येसूबाई भोसले
छत्रपती संभाजी महाराजांच्या पत्नी आणि मराठा साम्राज्याच्या महाराणी From Wikipedia, the free encyclopedia
Remove ads
महाराणी येसूबाई ह्या छत्रपती संभाजी महाराज यांच्या पत्नी होत्या. त्या मराठा साम्राज्याच्या द्वितीय अभिषिक्त महाराणी होत्या. या मराठा साम्राज्याचे(स्वराज्याचे) संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सूनबाई होत्या. त्यांचे माहेर शृंगारपूर हे होते. त्यांचे माहेरचे आडनांव शिर्के होते. त्यांचे लग्नापूर्वीचे नाव राजाऊ होते. महाराणी येसूबाई साहेब या मराठा साम्राज्याचे पाचवे छत्रपती सम्राट शाहू महाराज यांच्या मातोश्री होत्या. त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याच्या कुलमुखत्यार पदाची शिक्के कट्यार प्रधान केले होते. त्या स्वराज्याच्या पहिल्या कुलमुखत्यार होत्या.
विकिपीडियातील इतिहासविषयक लेखात पाळावयाचे लेखनसंकेत
Remove ads
छत्रपती शिवाजी महाराजांची ज्येष्ठ सूनबाई, छत्रपती संभाजी महाराजांची महाराणी आणि प्रजाजनांचे आदरस्थान, अशा महाराणी येसूबाईसाहेबांच्या जीवनात जेवढी संकटे आली तेवढी राजघराण्यातील कोणत्याही स्त्रीवर आली नसावीत. एवढे सर्व राजवैभव असूनही आयुष्यात दुर्दैव त्यांच्या पाठीशी लागले आणि सुमारे तीस वर्षे मराठयांच्या या महाराणीला शत्रूच्या बंदिवासात जीवन कंठावे लागले.
पण महाराणी येसूबाईसाहेबांनी ज्या धैर्याने आणि कणखर वृत्तीने त्या खडतर जीवनाला तोंड दिले, त्याला इतिहासात तोड नाही. राजेभोसले घराण्यात सून शोभेल असेच त्या शेवटपर्यंत वागल्या.
महाराणी येसूबाईसाहेबांची मान्यता मोठी होती या थोर स्त्रीबाबत मराठेमंडळींत मोठा पूज्यभाव होता.
४ जुलै १७१९ ला राजमाता येसूबाईसाहेब मोगलांच्या कैदेतून दिल्लीहून दक्षिणेत परत आल्या. त्यांचा मृत्यू सुमारे १७३१ च्या सुमारास झाला असावा.
Remove ads
कुटुंब
पिलाजीराव शिर्के हे महाराणी येसूबाई यांचे वडील होते. ते मराठा साम्राज्याचे सेनानी होते.
चरित्रे
- जिद्दीने राज्य राखिले (संभाजीची पत्नी महाराणी येसूबाई हिच्या आयु़्ष्यावरील कादंबरी, लेखिका - नयनतारा देसाई)
- महाराणी येसूबाई (डॉ. मीना मिराशी)
- महाराज्ञी येसूबाई (डॉ. सदाशिव शिवदे)
- महाराणी येसूबाई (सुवर्णा नाईक निंबाळकर)
चित्रपट
- महाराणी येसूबाई (१९५४). प्रमुख भूमिका : सुलोचना, रमेश देव; दिग्दर्शक : भालजी पेंढारकर
Wikiwand - on
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Remove ads