Remove ads

बाळकृष्ण हरी कोल्हटकर, ऊर्फ बाळ कोल्हटकर, (जन्म : सातारा, २५ सप्टेंबर १९२६, - ३० जून १९९४) हे मराठीतील नाटककार, कवी, अभिनेते व नाट्यदिग्दर्शक होते. यांनी लिहिलेल्या दुरिताचे तिमिर जावो[१], वाहतो ही दुर्वांची जुडी, मुंबईची माणसे, एखाद्याचे नशीब इत्यादी नाटकांचे हजारांहून अधिक प्रयोग झाले[२]. तीन दशकांच्या साहित्यिक कारकिर्दीत यांनी ३०हून अधिक नाटके लिहिली.

जलद तथ्य बाळकृष्ण हरी कोल्हटकर, जन्म नाव ...
बाळकृष्ण हरी कोल्हटकर
जन्म नाव बाळकृष्ण हरी कोल्हटकर
जन्म सप्टेंबर २५, इ.स. १९२६
मृत्यू जून ३०, इ.स. १९९४
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र नाट्यलेखन, साहित्य
भाषा मराठी
साहित्य प्रकार कविता, नाटक
बंद करा

जीवन

कोल्हटकरांचे शिक्षण सातव्या इयत्तेपर्यंतच झाले होते. त्यांनी वयाच्या पंधराव्या वर्षी प्रथमच जोहार नावाचे नाटक लिहिले[२]. इ.स. १९४७ सालापर्यंत त्यांनी रेल्वेत नोकरी केली. मात्र त्यानंतर पेशाच्या बाबत त्यांच्या आयुष्यात बरेच चढउतार आले. काही प्रसंगी खायची पंचाईत अनुभवलेल्या कोल्हटकरांनी या काळात नाटके व चित्रपटांच्या संहिता लिहिण्याचे काम चालूच ठेवले[२].

कारकीर्द

नाटके

अधिक माहिती नाटक, वर्ष ...
नाटकवर्षप्रकाशनभाषासहभाग
आकाशगंगामराठीलेखन
एखाद्याचे नशीबमराठीलेखन
दुरिताचे तिमिर जावोमराठीलेखन
देणाऱ्याचे हात हजारोमराठीलेखन
देव दीनाघरी धावलामराठीलेखन
मुंबईची माणसंमराठीलेखन
लहानपण देगा देवामराठीलेखन
वाहतो ही दुर्वांची जुडीइ.स. १९६४मराठीलेखन
विद्या विनयेन शोभतेमराठीलेखन
वेगळं व्हायचंय मलामराठीलेखन
बंद करा

सिमेवरून परत जा अंगाई वाऱ्यात मिसळले पाणी उघडले स्वर्गाचे दार

संदर्भ

बाह्य दुवे

Wikiwand in your browser!

Seamless Wikipedia browsing. On steroids.

Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.

Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.

Remove ads