भरत जाधव

अभिनेता From Wikipedia, the free encyclopedia

भरत जाधव
Remove ads

भरत जाधव (१२ डिसेंबर १९७३) हा एक भारतीय अभिनेता आणि निर्माता आहे. मराठी नाटक आणि चित्रपटांतील त्याच्या विनोदी भूमिकांसाठी तो ओळखला जातो. तो मराठी चित्रपटसृष्टीतील सर्वात यशस्वी अभिनेत्यांपैकी एक आहे. तो मूळचा कोल्हापूरचे असला तरी त्याचे कुटुंब अनेक वर्षांपूर्वी मुंबईत स्थायिक झाले होते. भरतचे बालपण लालबाग परळ येथील राजाराम स्टुडिओच्या अंगणात गेले.

जलद तथ्य भरत जाधव, जन्म ...

३००० प्रयोग करणाऱ्या ऑल द बेस्ट या मराठी रंगभूमीवरील नाटकात अंकुश चौधरी आणि संजय नार्वेकर यांच्यासोबत अभिनय करताना भरत जाधव प्रसिद्ध झाला.[] त्यांने नंतर 'सही रे सही' या अतिशय गाजलेल्या मराठी नाटकात काम केले.[] जत्रा चित्रपटातील कोंबडी पळाली या गाण्यातील त्याच्या अभिनयाची चाहत्यांनी प्रशंसा केली होती. जाधव यांनी २०१३ मध्ये भरत जाधव एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेड सुरू केली.[]

भरतने ८५ पेक्षा जास्त चित्रपट आणि ८ मालिका केल्या आहेत. ८५०० पेक्षा जास्त नाटकांच्या प्रयोगांत काम केले आहे. सही रे सही या एकाच नाटकात भरत जाधवने चार भूमिका केल्या आहेत. या नाटकाचे एका वर्षात ५६५ प्रयोग झाले. हे नाटक गिनीज बुकमध्ये नोंदवले गेले.[]

Remove ads

कारकीर्द

भरत जाधवच्या वेबसाईटनुसार त्याने ८५ चित्रपट, ८ दूरचित्रवाणी मालिका आणि ८५००हून अधिक नाट्यप्रयोग केले आहेत. मराठी चित्रपट व्यवसायात व्हॅनिटी व्हॅन असणारा तो पहिला अभिनेता आहे.[]

सही रे सही

सही रे सही या नाटकात भरत जाधवने गलगले, कुरियर घेण्यासाठी आलेला माणूस, श्रीमंत म्हातारा व वेडसर मुलगा अशा चार भूमिका केल्या आहेत. या नाटकाचे एका वर्षात ५६५ प्रयोग झाले होते व त्यासाठी त्याची नोंद गिनीज बुकमध्ये झाली होती.[]

‘सही रे सही’ या नाटकाचे 'अमे लई गया, तमे रही गया' या नावाने गुजरातीत भाषांतर झाले. गुजराती नाटकात शर्मन जोशी याने काम केले होते. या गुजराती नाटकाचे २० महिन्यात ३५० प्रयोग झाले होते. एखाद्या नाटकाचे ३५० प्रयोग होणे हे गुजराती रंगभूमीवर गेल्या १० वर्षात प्रथम घडले होते. याच नाटकाचे 'हम ले गये, तुम रह गये' या नावाने हिंदीत भाषांतर झाले. हिंदी नाटकात जावेद जाफरी याने काम केले होते.

Remove ads

चित्रपट कारकीर्द

  • खतरनाक (२०००)
  • खबरदार (२००५)
  • गलगले निघाले (२००८)
  • गोंद्या मारतंय तंगडी (२००८)
  • चालू नवरा भोळी बायको (२००६)
  • जत्रा (२००६)
  • डावपेच (२०११)
  • नवऱ्याची कमाल बायकोची धमाल (२००४)
  • नाना मामा (२००६)
  • नामदार मुख्यमंत्री गणप्या गावडे (२००६)
  • पछाडलेला (२००५)
  • प्राण जाए पर शान न जाए (हिंदी, २००३)
  • बकुळा नामदेव घोटाळे (२००७)
  • बाप रे बाप (२००३)
  • माझा नवरा तुझी बायको (२००६)
  • मुक्काम पोस्ट लंडन (२००७)
  • शिक्षणाच्या आयचा घो (२०१०)
  • वन रुम किचन (२०११)
  • सरीवर सरी (२००५)
  • साडे माडे तीन (२००८)
  • हाऊस फूल (२००४)

नाटक कारकीर्द

  • आमच्यासारखे आम्हीच
  • ऑल द बेस्ट
  • ढॅण्ट ढॅण
  • श्रीमंत दामोदरपंत
  • सही रे सही
  • पुन्हा सही रे सही
  • तू तू मी मी
  • अस्तित्त्व

संदर्भ

बाह्य दुवे

Loading related searches...

Wikiwand - on

Seamless Wikipedia browsing. On steroids.

Remove ads