हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक विधानसभा मतदारसंघ आहे. From Wikipedia, the free encyclopedia
मावळ विधानसभा मतदारसंघ - २०४ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार मावळ मतदारसंघात पुणे जिल्ह्यातील मावळ तालुका, हवेली तालुक्यातील चिंचवड महसूल मंडळातील देहू सझा, आणि देहू रोड कँटोनमेंट यांचा समावेश होतो. मावळ हा विधानसभा मतदारसंघ मावळ लोकसभा मतदारसंघात मोडतो.[१][२]
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सुनिल शंकरराव शेळके हे मावळ विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[३]
महाराष्ट्र विधानसभा निवडणुक २००९ | ||
---|---|---|
मावळ | ||
उमेदवार | पक्ष | मत |
संजय विश्वनाथ भेगडे | भाजप | ८३१५८ |
बापू जयवंतराव भेगडे | राष्ट्रवादी | ६८८४० |
रमेश रामचंद्र साळवे | रिपाई (आ) | १५१६० |
राजू नामदेव पिंजण | मनसे | ८४७२ |
ज्ञानोबा किसन काळोखे | बसपा | २५५९ |
प्रकाशदादा जैन | अपक्ष | २१०० |
नवनाथ कुंडलिक गाडे | भाबम | १३५६ |
गेनू बाबूराव कडू | अपक्ष | ११७१ |
उमाकांत रामेश्वर मिश्रा | अपक्ष | ७५८ |
Seamless Wikipedia browsing. On steroids.