राजू शेट्टी

भारतीय राजकारणी From Wikipedia, the free encyclopedia

राजू शेट्टी (१ जून इ.स. १९६७;शिरोळ, कोल्हापूर) हे स्वाभिमानी पक्षाचे संस्थापक आणि १५ व्या लोकसभेचे खासदार आहेत.[१] [२] शेतकऱ्यांना सहकारी कारखान्यांनी ऊस आणि दूध यांसाठी चांगली किंमत द्यावी यासाठी त्यांचे आंदोलन सुरू आहे. [३]

जलद तथ्य मतदारसंघ, जन्म ...
राजू शेट्टी

विद्यमान
पदग्रहण
इ.स. २००९
मतदारसंघ हातकणंगले

जन्म १ जून इ.स. १९६७
शिरोळ, कोल्हापूर
राजकीय पक्ष स्वाभिमानी पक्ष
पत्नी सौ. संगीता शेट्टी
निवास शिरोळ
गुरुकुल जे.जे. मगदूम पॉलिटेकनीक (यंत्र अभियांत्रिकी पदविका)
व्यवसाय शेतकरी
संकेतस्थळ http://www.swabhimani.com/
बंद करा

कारकीर्द

राजू शेट्टी सुरुवातीला जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत पहिल्याच प्रयत्नात निवडून आले. नंतर शिरोळ मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून येताना राजेंद्र पाटील आणि रजनी मगदूम यांचा पराभव केला होता. इ.स.२००९ च्या ऑक्टोबर महिन्यातील निवडणुकीत हातकणंगले मतदारसंघातून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आमदार राजू शेट्टी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार निवेदिता माने यांना ९५ हजार ६० मतांनी पराभूत करून धक्का दिला.[१]

पुरस्कार

  • लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर २०११ [४]

बाह्य दुवे

संदर्भ

Loading related searches...

Wikiwand - on

Seamless Wikipedia browsing. On steroids.