बिठूर

From Wikipedia, the free encyclopedia

बिठूर

बिठूर हे भारताच्या उत्तर प्रदेश राज्यामधील एक नगर आहे. कानपूर शहराच्या २५ किमी वायव्येस गंगा नदीच्या पश्चिम काठावर वसलेले बिठूर एक ऐतिहासिक स्थान असून श्रीरामामांच्या लव आणि कुश ह्या पुत्रांचा जन्म येथेच झाला होता असे मानले जाते. ह्या नगराचे जुने पौराणिक नाव ब्रह्मावर्त होते.

जलद तथ्य
बिठूर ( ब्रह्मावर्त )
उत्तर प्रदेशमधील शहर

Thumb
बिठूर येथील गंगा नदीवरील ब्रह्मावर्त घाट
Thumb
बिठूर ( ब्रह्मावर्त )
बिठूर ( ब्रह्मावर्त )चे उत्तर प्रदेशमधील स्थान
Thumb
बिठूर ( ब्रह्मावर्त )
बिठूर ( ब्रह्मावर्त )चे भारतमधील स्थान

गुणक: 26°36′36″N 80°16′19″E

देश  भारत
राज्य उत्तर प्रदेश
जिल्हा कानपूर नगर जिल्हा
लोकसंख्या  (२०११)
  - शहर ११,३००
प्रमाणवेळ भारतीय प्रमाणवेळ
बंद करा
Thumb
येथील नानसाहेब पेशवा स्मारक

१८१७ साली घडलेल्या तिसऱ्या इंग्रज-मराठा युद्धात पेशव्यांचा सपशेल पराभव झाला ज्याबरोबरच मराठा साम्राज्याचा अस्त झाला. तत्कालीन पेशवा दुसरा बाजीराव ह्यास इंग्रजांनी पुण्यातून पदच्युत केले. ज्या नंतर ते बिठूर येथे स्थायिक झाले. आपल्या सोबत ते १० हजार मराठी कुटुंबे घेऊन आले होते. तसेच त्यांच्या १३ राण्या होत्या. त्यापैकी महाराणी गंगाबाई यांना बयाबाई नावाची कन्या होती. बाकी आपल्या कुटुंबातून‌ त्यांनी नानासाहेब धोंडोपंत पेशवे, पांडुरंग सदाशिव उर्फ रावसाहेब, बाळासाहेब यांना दत्तक घेतले होते.बिठूर येथे त्यांचा शनिवार वाडा होता. बाजीराव पेशवे यांना बिठूर नगरात खुप मानाचे स्थान होते.

१८३८ साली काशीच्या चिमाजी अप्पा पेशवे द्वितीय यांचे निधन झाल्यावर मोरोपंत तांबे आपल्या कन्येला मणिकर्णिकाला बिठूरला घेऊन आले. आणि बाजीरावांचे आश्रित म्हणून राहीले. मणिकर्णिका ही बाजीरावांना आपल्या मुलांप्रमाणे अती प्रिय होती. ते तिला छबिली म्हणत. त्यामुळे मणिकर्णिकचे बालपण ह्या राजवाड्यात गेले. नंतर बाजीराव पेशवे यांच्या मध्यस्थीने मणिकर्णिकेचा विवाह झांशीच्या महाराजा गंगाधरराव नेवाळकर यांच्यासोबत झाला. आणि नेवाळकर‌ व‌ पेशव्यांचे संबंध सुधारले.

जानेवारी १८५१ साली बिठूरमध्येच बाजीराव पेशवे यांचे निधन झाले. दुसऱ्या बाजीरावांचा दत्तक मुलगा नानासाहेबाने उत्तर भारतातील इतर स्वातंत्र्यसेनानी तात्या टोपे, राणी लक्ष्मीबाई इत्यादींसोबत हातमिळवणी करून इंग्रजांविरुद्ध लढा चालू ठेवला होता. १८५७ च्या स्वातंत्र्ययुद्धादरम्यान नानासाहेबाने येथूनच कानपूराला वेढा देऊन सुमारे ३०० ब्रिटिश सैनिकांची हत्त्या केली होती. ह्याचा बदला म्हणून ब्रिटिश राजवटीने बिठूर गाव जमीनदोस्त करून येथील अनेक मंदिरे व पेशव्यांचा राजवाडा पाडून टाकला. ह्या अग्नितांडवात नानासाहेबांची कन्या मैनावतीचा मृत्यू झाला.

Loading related searches...

Wikiwand - on

Seamless Wikipedia browsing. On steroids.