From Wikipedia, the free encyclopedia
भूस्थिर उपग्रह प्रक्षेपण यान हे भारताचे भूस्थिर कक्षेत उपग्रह प्रक्षेपित करण्यासाठीचे वाहन आहे.
हा लेख कोणत्याच वर्गात जोडल्या गेला नाही. कृपया त्यात वर्ग जोडण्यास मदत करा जेणेकरुन तो त्यासम लेख यादीत येईल. ({{{date}}}) (कृपया वर्गीकरण झाल्यावर हा साचा काढून टाकावा.) |
एस १२५ टप्पा २.८ मीटर व्यासाचा आहे व हा टप्पा एम २५० ग्रेड मार्जिंग स्टील ने बनवलेला आहे. ह्या टप्प्यात १२९ टन प्रोपेलंन्ट सामावू शकते. एल ४० स्र्टॅप ओन्स ह्या मध्ये ४० टन हायपरगोलिक प्रोपेलंन्ट ( UDMH and N2O4) २.१ मीटर व्यासाच्या भांड्यात ठेवलेले असते. ह्या स्टेजमध्ये ६८० किलो न्यूटन. थ्रस्ट मिळ्ते.
दुसरा टप्पा २.८ मी व्यासाचा आहे व यात ३७.५ टन प्रोपेलंन्ट ( UDMH and N2O4) अल्युमिनियमच्या दोन भांड्यात ठेवता येते. ह्या टप्प्यात विकास इंजिन वापरले जातात (७२० कि.न्यू.)
तिसरा टप्पा २.८ मी व्यासाचा आहे. द्रवरूप हायड्रोजन आणि द्रवरूप ऑक्सिजन दोन वेगळ्या भांड्यात साठवलेले असतात ( १२.५ टन).
पृथ्वीभोवतीच्या भूस्थिर कक्षेत सुमारे दोन टन किंवा त्यापेक्षा अधिक वजनाचा उपग्रह पाठवायचा असल्यास, प्रक्षेपकाच्या शेवटच्या टप्प्यात अवजड उपग्रहाला ढकलत पुढे नेण्यासाठी मोठी ऊर्जा लागते. कमी इंधनाचा उपयोग करून उपग्रहाला सुमारे 800 सेकंदांपर्यंत ढकलत नेण्यासाठी "क्रायोजेनिक' इंजिनाचा वापर करण्यात येतो. या इंजिनामध्ये इंधन म्हणून द्रवरूप हायड्रोजन, तर द्रवरूप ऑक्सिजनचा उपयोग ऑक्सिडायझर म्हणून करण्यात येतो. द्रवरूप हायड्रोजनचे तापमान उणे 253 अंश, तर द्रवरूप ऑक्सिजनचे तापमान उणे 183 अंश सेल्सियस असते. यासाठी लागणारे पंप चालविण्यास 40 हजार "आरपीएम'ची मोटर लागते. हे सर्व 800 सेकंदांसाठी जसेच्या तसे घडले, तरच दोन टनांचा उपग्रह अपेक्षित कक्षेत पोचतो. हे तंत्रज्ञान भारत सोडून अमेरिका, फ्रान्स, चीन, जपान आणि रशियाकडेच आहे.
प्रकार | तारीख | प्रक्षेपण स्थळ | पेलोड | माहिती |
डी १ | १८ एप्रिल इ.स. २००१ | श्रीहरीकोटा | जी सॅट-१ | असफल |
डी २ ८ | मे इ.स. २००३ | श्रीहरीकोटा | जीसॅट-२ | सफल |
एफओ १ | २० सप्टेंबर इ.स. २००४ | श्रीहरीकोटा | ईडूसॅट | सफल |
एफओ २ | १० जुलै इ.स. २००६ | श्रीहरीकोटा | इन्सॅट ४ सी | असफल |
एफओ ०४ | २ सप्टेंबर इ.स. २००७ | श्रीहरीकोटा | इन्सॅट-४कआर | सफल |
डी ०३ | १५ एप्रिल इ.स. २०१० | श्रीहरीकोटा | जीसॅट-४ | असफल |
एफओ ०६ | २५ डिसेंबर इ.स. २०१० | श्रीहरीकोटा | जीसॅट-५पी | असफल |
Seamless Wikipedia browsing. On steroids.