२००१ मधील आशुतोष गोवारीकर यांचा चित्रपट From Wikipedia, the free encyclopedia
लगान हा २००१ साली प्रदर्शित झालेला एक हिंदी चित्रपट आहे. आमीर खान प्रॉडक्शन निर्मित हा चित्रपट आशुतोष गोवारीकरने दिग्दर्शित केला होता. अपार उत्सुकता घेउन प्रदर्शित झालेला हा चित्रपट पहिल्या आठवड्यातच प्रेक्षकांना आश्चर्याचा धक्का देउन गेला. चित्रपट नव्हे तर क्रिकेटचा सामना म्हणून बरीच टिका झाली परंतु याच नाविन्याने चित्रपटाला प्रसिद्दी दिली. ब्रिटीशकालीन मध्यभारतातील प्रांतात एका खेड्यातील गावकरी दुष्काळामुळे महसूली करु नका ही विनंती करण्यास अधिकाऱ्यांकडे गेलेले असतात. जुलमी अधिकारी दुष्काळावर मदत देण्याऍवजी आमच्या क्रिकेट खेळाची टिंगलटवाळी करता म्हणून दुप्पट कर (लगान) लावतो व जर समजा या खेळात गावकऱ्यांनी हरवून दाखवले तर तिन वर्षाचा लगान माफ करण्याची पैज् लावतो. गावचा तरुण भुवन हे आव्हान स्वीकारतो. व प्रतिकूल परिस्थितीतून तयारी करून आपल्या संघाला जिकून देतो. अतिशय नाविन्यपूर्ण विषय, कथानकाची प्रभावी मांडणी, ब्रिटीशकालीन ग्रामीण भारताची वातावरण निर्मिती. यामुळे या चित्रपटाला आपार यश मिळाले. भारतातील अनेक पुरस्कार पटकाविले व भारतीय चित्रपटसृष्टीसाठी अत्यंत दुर्मिळ असे ऑस्कर नामांकन पटकावले. मदर इंडिया व सलाम बॉम्बे नंतर हा केवळ तिसरा भारतीय चित्रपट आहे ज्यास ऑस्कर नामांकन लाभले.
लगान | |
---|---|
दिग्दर्शन | आशुतोष गोवारीकर |
निर्मिती | आमिर खान |
कथा | आशुतोष गोवारीकर |
प्रमुख कलाकार | आमिर खान, ग्रेसी सिंग, रेचल शेली |
संगीत | ए.आर. रहमान |
देश | भारत |
भाषा | हिंदी |
प्रदर्शित | १५ जून २००१ |
अवधी | २२४ मिनिटे |
निर्मिती खर्च | २५ कोटी |
एकूण उत्पन्न | ५७.८ कोटी |
खालील मजकूरात कथानक उघड केलेले असण्याची शक्यता आहे. |
चित्रपटातील नायक भुवन हा चंपानेर गावचा गावकरी असतो. चंपानेर हे मध्य भारतातील एक काल्पनिक खेडे चित्रित केले आहे. या प्रांतात कित्येक वर्षे पाउस न झाल्याने गावात दुष्काळ पडलेला असतो. त्यामुळे गावातील लोक चिंतेत असतात. गावाच्या बाहेर ब्रिटीशांची छावणी असते व कॅप्टन रसेल हा तिथला अधिकारी असतो. एकेदिवशी कॅप्टन रसेल शिकार करत असताना भुवन कॅप्टन रसेलचे सावज पळवून लावतो. तेव्हापासून रसेल व भुवनमध्ये एक विचित्र आढा निर्माण झालेला असतो. कॅप्टन रसेल हा अधिकारी दिवसेंदिवस अधिकाधिक मस्तवाल होत असतो. एके दिवशी चंपानेरचे महाराजांचाही तो जबरदस्ती मांस खाण्याची आदेश देउन त्यांचा अपमान करतो. संपूर्ण प्रांत राजापासून रंकापर्यंत कॅप्टन रसेलच्या मस्तवालपणाचा व दहशतीचा सामना करत असतात.
ह्या व्यतिरिक्त लगानला सर्वोत्तम विदेशी भाषिक चित्रपटासाठीच्या ऑस्कर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते परंतु हा पुरस्कार मिळवण्यात त्याला अपयश आले.
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.
Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.