From Wikipedia, the free encyclopedia
डॉ. माधवी वैद्य या एक मराठी साहित्यिक आहेत. पुण्यात जन्मलेल्या माधवी वैद्य यांचे महाविद्यालयीन शिक्षिण पुणे आणि इंदूर येथे झाले. मराठीच्या निवृत्त प्राध्यापिका असलेल्या माधवी वैद्य यांनी विपुल लेखन केले आहे. १९८३-८४ साली चिं.त्र्यं. खानोलकरांच्या ‘समग्र वाङ्मयाचा इतिहास’ या त्यांच्या प्रबंधाला पुणे विद्यापीठाचे उत्कृष्ट प्रबंधासाठीचे डॉ. वि.रा. करंदीकर पारितोषिक मिळाले होते. माधवी वैद्य एम.ए.पीएच.डी. आहेत.
डॉ. माधवी वैद्य या मार्च २०१३पासून अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्ष झाल्या आहेत.
माधवी वैद्य यांनी २५हून अधिक माहितीपटांचे लेखन आणि दिग्दर्शन केले आहे. त्यांतील सहा माहितीपटांना राष्ट्रीय आणि तीन माहितीपटांना आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे.
‘अग्निदिव्य’ या चित्रपटासाठी माधवी वैद्य यांनी सहदिग्दर्शन केले आहे. अनेक संस्थांची स्थापना त्यांनी केली असून काही संस्थांच्या संचालक म्हणूनही त्या कार्यरत आहेत.
Seamless Wikipedia browsing. On steroids.