रंगपंचमी

होळीशी संंबंंधित उत्सव From Wikipedia, the free encyclopedia

रंगपंचमी

रंगपंचमी हा एक सण आहे. फाल्गुन कृष्ण पंचमी या तिथीला रंगपंचमी हा सण साजरा केला जातो.[1] धूलिवंदनापासून सुरू होणाऱ्या वसंतोत्सवाला रंगपंचमीच्या दिवशी पाच दिवस पूर्ण होतात. रंगपंचमी म्हणजे रंगांचा सण.[2] या दिवशी एकमेकांंना वेगवेगळे रंंग लावून आनंंदोत्सव साजरा केला जातो.[3]

Thumb
भारतातील होळी उत्सवात रंग खेळताना
Thumb
कृष्ण गोपिकांसमवेत रंग खेळताना

इतिहास

द्वापरयुगात गोकुळात बाल/कुमार कृष्ण आपल्या गोपाळ सवंगड्यांवर पिचकारीने रंगीत पाणी उडवीत असे व उन्हाची तलखी कमी करीत असे. तीच प्रथा आजही रंगपंचमीच्या रूपाने चालू आहे.[1] मध्ययुगात संस्थानिक, राजे हे होळी आणि रंगपंचमी सण साजरा करीत असत.[4][5][6] राधा आणि कृष्ण यांनी या दिवशी एकत्र रंग खेळण्याचा आनंद घेतला अशी धारणा आहे. या दिवशी कृष्णासह राधेची पूजाही केली जाते.[7]

महत्त्व

रंगपंचमी हा वसंत ऋतूशी संबंधित महत्त्वाचा सण आहे. उन्हाळ्याच्या सुरुवातीला हा सण साजरा केला जातो. उन्हाचा तडाखा कमी व्हावा आणि थंडावा मिळावा यासाठी एकमेकांच्या अंगावर पाणी उडविण्याची रीत आहे.[8]

स्वरूप

संपूर्ण भारतामध्येरंगपंचमीचा सण साजरा केला जातो.[9]

देशाच्या काही भागात या लोकप्रिय सणाला धार्मिकदृष्ट्या विशेष महत्त्व आहे. वसंत पंचमीच्या दिवशी बलराम मंदिरात या उत्सवाची सुरुवात होते. या दिवशी होळीशी संबंधित लोकगीते गायली जातात.[8] व्रज प्रांतात कृष्ण आणि बलराम होळीच्या सणाचा आनंद घेत असत असे मानले जात असल्याने, उत्तर प्रदेशात होळीचा आनंद घेण्याला धार्मिक महत्त्वही आहे.[8]

या भागात दुलहंडी असे या उत्सवाला संबोधिले जाते. दीर आणि नणंद यांच्यासह रंगाच्या खेळाचा आनंद घेण्याची पद्धती येथे प्रचलित आहे.[10]

मध्य प्रदेशात होळीच्या निमित्त गायल्या जाणा-या गीतांना फाग असे म्हणतात.[11] राधा- कृष्ण, राम-सीता, शंकर-पार्वती या देवताना उद्देशून रचलेली फाग गीते प्रसिद्ध आहेत. या गीतांची उत्पत्ती बुंदेलखंड येथे झाली असे मानले जाते.[12] शिव मंदिरात जाऊन भाविक विशेष उत्सवी पूजा देवाला अर्पण करतात.[13]

सद्यस्थिती

रासायनिक रंंगांंचे दुष्परिणाम पाहता नैसर्गिक रंंग वापरून हा दिवस साजरा करण्याचे प्रमाणही अलीकडील काळात वाढलेले दिसून येते. या दिवशी लोक भरपूर रंग खेळून आनंद अनुभवतात.

फुलांच्या पाकळ्या, मेंदी, गुलमोहराची पाने, टोमॅटो, हळद, डाळीचे पीठ,हळद, बीट अशा नैसर्गिक पदार्थांपासून रंग तयार केले जातात.[14]

चित्रदालन

संदर्भ

Loading related searches...

Wikiwand - on

Seamless Wikipedia browsing. On steroids.