मुगट

From Wikipedia, the free encyclopedia

मुगट हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्यातील मुदखेड तालुक्यातील एक गाव आहे. हे गाव एका गवळी पाटलाची वस्ती होती असे सांगतात.गावात विविध जाती,धर्माचे लोक राहतात.गावात यादवकालीन मंदिरे आढळून येतात.गावातील लोकांचा प्रमुख व्यवसाय हा शेती, पशुपालन हा आहे. एकूण गावची लोकसंख्या ८०००/- च्या वर आहे.गावात १ली१० पर्यंत शाळा, रुग्णालय,पशुदवाखाना, पोस्ट ऑफिस, मेडिकल स्टोअर्स, तलाठी कार्यालय, राष्ट्रीय बॉक, उपलब्ध आहेत.[१]

जलद तथ्य
  ?मुगट

महाराष्ट्र  भारत
  गाव  
प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
जवळचे शहर मुदखेड, नांदेड
जिल्हा नांदेड जिल्हा
भाषा मराठी
सरपंच सौ.कांताबाई वंजे
बोलीभाषा मराठी
कोड
पिन कोड
आरटीओ कोड

• 431806
• एमएच/२६
बंद करा

भौगोलिक स्थान

हवामान

नैऋत्य मान्सूनमुळे पडणाऱ्या पावसाळ्याचा ऋतू वगळता येथील हवामान सर्वसाधारणपणे कोरडेच असते. येथे वर्षात चार ऋतू असतात. हिवाळा हा नोव्हेंबर ते फेब्रुवारी अखेरपर्यंत असतो. त्यानंतर येणारा उन्हाळा मात्र जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खेचला जातो. नैऋत्य मान्सूनचा पाऊस त्याच्या पाठोपाठ येतो आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत टिकतो. शेष ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा पूर्वार्ध हा मान्सूनोत्तर गरमीचा काळ असतो. सरासरी वार्षिक पर्जन्यमान ९८५ मि.मी.आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडणाऱ्या पावसाचे प्रमाण एकूण वार्षिक पर्जन्याच्या ८५ टक्के आहे. जुलै आणि ऑगस्ट हे वर्षातील सर्वाधिक पर्जन्याचे महिने आहेत.

लोकजीवन

गावातील लोकांचे लोकजीवन शेती वर अवलंबून आहे.

गावातील लोकांचा पोषक धोती,लुगड, प्यांट,साडी असा आहे.लोकांना राहण्यासाठी पक्की घरे आहेत.[२]

प्रेक्षणीय स्थळे

  1. रेल्वे जंक्शन
  2. मातासाहिब (गुजरी जी) गुरुद्वारा
  3. चौमुखी गणपती मंदीर
  4. फुलारी आई मंठ
  5. संत श्री.आत्माराम महाराज बोधीमठ
  6. संत कृष्णा माता
  7. देवगीरबुवा मंठ
  8. हेमाडपंथी महादेव मंदिरे,
  9. आवलीबुवा
  10. उंबरखावली
  11. हनुमान मंदिर
  12. सतीशीळा

नागरी सुविधा

  1. रेल्वेस्थानक
  2. बसस्थानक
  3. ऑटो स्टाफ

जवळपासची गावे

आमदुरा

धनज

सरेगाव

खांबाला

पाथरड

ईजळी

वाडी मुक्ताजी

वाडीनियमतुल्ला

पुणेगाव

ब्राम्हणवाडा

संदर्भ

Wikiwand - on

Seamless Wikipedia browsing. On steroids.