From Wikipedia, the free encyclopedia
युरोपीय मराठी संमेलनाची सुरुवात नेदरलॅन्ड्ज़मधील डॉ. आनंद आणि श्रीमती विजया पांडव यांनी केली. पहिले संमेलन ॲमस्टरडॅमजवळच्या बिएसबॉश या गावी इ. १९९८मध्ये झाले. इंग्लंडमधल्या असंख्य मराठीभाषकांनी या संमेलनाला हजर राहून आपला पाठिंबा दर्शविला. त्या वर्षापासून हे युरोपीय मराठी संमेलन दर दोन वर्षांनी युरोपातील वेगवेगळ्या देशांत भरते. ज्या वर्षी अमेरिकेतील बृहन्महाराष्ट्र मंडळाचे संमेलन असते, त्या वर्षी हे संमेलन होत नाही. त्यामुळे युरोपातील मराठीभाषकांना या दोन्ही संमेलनांना उपस्थित राहणे शक्य होते.
सचिन पिळगांवकरांनी २०१२ सालच्या कार्डिफ (वेल्स) येथील संमेलनादरम्यान सुचवल्याप्रमाणे या संमेलनाचे नाव २०१४ सालापासून 'युरोपीय मराठी स्नेह-संमेलन' असे करण्यात आले आहे. २०१४ सालचे स्नेहसंमेलन स्कॉटलंडमधील ॲबरडन येथे १८ ते २० एप्रिल या तारखांना झाले.
Seamless Wikipedia browsing. On steroids.