Remove ads
From Wikipedia, the free encyclopedia
बाळासाहेब पाटील (शामराव पांडुरंग पाटील) हे एक भारतीय राजकारणी आहेत. ते महाराष्ट्राचे सहकार या विभागाचे विद्यमान कॅबिनेट मंत्री आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातून ते निवडून आले आहेत.[1][2][3]
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.
नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. |
बाळासाहेब पाटील शामराव उर्फ बाळासाहेब पांडुरंग पाटील | |
विद्यमान | |
पदग्रहण ३० डिसेंबर २०१९ | |
राज्यपाल | भगतसिंग कोश्यारी |
---|---|
विद्यमान | |
पदग्रहण १८ ऑक्टोबर २०१९ | |
मतदारसंघ | कराड उत्तर |
बहुमत | 51000 |
जन्म | २९ जुलै, १९६१ कराड, महाराष्ट्र |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
राजकीय पक्ष | राष्ट्रवादी_काँग्रेस_पक्ष_-_शरदचंद्र_पवार |
वडील | स्व. पांडुरंग दादासाहेब (पी.डी.) पाटील |
व्यवसाय | शेती, राजकारण |
मंत्रिमंडळ | महा विकास अघाड़ी सरकार |
त्यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या मंत्रीमंडळात सहकार व पणन मंत्री तसेच सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणूनही काम पाहिले आहे.
बाळासाहेब पाटील यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण कराड येथील महाराष्ट्र हायस्कूल येथे झाले व उच्च माध्यमिक शिक्षण त्यांनी वेणूताई चव्हाण महाविद्यालय कराड येथे घेतले आहे. शेतीची त्यांना विशेष आवड आहे. बैलांच्या सहाय्याने शेतीची मशागत करणे, पेरणी करणे हा त्यांचा आवडीचा भाग.
नवंमहाराष्ट्राचे शिल्पकार व भारताचे नेते स्व.यशवंतरावजी चव्हाणसाहेब यांच्या विचारधारेनुसार, वडील आदरणीय पी.डी.पाटीलसाहेब यांनी कराड नगरपरिषदेचे सलग 42 वर्ष विक्रमी नगराध्यक्ष म्हणून काम पाहीले होते. दरम्यानच्या काळामध्ये आपल्या वैयक्तिक व सामाजिक समस्या सोडवून घेणेकरीता कराडसह परिसरातील लोेकांचा घरी राबता असायचा, त्यातून त्यांना समाजसेवेची ओढ निर्माण झाली आणि सन 1992 पासून आपल्या सामाजिक जीवनाला सुरुवात केली.
== राजकिय कारकिर्द - == [4] स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाणसाहेब यांच्या प्रेरणेने स्थापन झालेल्या आणि राज्यात सहकार क्षेत्रात नावाजलेल्या सह्याद्रि सहकारी साखर कारखाना लि., यशवंतनगर, ता.कराड जि.सातारा या कारखान्याच्या संचालकपदी सन 1992 मध्ये त्यांची निवड झाली. त्यांच्या कामाचा आवाका पाहून सन 1996 मध्ये संचालक मंडळाने त्यांच्या गळ्यामध्ये चेअरमन पदाची माळ घातली, तेव्हापासून आजअखेर ते सह्याद्रि सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन पदी कार्यरत आहेत. या कारखान्याचा उत्कृष्ठ आर्थिक नियोजन व उत्तम प्रशासनाचा राज्यात लौकिक असून ऊस उत्पादकांच्या ऊसाला रास्त भाव देण्याची परंपरा आजही सह्याद्रि सहकारी साखर कारखान्याने राखून ठेवली आहे. त्यांच्या मार्गर्शनाखाली कारखान्याने देशपातळीसह राज्यपातळीवरील अनेक पुरस्कार मिळविले आहेत.
सन 1999 मध्ये देशाचे नेते माननीय खासदार शरदचंद्रजी पवारसाहेब यांनी राष्ट्रवादी काँगेसची स्थापना केली, त्याच वर्षी झालेल्या विधानसभेच्या निवडणूकीमध्ये बाळासाहेब पाटील यांनी कराड उत्तर विधानसभा मतदार संघातून पहिल्यांदाच निवडणूक लढविली व ते या निवडणूकीत मोठ्या मताधिक्याने विजयी झाले.
दि.16 ऑक्टोबर 2004 रोजी कराड-उत्तर विधानसभा सदस्य म्हणून दुसऱ्यांदा, दि.22 ऑक्टोबर 2009 रोजी कराड-उत्तर विधानसभा सदस्य म्हणून तिसऱ्यांदा विजयी झाले. 2014 च्या विधानसभा निवडणूकीमध्ये पाटीर्ने तिकीट नाकारल्यामुळे अपक्ष निवडणूक लढवून विक्रमी मताधिक्याने ते विधानसभा सदस्य म्हणून चौथ्यांदा विजयी झाले. [5] पक्षाध्यक्ष आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेब यांच्याविषयी नितांत प्रेम, आदर आणि निष्ठा ठेवून, मनामध्ये कोणतीही अढी न ठेवता त्यांनी पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस पाटीर्ला बिनशर्त पाठींबा दिला. कांही दिवसांनंतर मतदार संघातील इंदोली ता.कराड येथे आमदार बाळासाहेब पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून व निधीतून मंजूर झालेल्या विविध विकास कामांच्या भूमीपुजन आणि उद्घाटन समारंभाप्रसंगी तत्कालिन मंत्री मा.आर.आर.पाटील (आबा) आले असता, त्यांनी आमदार बाळासाहेब पाटील यांच्यावर पक्षाकडून झालेल्या अन्यायाबद्दल खेद व्यक्त केला व आमदार बाळासाहेब पाटील यांनी दिलेल्या पाठींब्याबद्दल व त्यांच्या पक्षनिष्ठेबद्दल त्यांचे विशेष कौतूक केले होते, आणि पुढील काळात पक्षाकडून आपला योग्य तो सन्मान राखला जाईल अशी ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली होती.
दि.24 ऑक्टोबर, 2019 रोजी कराड-उत्तर विधानसभा मतदार संघातून त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पाटीर्चे अधिकृत उमेदवार म्हणून निवडणूक लढविली व विधानसभा सदस्य म्हणून ते पाचव्यांदा विजयी झाले. [6] सन 2019 मध्ये राज्यात उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वातील सरकारमध्ये त्यांना आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेब यांनी सहकार व पणन विभागाचे कॅबिनेट मंत्री आणि सातारा जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी दिली. ही जबाबदारी त्यांनी तितक्याच आत्मीयतेने आणि निष्ठेने सांभाळली. त्यांच्या मंत्रीपदाच्या काळात त्यांनी जनहिताचे धोरणात्मक अनेक निर्णय घेतले आहेत.
राज्य शासनाच्या पणन विभागाने शेतकऱ्यांकडून सन 2020 मध्ये साधारण २२० लाख क्विंटल इतकी विक्रमी कापूस खरेदी केली. [7] राज्यात हंगाम 2019-20 मध्ये जवळपास ४५ लाख हेक्टर कापसाची लागवड झाली होती. पर्जन्यमान चांगले झाल्यामुळे कापसाचे विक्रमी पीक झाले. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कापसाच्या दरातील घसरणी मुळे देशाअंतर्गत तसेच राज्यातील कापसाचे दर ही कमी होत गेले. शेतकऱ्यांना हमीदरा पेक्षा कमी दराने कापसाची विक्री करावी लागते कि काय अशी शंका निर्माण होऊ लागली. म्हणून राज्यशासनाने शेतकऱ्यांवर अशी वेळ येवू नये, याकरीता राज्यामध्ये कापूस पणन महासंघाची नियुक्ती सीसीआयचे सबएजंट म्हणून केली. आणि राज्यामध्ये जवळपास 40 कापूस खरेदी केंद्र सुरू करण्यात आली.
याच दरम्यान संपूर्ण जागांध्ये कोरोना या सर्नसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाला. आणि सातत्याने कापसाचे दर कमी होऊ लागले. तसेच कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि वस्त्रोद्योगावर त्याच्या प्रभावामुळे बाजारपेठेमध्ये खाजगी खरेदीदारांची संख्या कमी होत गेली. म्हणून शेतकऱ्यांना त्रास होऊ नये आणि कापूस खरेदीला विलंब होऊ नये, यासाठी सीसीआय व कापूस पणन महासंघाद्वारे जास्तीची कापूस खरेदी केंद्र सुरू करण्याचा निर्णय राज्याचे सहकार आणि पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी घेतला. आणि राज्यामध्ये विक्रमी प्रमाणात शेतकऱयांचा कापूस खरेदी करून शेतकऱ्यां दिलासा देण्याचे काम केले.
या योजनेंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांचे 2 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज महाराष्ट्र सरकार माफ करण्यात आले. [8] या महात्मा ज्योतिराव फुले कर्ज माफीयोजनेंचा लाभ राज्यातील अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना मिळाला, त्यासोबतच ऊस व फळपिकांसह इतर पारंपरिक शेती करणाऱ्या राज्यातील शेतकऱ्यांनाही याचा लाभ मिळाला. महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत सन २०२०-२१ साठी ७ हजार कोटी रुपये निधी अर्थसंकल्पित करण्यात आला. या निधीतून यापूर्वी वितरीत केलेला निधी वगळता १ हजार ३०६ कोटी रूपये इतका निधी वितरीत करण्यात आला.
दि. १ एप्रिल, २०१५ ते दि. ३१ मार्च, २०१९ पर्यंतच्या कालावधीसाठी अल्पमुदतीचे पीक कर्ज घेतलेल्या, तसेच या कालावधीत अल्पमुदतीच्या पीक कर्जाचे पुनर्गठन/फेरपुनर्गठन केलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी ‘महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना’ जाहीर करण्यात आली होती. या योजनेची अंमलबजावणी सुरू असताना देशासह राज्यात कोविड-१९ चे महासंकट आले. त्यामुळे राज्यामध्ये लॉकडाऊन जाहीर झाला. त्यामुळे या योजनेच्या अंमलबजावणीमध्ये काही अडचणी निर्माण झाल्या आणि तिसऱ्या यादीतील पात्र शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ मिळण्यास उशीर झाला. मात्र कोविड च्या अडचणींवर मत करत अंमलबजावणीला गती देण्यात आली आणि ज्या शेतकऱ्यांची आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे त्या पात्र शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ मिळाला.
लोकडाऊन च्या काळात गृहनिर्माण सोसायटीतील लोकांना घरपोच साहित्य -
कोरोनाच्या कठीण काळात महाराष्ट्र सहकार विकास महामंडळाच्या माध्यमातून मेगा सिटी मधील गृहनिर्माण सोसायट्यांचे शेतकऱ्यांकडून थेट भाजीपाला पोहोच करण्याचे नियोजनाचा महत्वपूर्ण निर्णय. तसेच किराणा आणि बचत गटाच्या माध्यमातून तयार केलेल्या वस्तूही घरपोच केल्या. [9]
दरम्यान सन 2012 ते 2014 या कालावधीमध्ये त्यांनी महाराष्ट्र विधानसभा अंदाज समिती प्रमुख म्हणूनही काम पाहिले आहे. तसेच दि.18/07/2020 रोजी रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडी सदस्यपदी निवड, दि.13/08/2021 रोजी जिल्हास्तरीय विद्युत वितरण नियंत्रण समितीचे अध्यक्ष, सन 1994 पासून शिक्षण मंडळ कराडचे गव्हर्निंग कौन्सिल सदस्य, सह्याद्रि शिक्षण संस्था, यशवंतनगरचे अध्यक्ष, महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी, कराडचे संस्थापक अध्यक्ष, सातारा जिल्हा मध्यवतीर् सहकारी बँकेच्या संचालकपदी 23/11/2021 रोजी कराड तालुका सोसायटी मतदार संघातून निवड [10], सन 2002-03 सालाकरीता महाराष्ट्र विधानमंडळातील नगरविकास विभाग व गृहनिर्माण विभागाशी संलग्न स्थायी समिती सदस्य म्हणून काम पाहिले आहे. ऑगस्ट 2002 पासून वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट मांजरी बु॥ पुणे चे गव्हर्निंग कौन्सिल सदस्य, जानेवारी 2007 मध्ये वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट मांजरी बु॥ पुणे चे गव्हर्निंग कौन्सिल सदस्य म्हणून दुसऱ्यंादा निवड, दि.29 डिसेंबर 2003 रोजी महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघ लि., मुंबईच्या उपाध्यक्ष पदी निवड, दि.24/12/2006 ते 3/1/2009 अखेर महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघ लि., मुंबई चे अध्यक्ष, माहे जानेवारी 2005 ते 2009 पर्यंत कोयना भूकंप पुनर्वसन निधी समितीवर खजिनदार व सन 1999 पासून आजअखेर विश्वस्त म्हणून कार्यरत आहेत. दि.22 डिसेंबर 2007 ते दि.3/1/2009 अखेर महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघ लि., मुंबई चे अध्यक्ष पदी फेरनिवड झाली. माहे जानेवारी 2005 पासून कोयना भूकंप पुनर्वसन निधी समितीवर विास्त-खजिनदार म्हणून त्यांनी काम पाहिले आहे.
दि.30 जून 2005 पासून सौ. वेणुताई चव्हाण चॅरिटेबल पब्लिक ट्रस्ट, कराड चे कार्यकारी विास्त, दि.6 नोव्हेंबर 2006 ते ऑक्टोबर 2009 पर्यंत शिवाजी विद्यापीठ अधिसभेवर महाराष्ट्र विधानसभेचे प्रतिनिधी म्हणूक काम पाहिले आहे. दि.6 मार्च 2009 रोजी नॅशनल हेवी इंजिनिअरींग को-ऑप. लि. पुणे या संस्थेचे संचालक, दि.29/09/2010 रोजी राष्ट्रीय सहकारी साखर संघ लि., नवी दिल्ली या संस्थेवर दक्षिण मध्य महाराष्ट्रातून संचालक पदावर बिनविरोध निवड व दि.19/12/2012 रोजी राष्ट्रीय सहकारी साखर संघ लि, नवी दिल्ली या संस्थेवर संचालक पदावर दुसऱ्यांदा बिनविरोध निवड झाली आहे. त्याचबरोबर स्व.यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई चे कार्यकारी मंडळ पदसिद्ध सदस्य म्हणून काम पहात आहेत. दि.13 नोव्हेंबर 2008 पासून स्व.यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई, विभागीय केंद्र, कराड चे उपाध्यक्ष व दि. 9 जुलै 2014 रोजी स्व.यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, विभागीय केंद्र, कराड चे अध्यक्ष म्हणून काम पाहत आहेत.
बाळासाहेब पाटील (शामराव पांडुरंग पाटील) यांचेकडे प्रभावी संघटन कौशल्य असून, सर्वसामान्यांच्या प्रश्नासंबंधी आंतरिक तळमळ आहे. ते स्व.यशवंतरावजी चव्हाण साहेब आणि वडील आदरणीय पी.डी.पाटीलसाहेब यांच्या विचारांचा वारसा खंबीरपणे जोपासत आहेत.
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.
Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.