राष्ट्रीय महामार्ग ४ (जुने क्रमांकन)
From Wikipedia, the free encyclopedia
राष्ट्रीय महामार्ग ४ हा भारतातील एक प्रमुख राष्ट्रीय महामार्ग आहे. १२३५ किमी धावणारा हा महामार्ग मुंबई व चेन्नई ह्या दोन महानगरांना जोडतो[१]. पुणे, सातारा, कोल्हापूर, बेळगाव, हुबळी, चित्रदुर्ग व बंगळूर ही रा. म. ४ वरील काही महत्त्वाची शहरे आहेत. रा. म. ४ हा भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने हाती घेतलेल्या सुवर्ण चतुष्कोण प्रकल्पाचा एक भाग आहे. मुंबई–पुणे द्रुतगतीमार्ग (भारताच्या पहिला द्रुतगतीमार्ग) हा रा. म. ४चा एक भाग आहे.
![]() | |
लांबी | १,२३५ किमी |
सुरुवात | मुंबई, महाराष्ट्र |
मुख्य शहरे | मुंबई - पुणे - कोल्हापूर - बेळगाव - हुबळी - बंगळूर - चेन्नई |
शेवट | चेन्नई, तामिळनाडू |
जुळणारे प्रमुख महामार्ग |
रा. म. ३ - ठाणे रा. म. ८ - मुंबई शीव पनवेल महामार्ग - कळंबोली रा. म. १७ - पनवेल रा. म. ९ - पुणे रा. म. ५० - पुणे रा. म. ६३ - हुबळी रा. म. १३ - चित्रदुर्ग रा. म. २०८ - तुमकूर रा. म. ४८ - बंगळूर रा. म. ७ - बंगळूर रा. म. २०९ - बंगळूर रा. म. १८ - चित्तूर रा. म. ५ - चेन्नई रा. म. ४५ - चेन्नई रा. म. २०५ - चेन्नई |
राज्ये |
महाराष्ट्र: ३७१ किमी कर्नाटक: ६५८ किमी आंध्र प्रदेश: ८३ किमी तामिळनाडू: १३३ किमी |
रा.म. – यादी – भाराराप्रा – एन.एच.डी.पी. | |
शहरे व गावे

राष्ट्रीय राजमार्ग विकास परियोजना
- ह्या महामार्गावरील चेन्नई ते ठाणे येथील रा मा ३शी तिठ्यापर्यंतचा १,०५०.७५ किमीचा पट्टा भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने हाती घेतलेल्या राष्ट्रीय राजमार्ग विकास परियोजने अनुसार सुवर्ण चतुष्कोण प्रकल्पाचा एक भाग आहे.[२]
- ह्या महामार्गाचा ३.५ किमीचा पट्टा भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने हाती घेतलेल्या राष्ट्रीय राजमार्ग विकास परियोजने अनुसार बंदर जोड प्रकल्पाचा एक भाग आहे.[३]
हे सुद्धा पहा
संदर्भ
बाह्य दुवे
Wikiwand - on
Seamless Wikipedia browsing. On steroids.