहेत.
विवाहचे भविष्य प्लेटोच्या वेळेपासून विचारक विवाह प्रथाच्या समाप्तिची तथा राज्य द्वारे मुलांच्या पालन पोषणाती कल्पना करत आहेत. वर्तमान काळात औद्योगिक आणि वैज्ञानिक परिवर्तनांनी तथा पश्चिमी देशांमध्ये घटस्फोटची वाढती भयावह संख्येच्या आधारे विवाह संस्थाच्या लोप बाबत भविष्यवाणी करणारे लोकांची कमी नाही आहे. यात काही संदेह नाही की या वेळी विवाहच्या परंपरागत स्वरूपात अनेक कारणांनी मोठे परिवर्तन येत आहे विवाहला धार्मिक बंधनाच्या जागी कानूनी बंधन आणि पति-पत्नीचा वैयक्तिक मसला मानण्याची प्रवृत्ति वाढली आहे. औद्योगिक क्रांति आणि शिक्षाच्या प्रसाराने स्त्रिया आर्थिक दृष्टि ने स्वावलंबी बनत आहे. पहिले त्यांच्या सुखमय जीवनयापनाचा एकमात्र साधन विवाह होता पण आता अशी स्थिति राहिली नाही विवाह आणि घटस्फोटचे नवीन कायदे दांपत्य अधिकारांमध्ये नरनारी यांच्या अधिकरांना समान बनवत आहे. धर्मच्या प्रति आस्था ने शिथिलता आणि गर्भनिरोधक साधनांच्या आविष्काराने विवाह विषयक जुनी मान्यतांना प्राग्वैवाहिक सतीत्व आणि पवित्रताला मोठा धक्का दिला आहे परंतु हे सर्व परिवर्तन होत असून भविष्यात विवाहप्रथा मध्ये टिकून राहण्यासाठीचे प्रबल कारण हे आहे की या द्वारे काही असे प्रयोजन पूर्ण होतात की जे,अन्य साधन किंवा संस्थेने होत नाही.पहिला प्रयोजन वंशवृद्धि आहे जरी विज्ञानाने कृत्रिम गर्भधारणेचा आविष्कार केला तर कृत्रिम रूप से शिशुंचे प्रयोगशाळेत उत्पादन आणि विकास संभव होउ शकत नाही.दूसरा प्रयोजन संतती पालन, राज्य आणि समाज शिशुशाला आणि बालोद्यानांचे कितीही विकास करू दे पण त्यांच्यात यांच्या सर्वांगीण समुचित विकासासाठीची तशी व्यवस्था संभव नाही जशी विवाह आणि कुटुंब संस्थेत असते. तीसरा प्रयोजन खरे दांपत्य प्रेम आणि सुख प्राप्तिचे आहे हे पण विवाहच्या व्यतिरिक्त कोणत्याही अन्य साधना ने संभव नाही. या प्रयोजनांची पूर्ततेसाठी भविष्यात विवाह एक महत्त्वपूर्ण संस्था म्हणून टिकून राहिल, संभव त्यात काही न काही परिवर्तन होत राहतील.
पति किंवा पत्नीच्या संख्येच्या आधारे विवाहचे तीन रूप मानले गेले आहेत: बहुर्भायता, बहुभर्तृता, एकविवाह.
जेव्हा एक पुरुष एकापेक्षा अधिक स्त्रियांशी विवाह करताे तर याला बहुभार्यता किंवा बहुपत्नीत्व (पोलिजिनी) म्हणतात. एका स्त्रीबरोबर एकापेक्षा जास्त पुरुषांच्या विवाहाला बहुभर्तृता किंवा बहुपतित्व म्हणतात. एका पुरुषाच्या आयुष्यात एका स्त्री बरोबर केलेल्या विवाहाला एक विवाह (?) (मोनोगॅमी) किंवा एकपत्नीव्रत म्हणटले जाते. मानव जातिच्या विभिन्न समाजात यातील पहिले आणि तीसरे रूप जास्त प्रचलित आहे.दूसरे रूप बहुभर्तृताचे प्रचलन खूप कमी आहे. समाजात स्त्रीपुरुषांची संख्या सुमारे समान असल्याचे कारण या अवस्थेत काही पुरुषांद्वारे जास्त स्त्रियांना पत्नी बनवत असल्याने काही पुरुष विवाहापासून वंचित राहून जातात. काही वन्य समाजांत एक मनुष्य द्वारे पत्नी बनवलेल्या स्त्रियांच्या संख्येत प्रतिबंध लावले जातात आणि प्रथेप्रमाणे याला निश्चित केले जाते. भूतपूर्व ब्रिटिश पूर्वी अफ्रीकेच्या वासानिया जाति मध्ये एका पुरुषाला तीन पेक्षा अधिक स्त्रियां बरोबर लैंडू जातित आणि इस्लाम मध्ये चार पेक्षा अधिक स्त्रियांशी, उत्तरी नाइजीरियाच्या कुगंमा जाति मध्ये सहा पेक्षा अधिक स्त्रियां बरोबर विवाह करण्याची अनुमति नाही दिली जात. राजा आणि सरदारांसाठी ही संख्या जास्त कमी होत. पश्चिमी अफ्रीका मध्ये गोल्डकोस्ट बस्तीच्या अशांति नावाचे राज्या मधील राजांसाठी पत्नींची निश्चित सख्या, ३,३३३ होती. राजा लोक या निश्चित संख्यांचे अतिक्रमण आणि उल्लंघन कशा प्रकारे करतात हे सऊदी अरब राज्याच्या संस्थापक इब्न सऊदच्या उदाहरणाने स्पष्ट आहे. इस्लामात चार पेक्षा अधिक स्त्रियांशी विवाह वर्जित आहे अत: इब्न सऊदला जेव्हा कोणत्या नवीन स्त्री बरोबर विवाह करायचे असल्यास तो अापल्या पहिल्या चार पत्नींपैकी कोणत्या एकाला तलाक देत असे. या प्रकारे त्याने चार पत्नीच्या मर्यादाचे पालन करत शंभर पेक्षा अधिक स्त्रियांशी विवाह केला. काही वन्य जातीत सरदारांद्वारे अापल्या समाजच्या जास्त स्त्रियांवर अधिकार करून घेत की काही निर्धन युवा पुरुषांना विवाह साठी वधू प्राप्त होत नाही. आस्ट्रेलियाच्या काही जातीत अशा पुरुषांना जास्त स्त्रिया ठेवणारे व्यक्तिला आव्हान देउून त्या पासून पत्नी प्राप्त करण्याचे अधिकार दिले जाते. बहुभार्यताचे एक विशेष रूप श्याली विवाह (सोरोरल sororal पोलिजिनी) अर्थात् एक पुरुष ने अापल्या पत्नीच्या बहिणींशी विवाह करने आहे. यातील मोठे लाभ शक्यताे सौतिया डाह कमी होने आणि बहिणींनी प्रेमपूर्वक मिळून राहणे हे होते. ही प्रथा अमरीकेतील रेड इंडियन्स मधील जास्त प्रमाणात मिळते.
बहुभर्तृता अथवा एका स्त्री शी अनेक पुरुषांचे विवाह होण्याचा सुप्रसिद्ध प्राचीन भारतीय उदाहरण द्रौपदीचे पाच पांडवांबरोबरचे विवाह. ही परिपाटी अजून ही भारतातील अनेक प्रदेशात- लद्दाख मधील, पंजाबच्या काँगड़ा जिल्हेतील स्पीती लाहौल परगनांमध्ये, चंबाकु, कुल्लू आणि मंडीच्या ऊँचप्रदेशात राहाणारे कानेतों मध्ये, देहरादून जिल्हेतील जौनसार बाबर मध्ये, दक्षिण भारत मध्ये मलाबारचे नायर मध्ये, नीलगिरिचे टोडों, कुरुंबों आणि कोटों या जातीत भारताबाहेर हे काही अमेरिकी इंडियंस मध्ये पाहायला मिळते. याचे दोन मुख्य प्रकार आहेत पहिले प्रकारात एका स्त्रीचे आपसात सख्खे किंवा सावत्र असतात याला भ्रातृक बहुभर्तृता म्हणतात द्रौपदीचे पाची पति भाऊ होते. आजकल या प्रकारच्या बहुभर्तृता देहरादून जिल्ह्यातील जौनसार बावरच्या खस लोकांमध्ये आणि नीलगिरिच्या टोडों मध्ये आहे. मोठ्या भावाचे लग्न झाल्यावर त्याची पत्नी सगळ्या भावांची पत्नी समझली जाते याच्या दूसऱ्या प्रकारात एका स्त्रीच्या अनेक पतिंमध्ये भावाचे संबंध किंवा अन्य कोणत्याही प्रकारचे घनिष्ठ संबंध नाही होत याला अभ्रातृक किंवा मातृसत्ताक बहुभर्तृता म्हणतात. मलावारचे नायर लोकांमध्ये पहिले या प्रकार बहुभर्तृताचे प्रचलन होते.
बहुभर्तृताचे उत्पादक कारणांविषयी समाजशास्त्रज्ञ आणि नृवंशशास्त्रज्ञांमध्ये प्रबल मतभेद आहेत. वैस्टरमार्क ने याचे प्रधान कारण पुरुषांपेक्षा स्त्रियांची संख्या कमी असणे हे सांगितले होते. उदाहरणार्थ नीलगिरिच्या टोडोंमध्ये बालिकावधाची कुप्रथा मुळे एका स्त्री मागे दोन पुरुष झाले, म्हणून तेथे बहुभर्तृताचे प्रचलन स्वाभाविक रूपाने झाले परंतु राबर्ट ब्रिफाल्ट ने हे सिद्ध केले की स्त्रियांची कमी या प्रथेचे एक मात्र कारण नाही आहे. तिब्बत, सिक्किम, लद्दाख, लाहौल इत्यादी बहुभर्तृक प्रथांच्या प्रदेशात स्त्री पुरुषांची संख्या मध्ये जास्त मोठा फरक नाही आहे. कनिंगहॅमच्या मतानुसार लडाखमध्ये स्त्रियांची संख्या पुरुषांपेक्षा जास्त आहे म्हणून सुमनेट, लोर्ड, बेल्यू इत्यादी विद्वान लोकांनी याचे प्रधान कारण निर्धनता हे मानले आहे. सुमनेरने याला तिब्बतच्या उदाहरणाची पुष्टी करत म्हणले आहे की तेथे पैदाइश इतनी कमी होते की एका पुरुषाला कुटुंबाचे पालन संभव होत नाही म्हणून अनेक पुरुष मिळून पत्नी ठेवतात या मुळे संतती पण कमी होते आणि जनसंख्या मर्यादित राहते याचे दोन मुख्य प्रकार आहेत पहले प्रकारात एका स्त्रीचे आपसात सख्खे किंवा सावत्र असतात इसे भ्रातृक बहुभर्तृता म्हणतात द्रौपदीचे पाची पति भाऊ होते.
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.
Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.