मिसळ

From Wikipedia, the free encyclopedia

कडधान्याच्या रस्सेदार उसळीत शेव, चिवडा, भज्यांचे छोटे तुकडे आणि शिजवलेले पोहे घालून बनलेल्या झणझणीत मिश्रणाला मिसळ म्हणतात. मिसळमध्ये बारीक चिरलेला कांदा घालण्याची पद्धत आहे. पूर्वी ही मिसळ नुसतीच किंवा दह्याबरोबर चमच्याने खाल्ली जात असे. त्यानंतरच्या काळात मिसळ-पाव अधिक प्रचलित झाला आहे. मिसळीबरोबर मठ्ठा आवडीने पितात.

मिसळीचे उगमस्थान नाशिक आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक प्रसिद्ध मिसळ नाशिक येथे मिळते. या व्यतिरिक्त मिसळीकरिता पुणे, सांगली, कोल्हापूर ही गावे देखील प्रसिद्ध आहेत.

गावोगावच्या प्रसिद्ध मिसळी

  • वडोबाची मिसळ
  • मिसळ मंडळ
  • निखारा मिसळ
  • उपवासाची मिसळ
  • पुणेरी मिसळ
  • कोल्हापुरी मिसळ
  • हिरव्या रश्श्याची ग्रीन मिसळ
  • नाशिकची माउली मिसळ
  • मुक्ताई मिसळ Bhivari

इतर माहिती

संदर्भ :

उत्तम मिसळ मिळणारी ५१ ठिकाणे https://marathipahunchar.blogspot.in/2015/06/misal-pav.html

Wikiwand - on

Seamless Wikipedia browsing. On steroids.