ययाति

From Wikipedia, the free encyclopedia

ययाति

ययाति हे एक पौराणिक पुत्र असून हा प्राचीन भारतातील चक्रवर्ती सम्राट होता. तो पांंडव आणि यदुवंशीयांचा पूर्वज सुद्धा होता. प्रयाग जवळील प्रति ही त्याची राजधानी होती.

जलद तथ्य Emperor Yayati.jpg ...
Emperor Yayati.jpg
Thumb
सम्राट ययाति चे रेखाचित्र
राज्यव्याप्ती भारत वर्ष
राजधानी प्रतिष्ठान
पूर्वाधिकारी नहुष
उत्तराधिकारी पुरु
वडील नहुष
आई अशोक सुंंदरी
पत्नी देवयानी
इतर पत्नी शर्मिष्ठा
संतती यदु, तुर्वसू, अनु, दृह्यु व पूरू (मुले) आणि माधवी (मुलगी)
राजघराणे सोमवंशी
बंद करा

एकेकाळी इंद्रपद भोगलेला राजा नहुष आणि शिव-पार्वतीची मुलगी अशोक सुंंदरी यांच्यापोटी ययातिचा जन्म झाला.[] त्याचा मोठा भाऊ यती हा संन्यासी वृत्तीचा असल्यामुळे नहुष नंतर ययातिला राज्यपद मिळाले. कालांतराने ययातिचे लग्न देवयानी सोबत झाले. देवयानी ही असूर गुरू शुक्राचार्यची मुलगी होती आणि देवयानीची दासी राजकुमारी शर्मिष्ठा होती. देवयानी आणि ययाति यांना यदू व तुर्वसू अशी दोन मुले झाली.[] त्याच सोबत ययाति आणि शर्मिष्ठा यांच्यात प्रेमसंबंध निर्माण होऊन त्यांना अनू, द्रुह्यू व पुरु अशी तीन मुले झाली. देवयानीला जेव्हा ही गोष्ट समजली तेव्हा तिने आपल्या पित्याला म्हणजे शुक्राचार्यांना सर्व वृत्तांत सांगितला. मग शुक्राचार्यांनी रागात येऊन ययातिला पुरुषत्व जाऊन वार्धक्याचा शाप दिला.[] कामभाव नष्ट न झाल्याने ययातीने आपल्या मुलांना वार्धक्य घेऊन त्यांचे तारुण्य मागितले. चारही मुलांनी नकार दिला, परंतु पुरुने मात्र या गोष्टीला होकार दिला. आणि पुढील एक हजार वर्षे ययातीने तारुण्य, तर पुरुने वृद्धत्व सुद्धा भोगले आणि शेवटी पश्चात-बुद्धी होऊन ययातीने आपलं वृद्धत्व वापस घेतले आणि तपश्चर्या करून कालांतराने स्वर्गप्राप्ती मिळवली. देवयानीचा पुत्र यदू व शर्मिष्ठाचा पुत्र पुरु यांच्यापासून अनुक्रमे यादव आणि पौरव या विख्यात वंशशाखा निर्माण झाल्या. याच ययाति राजाचा बळीभद्र राजा नावाचा एक वंशज होता , त्याला आगलिका नावाची एक राणी होती, त्यांना उत्तरेत आगळा नावाचा राजकुमार झाला, पुढे बळीभद्र राजाच्या पश्चात त्यांचे कुटुंबीय दक्षिणेत गोदावरी नदीच्या खोऱ्यात पैठण व मुंगी ह्या गावी आले, आणि ह्याच आगळाचे वंशज म्हणजे आजचा आपला आगरी समाज जो सध्या स्थितीत मुंबई शहर,साष्टी , ठाणे,पालघर, नाशिक,रायगड जिल्हात राहतात, मुंबई शहरातील परळ येथे जन्मलेले कुमार धिरज प्रभाकर भोईर यांचे सध्याचे वंशज आहेत. []

हे सुद्धा पहा

संदर्भ

Loading related searches...

Wikiwand - on

Seamless Wikipedia browsing. On steroids.