मरूद्यान
From Wikipedia, the free encyclopedia
भौगोलिक संदर्भात, मरूद्यान किंवा मरूबन हे वाळवंटातील पाण्याचे स्रोत असलेला प्रदेश आहे जिथे वनस्पति उगण्यास पुरेशी परिस्थिती उपलब्ध आहे. जर हे क्षेत्र पुरेसे मोठे असेल तर ते प्राणी आणि मानवांना नैसर्गिक राहण्यायोग्य निवासस्थान देखील प्रदान करते.

ऐतिहासिक महत्त्व

व्यापार आणि वाहतुकीच्या मार्गांसाठी वाळवंटातील मरूद्यानाचे नेहमीच विशेष महत्त्व राहिले आहे. पाणी आणि खाद्यपदार्थांच्या पुरवठ्यासाठी सैन्यदले मरूद्यानाजवळून जाणे आवश्यक आहे. म्हणून कोणत्याही मरूद्यानावरील राजकीय किंवा सैनिकी नियंत्रण म्हणजेच त्या मार्गावरील व्यापारावरील नियंत्रण. उदाहरणार्थ, आधुनिक लीबियात स्थित औजिला, घाडमेस आणि कुफ्रा या सहारा वाळवंटाच्या उत्तर-दक्षिण आणि पूर्व-पश्चिम व्यापारासाठी बऱ्याच वेळा महत्त्वपूर्ण ठरल्या आहेत. मध्य आशियातील ओलांडलेल्या रेशीम मार्गामध्येही अनेक मरूद्यानांचा समावेश होता.
भूगोल

भूगर्भातील नदी किंवा विहीरीसारख्या पाण्याच्या स्रोतांमधून वाळवंटातील मरूद्यान तयार होतात. येथे नैसर्गिकरित्या किंवा मानवनिर्मित पाण्याचा दबाव वाढवून पृष्ठभागावर पाणी पोहोचू शकते. नियतकालिक पावसामुळे पण मरूद्यानाच्या स्रोताचे नैसर्गिकरित्या पाणी वाढते. अभेद्य खडक व दगडाचा स्थरांमुळे पाणी अडते आणि त्याला स्थिरमध्ये ठेवता येणे शक्य होते. हे पाणी स्थलांतरित पक्षी देखील वापरतात आणि ते बियाणे देखील प्रचारित करतात, परिणामी पाण्यातील वनस्पती आणि मरूद्यानाभोवती झाडे वाढतात.
वनस्पती व शेती

मरूद्यानामध्ये राहणाऱ्या लोकांनी जमीन आणि पाण्याचा वापर काळजीपूर्वक केला पाहिजे. जर्दाळू, खजूर, अंजीर आणि ऑलिव्ह यासारख्या वनस्पती वाढविण्यासाठी शेतात सिंचनाची गरज असते. मरूद्यानामध्ये सर्वात महत्त्वाची वनस्पती म्हणजे खजूर, ज्याने वरचा थर बनतो. हे खजूराचे वृक्ष मध्यम उंचीच्या पीचसरख्या लहान झाडांना सावली देतात. वेगवेगळ्या थरांत रोपे वाढवून, शेतकरी माती व पाण्याचा उत्तम वापर करतात. बराच भाजीपाला देखील पिकविला जातो आणि धान्य जसे ज्वारी आणि गहू पिकविले जातात जेथे जास्त ओलावा असतो. थोडक्यात, मरूद्यानामध्ये पामची शेती ही सिंचनाचे क्षेत्र आहे जे पारंपारिकपणे गहन आणि बहुसंस्कृती-आधारित शेतीस समर्थन देते. भटक्या विमुक्त प्राण्यांच्या पशुपालन पण येथे होते; जे बहुतेक वेळा खेडूत लोक असतात.
उल्लेखनीय मरूद्यान
सौदी अरेबिया येथील अल अहसा मरूद्यान हे जगातले सर्वात मोठे मरूद्यान आहे ज्याचे क्षेत्रफळ जवळपास ८,५४४ हेक्टर आहे. इ.स्. २०१८ मध्ये युनेस्कोने जागतिक वारसा स्थळांमध्ये या मरूद्यानाचा समावेश केला.[1] अमेरिकेची लास वेगास व्हॅली, एकेकाळी विशाल मरूद्यान होती जे आता एक दोलायमान महानगर क्षेत्रात रूपांतरित झाला आहे. नील नदीकाठी इजिप्तमध्ये बरेच मरूद्यान सापडतात.
संदर्भ
Wikiwand - on
Seamless Wikipedia browsing. On steroids.