मंगेश तेंडेलकुर From Wikipedia, the free encyclopedia
मंगेश तेंडुलकर (निधन : पुणे, ११ जुलै, २०१७) हे एक मराठी हास्य-व्यंग्य-चित्रकार असून त्यांनी काही विनोदी पुस्तकेही लिहिली आहेत. त्यांचे अनेक ललित लेख नियतकालिकांमधून प्रसिद्ध झाले आहेत. त्यांच्या व्यंगचित्रांचीं अनेकदा प्रदर्शने भरत. त्यांच्या हस्ते पुस्तकांची उद्घाटने होत. ते व्याख्यातेही होते.मंगेश तेंडुलकर हे प्रसिद्ध मराठी नाटककार विजय तेंडुलकर यांचे लहान बंधू आहेत. मंगेश तेंडुलकर यांना रघुनाथ तेंडुलकर , लीला तेंडुलकर , विजय तेंडुलकर व जेष्ठ अर्थशास्त्रज्ञ सुरेश तेंडुलकर ही भावंडे होती.
तेंडुलकर एक उत्तम वाचक होते. त्यांनी आपल्या व्यंगचित्रांच्या दुनियेमध्ये रमताना पुस्तकांशी फारकत घेतली नव्हती. वडिलांचे पुस्तकांचे दुकान असल्याने त्यांना वाचनाची लहापणापासूनच सवय होती. सुरुवातील नोकरी व्यवसाय करता करता व्यंगचित्रे काढणाऱ्या तेंडुकलकरांनी वाचन आणि व्यंगचित्रे अशा दोन्ही आवड एकाच वेळेस जोपासल्या होत्या. वयाच्या साठीनंतर त्यांनी कॅरिकेचर प्रकार हाताळला; तसेच वयाच्या साठीनंतर त्यांनी महाभारत आणि मनाचे श्लोक वाचायला घेतले. वाचनाला वय, वेळ, काळाचे कोणतेही बंधन नाही आणि वाचन हे महत्त्वाचे आहे असे तेंडुलकर म्हणत.
Seamless Wikipedia browsing. On steroids.