रोझ बोल हे वेस्ट एंड, हँपशायर, इंग्लंड येथे एम२७ मोटरवे आणि टेलिग्राफ वूड्सच्या मध्ये असलेले क्रिकेट मैदान आहे. हे मैदान हँपशायर काउंटी क्रिकेट क्लबचे घरचे मैदान आहे, जे येथे २००१ पासून खेळतात.

जलद तथ्य मैदान माहिती, स्थान ...
रोझ बोल
Thumb
पॅव्हिलीयनच्या आजूबाजूचे इस्ट आणि वेस्ट स्टँड्स
मैदान माहिती
स्थान वेस्ट एंड, हँपशायर
स्थापना २००१
आसनक्षमता १६,५०० (तात्पुरत्या आसनांसहित २०,०००)
मालक इस्टलेघ बोरो

प्रथम क.सा. १६-२० जून २०११:
इंग्लंड  वि. श्रीलंका
अंतिम क.सा. २७-३१ जुलै २०१४:
इंग्लंड  वि. भारत
प्रथम ए.सा. १० जुलै २००३:
दक्षिण आफ्रिका वि. झिम्बाब्वे
अंतिम ए.सा. १४ जुलै २०१५:
इंग्लंड वि. न्यू झीलंड
प्रथम २०-२० १३ जुलै २००५:
इंग्लंड वि. ऑस्ट्रेलिया
अंतिम २०-२० २९ ऑगस्ट २०१३:
इंग्लंड वि. ऑस्ट्रेलिया
यजमान संघ माहिती
हँपशायर (२००१ - सद्य)
हँपशायर क्रिकेट बोर्ड (२००१)
शेवटचा बदल १ जुलै २०१६
स्रोत: इएसपीन क्रिकइन्फो (इंग्लिश मजकूर)
बंद करा

हँपशायरसाठी बदली मैदान म्हणून हे मैदान बांधण्यात आले, यापुर्वी साउथहँप्टन येथील काउंटी मैदान हे त्यांचे १८८५ पासूनचे घरचे मैदान होते. हँपशायर ह्या मैदानावर त्याचा पहिला प्रथम-श्रेणी सामना ९-११ मे २०११ दरम्यान वूस्टरशायरविरूद्ध खेळले, ज्या सामन्यात हँपशायरने १२४ धावांनी विजय मिळवाल. तेव्हा पासून तेथे आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळवले जाते. मैदानावर एकदिवसीय क्रिकेटशिवाय २००४ चँपियन्स ट्रॉफीचे काही सामने खेळवले गेले होते. दोन आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यांशिवाय येथे २०११ आणि २०१२ मध्ये येथे कसोटी सामने सुद्धा खेळवण्यात आले आहेत.

कसोटी क्रिकेट खेळवण्याच्या उद्दीष्टाने २००९ पासून मैदानाचा पुनर्विकास सुरू झाला होता. ज्यादरम्यान मैदानाची प्रेक्षकक्षमता वाढवण्यात आली. २०११ मध्ये हँपशायरला आर्थिक चणचण जाणवू लागली आणि त्यामुळे मैदान इस्टलेघ बोरो काउन्सिलला £6.5 दशलक्ष इतक्या किंमतीमध्ये २०१२ साली विकले गेले.

Thumb
पुनर्विकासानंतर, २०१० फ्रेंड्स प्रोव्हिडंट टी२० अंतिम सामन्याच्या वेळी पॅनोरमा

मैदानच्या प्रतिमा

पुनर्विकासाआधी

पुनर्विकासानंतर

Wikiwand in your browser!

Seamless Wikipedia browsing. On steroids.

Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.

Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.