त्रैमासिक From Wikipedia, the free encyclopedia
बुलेटिन - श्रीअरविंद आश्रमातर्फे श्रीअरविंद आणि श्रीमाताजींच्या तत्त्वज्ञान आणि योगाशी संबंधित अनेक नियतकालिके प्रकाशित केली जातात. त्यातील एक म्हणजे श्रीऑरोबिंदो इंटरनॅशनल सेंटर ऑफ एज्युकेशनचे बुलेटिन. त्याचे पूर्ण नाव बुलेटिन ऑफ श्रीअरबिंदो इंटरनॅशनल सेंटर ऑफ एज्युकेशन असे आहे.
हे बुलेटिन एकाच वेळी इंग्रजी-फ्रेंच मधून प्रकाशित होते. पूर्वी 'बुलेटिन ऑफ फिजिकल एज्युकेशन' या नावाने ते प्रकाशित होत असे. हे त्रैमासिक असून, पाँडिचेरी येथून, इ.स. १९४९ पासून प्रकाशित होत आहे.
श्रीमाताजी अतिमानस अवतरण आणि त्यासंबंधी जे आध्यात्मिक प्रयोग करत असत, त्यासंबंधी इतिवृत्तात्मक स्वरुपाची माहिती त्या या बुलेटिनद्वारे प्रसृत करत असत. [1]
या नियतकालिकाचा प्रारंभ श्रीअरविंद यांच्या लेखनाने व्हावा, त्यासाठी त्यांनी स्वतंत्र लेख लिहावा अशी श्रीमाताजींनी त्यांना विनंती केली होती. या मासिकासाठी म्हणून श्रीअरविंद यांनी जो पहिला लेख लिहिला, त्या लेखाचे नाव होते, द डिव्हाईन बॉडी. [3]
नमुना अंक - एप्रिल १९६०
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.
Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.