Remove ads
हे भूमध्य समुद्र व नजीकच्या भूप्रदेशावर पसरलेले मध्ययुगातील ग्रीक भाषक-बहुल साम्राज्य होते. From Wikipedia, the free encyclopedia
बायझेंटाईन साम्राज्य (देवनागरी लेखनभेद : बायझेंटाइन साम्राज्य, बायझेन्टाईन साम्राज्य; ग्रीक: Ῥωμανία ; लॅटिन: Imperium Romanum, इंपेरिउम रोमानिउम ;) हे भूमध्य समुद्र व नजीकच्या भूप्रदेशावर पसरलेले मध्ययुगातील ग्रीक भाषक-बहुल साम्राज्य होते. सम्राट कॉन्स्टंटाइनाने रोमन साम्राज्याची राजधानी रोम येथून कॉन्स्टॅंटिनोपल येथे हलवल्यानंतर ग्रीस हे रोमन साम्राज्याचे केंद्र झाले. पुढे रोमन साम्राज्याचे विघटन झाल्यानंतर पूर्व रोमन साम्राज्य हे बायझेंटाईन साम्राज्य म्हणून ओळखू जाऊ लागले. याची राजभाषा ग्रीक होती. याच काळात बायबलाची रचना झाली व ख्रिश्चन धर्म हा बायझेंटाईन साम्राज्याचा अधिकृत धर्म बनला. बायझेंटाईन राज्य हे आफ्रिका, मध्य युरोप, पर्शियापर्यंत पसरले होते. अनेक प्रांत या साम्राज्यात असले तरी या साम्राज्याची ख्रिश्चन धर्मीय म्हणून ओळख होती. बेलारियस व तिसरा लिओ यांसारख्या महान सेनांनीनी हे साम्राज्य विस्तारले.
बायझेंटाईन साम्राज्य Ῥωμανία Rhōmanía Romania Imperium Romanum | ||||
|
||||
|
||||
राजधानी | कॉन्स्टॅंटिनोपल | |||
शासनप्रकार | राजतंत्र | |||
अधिकृत भाषा | ग्रीक, लॅटिन | |||
लोकसंख्या | ५०,००,००० (इ.स. १२८१ अंदाज) |
इस्लामाचा उदय झाल्यानंतर इस्लामी फौजांचे पहिले आक्रमण बायझेंटाईन साम्राज्यावर झाले. त्यात त्यांना आफ्रिका व मध्यपूर्वेकडचा भाग गमवावा लागला. तुर्कांचे आक्रमण होईपर्यंत पुढील अनेक वर्षे युरोपातील भूप्रदेश बायझेंटाईन साम्राज्याने टिकवून ठेवले. दरम्यान इ.स.च्या १० व्या शतकात बायझेंटाईन ख्रिस्ती धर्माधिकाऱ्यांचे व रोमच्या ख्रिस्ती धर्माधिकाऱ्यांचे मतभेद टोकाला गेले, रोम व ग्रीसमध्ये पुन्हा एकदा दरी निर्माण् झाली. ग्रीसचे ख्रिस्ती लोक स्वतःला पारंपारिक ख्रिस्ती म्हणू लागले. बायझेंटाईन साम्राज्याचा प्रभाव ग्रीस व सभोवतालच्या देशांवर ११०० वर्षांपर्यंत राहिला. बायझेंटाईन साम्राज्याने इस्लामी आक्रमणे अनेक शतकांपर्यंत थोपवून धरली होती. परंतु सरतेशेवटी ओस्मानी साम्राज्याने कॉन्स्टॅंटिनोपलाचा पाडाव केला व ११०० वर्षांची एकछत्री सत्ता संपुष्टात आणली.
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.
Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.