Remove ads
अमेरिका देशातील एक प्रमुख विमान वाहतूक कंपनी From Wikipedia, the free encyclopedia
यू.एस. एरवेझ ही अमेरिका देशामधील एक प्रमुख विमान वाहतूक कंपनी होती. फेब्रुवारी २०१३ मध्ये अमेरिकन एरलाइन्स व यू.एस. एरवेझ ह्यांचे एकत्रीकरण होऊन जगातील सर्वात मोठ्या विमानकंपनीची स्थापना केली गेली. एकत्रित विमानकंपनी अमेरिकन एरलाइन्स ह्याच नावाने कार्यभार चालवेल. ८ एप्रिल २०१५ रोजी दोन्ही कंपन्यांचे अधिकृतपणे एकत्रीकरण पूर्ण झाले.
| ||||
स्थापना | १९३७ | |||
---|---|---|---|---|
मुख्य शहरे |
शार्लट डग्लस आंतरराष्ट्रीय विमानतळ फिलाडेल्फिया आंतरराष्ट्रीय विमानतळ फीनिक्स स्काय हार्बर आंतरराष्ट्रीय विमानतळ रॉनल्ड रेगन वॉशिंग्टन नॅशनल विमानतळ | |||
फ्रिक्वेंट फ्लायर |
Dividend Miles (1997-2015) AAdvantage (2015-) | |||
अलायन्स |
स्टार अलायन्स (२००४-२०१४) वनवर्ल्ड (सहकारी: २०१४-) | |||
विमान संख्या | ३३८ | |||
गंतव्यस्थाने | १९३ | |||
ब्रीदवाक्य | Fly with US | |||
पालक कंपनी | अमेरिकन एअरलाइन्स | |||
मुख्यालय | फोर्ट वर्थ, टेक्सास |
यूएस एरवेझ ही पूर्वी यूएस एर मुख्य एरलाइन म्हणून ओळखली जात होती. ती अमेरिकन फेडरल एविएशन ॲडमिनिष्ट्रेशनने यूएस एरलाइन आणि अमेरिकन एरलाइनना ८ एप्रिल २०१५ रोजी सिंगल ऑपरेटिंग सर्टिफिकेट(SOC) दिल्यानंतर बंद झाली. या दोन्हीची आरक्षण पद्दत आणि बुकिंग पद्दत दि. १७ ऑक्टोबर २०१५ रोजी या विमान सेवांचे एकत्रीकरण झाल्यानंतर एकत्रीकरण विचारात घेतले तरीसुद्दा इतर बाबी त्या क्षणांपर्यंत जशाच्या तशाच राहिल्या. यांची विमान सेवा आंतरराष्ट्रीय आणि अंतरदेशीय अशा दोन्ही ठिकाणी विशालकाय दूरवर पसरलेली आहे त्यात उत्तर अमेरिका,दक्षिण अमेरिका,यूरोप,मध्य पूर्व या खंडातील २४ देशातील १९३ आगमन ठिकाणांचा यात समावेश आहे. मार्च २०१४ मध्ये या एरलाइनने “वनवर्ल्डची” सभासद झाली तत्पूर्वी ही स्टार अलायन्सची सभासद होती.[१] ही एरलाइन व्यवसायासाठी ३४३ जातीचे मेनलाइन जेट विमान, तसेच २७८ रिजिनल जेट,आणि टूर्बो प्रोप विमान करार पद्दतीने वापरते. सहाय्यक एरलाइन यूएस एरवेझ एक्सप्रेस व्हाया कोड शेरिंग करारावर वापरतात.
यूएस एरवेझ विमान कंपनीची स्थापना दू फॉन्ट फॅमिली मधील रिचर्ड सी.दू फॉन्ट, आणि आलेक्षीस फेलीक्ष्दु फॉन्ट, जुनीयर या दोघा बंधूंनी आणि स्टेवण गार्डनर या सीईओ यांनी केली आहे असे ऑल अमेरिकन एविएशन या इतिहासात सापडले आहे. यांचे मुख्य कार्यालय पिट्सबर्ग येथे होते. सन १९३९ मध्ये ही कंपनी ओहीओ रिव्हर व्हॅली मध्ये काम करत होती. सन १९४९ मध्ये या कंपनीने तिचे नाव अमेरिकन एरवेझ असे बदलले आणि त्यांनी टपाल सेवा बंद करून प्रवाशी सेवा सुरू केली. आणि ही सन १९५३ मध्ये अल्लेघेणी एरलाइन्स झाली.[२] सन १९७० मध्ये प्रवाश्यांच्या नाराजीमुळे या कंपनीचे अॅगनी एर असे टोपणनाव मिळाले.
या विमान कंपनीची विविध घोषवाक्ये त्या त्या परिस्थितीत तयार झाली ती खालील प्रमाणे आहेत.
जून २०१४ मध्ये या विमान कंपनीचे खालील विमान कंपनीशी कायदेशीर करार झालेले आहेत.[३]
यूरोप, मध्य पूर्व, दक्षिण अमेरिका या दूरच्या प्रवासासाठी विमानात तीन प्रकारची व्यवस्था आहे.[४] एर बस A300-200 आणि A330-300s मध्ये आसन व्यवस्थेचा आकार 1-2-1 हा हेरिंग माशाचे सापल्यासारखा आहे. ही आसन व्यवस्था प्रवाश्यांना अतिशय लाभदायक आहे.[५]आंतरराष्ट्रीय बोइंग 757-200s या विमानातील १६५ अंश कोणात बसविलेली आसन व्यवस्था देखील प्रवाश्यांना अतिशय समाधान देते. सर्व विमानात खानपान, मदिरा व्यवस्था मोफत उपलब्ध आहे.
सन २०१५ मध्ये अमेरिकन एरलाइन्सचे आंतरराष्ट्रीय विमान सेवेतील कॅनडा मेक्सिको, करेबियन, आणि मध्य अमेरिकेत जाणाऱ्या विमानातील प्रीमियन केबिनला व्यवसाय वर्ग म्हणून संबोधिले आहे.
५० आसन व्यवस्थेपेक्षा जादा व्यवस्था असणाऱ्या अंतरदेशीय विमाने तसेच यूएस एरवेझ एक्सप्रेस विमानात प्रीमियम केबिन व्यवस्था आहे. तेथे आरामदायक आसन व्यवस्था आहे. तसेच सर्व विमानात वाइन, बीयर,दारू, अल्पोप आहार, मोफत दिला जातो. जी विमाने २.५ तासापेक्षा जादा वेळ उड्डाण करतात त्यात जेवण, गरम कपडे दिले जातात.
सर्व विमानात आरामदायक आसनव्यवस्थेसह मुख्य केबिन आहे. जी आंतरदेशीय विमाने ३.५ तास किंवा त्यापेक्षा जादा प्रवास करतात त्या विमानातील प्रवाशी विमानात पूर्ण जेवण खरेदी करू शकतात.तसेच त्यापेक्षा कमी प्रवासातील प्रवाशांना अल्पोप अहार बॉक्स मिळू शकते. मद्य विकत मिळू शकते. चहा/कॉफी, थंडपेय मोफत मिळते. Transatlantic आणि दक्षिण अमेरिकन विमानात उच्च प्रतीचे जेवण, मदिरा, वाइन,मोफत आहे. खरेदी करून मदिरेसह प्रीमियन जेवण खरेदीने उपलब्ध आहे.[६]
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.
Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.