मेदक जिल्हा

भारताच्या आंध्र प्रदेश राज्यातील एक जिल्हा. From Wikipedia, the free encyclopedia

मेदक जिल्हा

मेदक हा भारताच्या तेलंगणा राज्यामधील एक जिल्हा आहे. मेदक येथे ह्या जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे. २०१४ सालापूर्वी मेडक जिल्हा आंध्र प्रदेश राज्याच्या अखत्यारीमध्ये होता. २०१६ साली मेडक जिल्ह्यामधून संगारेड्डी जिल्हा वेगळा करण्यात आला.

जलद तथ्य
मेदक जिल्हा
మెదక్ జిల్లా (तेलुगु)
तेलंगणा राज्यातील जिल्हा
Thumb
मेदक जिल्हा चे स्थान
तेलंगणा मधील स्थान
देश  भारत
राज्य तेलंगणा
मुख्यालय मेडक
मंडळ २०
क्षेत्रफळ
 - एकूण २,७८६ चौरस किमी (१,०७६ चौ. मैल)
भाषा
 - अधिकृत भाषा तेलुगु
लोकसंख्या
-एकूण ७,६७,४२८ (२०११)
-लोकसंख्या घनता २७५ प्रति चौरस किमी (७१० /चौ. मैल)
-शहरी लोकसंख्या ७.६७%
-साक्षरता दर ५६.१२%
-लिंग गुणोत्तर १०००/ १०२७ /
प्रशासन
-लोकसभा मतदारसंघ मेदक आणि नरसापूर
पर्जन्य
-वार्षिक पर्जन्यमान ८३७.६ मिलीमीटर (३२.९८ इंच)
वाहन नोंदणी TS35
संकेतस्थळ
बंद करा
Thumb
मेदकमधील भातशेती

२० व्या शतकात मेडक जिल्हा हा स्वातंत्र्यापूर्वी निजाम संस्थानाचा एक भाग होता आणि स्वतंत्र भारतात हैदराबाद राज्यात विलीन झाला आणि सध्या तेलंगणाचा जिल्हा आहे. कुतुबशाहांनी याला गुलशनाबाद असे नाव दिले ज्याचा अर्थ "बागांचे शहर" आहे.

प्रमुख शहर

भूगोल

मेदक जिल्ह्याचे क्षेत्रफळ २,७८६ चौरस किलोमीटर (१,०७६ चौरस मैल) आहे. जिल्‍ह्याच्‍या सीमा संगारेड्डी, कामारेड्डी, सिद्दिपेट आणि मेडचल-मलकाजगिरी जिल्‍ह्यांसह आहेत.

लोकसंख्या

२०११ च्या भारताच्या जनगणनेनुसार, सध्याच्या मेदक जिल्ह्याची लोकसंख्या ७,६७,४२८ आहे, लिंग गुणोत्तर हे १००० पुरुषमागे १०२७ स्त्रिया आहेत. साक्षरता दर ५६.१२% आहे. जिल्ह्यात एकूण लोकसंख्येच्या ७.६७% लोक शहरी भागात राहतात. हा जिल्हा प्रामुख्याने ग्रामीण स्वरूपाचा व मागासलेला आहे.

मंडळ (तहसील)

मेदक जिल्ह्या मध्ये २० मंडळे आहेत: मेदक, नरसापूर आणि तुपरान ही तीन महसूल विभाग आहेत.[]

अधिक माहिती अनुक्रम, मेदक महसूल विभाग ...
अनुक्रम मेदक महसूल विभाग अनुक्रम नरसापूर महसूल विभाग अनुक्रम तुपरान महसुल विभाग
मेदक ११ नरसापूर १६ तुपरान
हवेलीघनपूर १२ कुलचरम १७ चेगुंटा
शंकरमपेठ (नि.) १३ कौडिपल्ली १८ नरसिंगी
पापन्नपेट १४ शिवमपेट १९ एलदुर्ति
रामायमपेटा १५ चिलिपिचेड २० मनोहराबाद
शंकरमपेठ- (अ)
टेकमल
अल्लादुर्ग
रेगोड
१० निजामपेठ
बंद करा

हे सुद्धा पहा

बाह्य दुवे

जलद तथ्य
बंद करा


संदर्भ

Wikiwand - on

Seamless Wikipedia browsing. On steroids.