From Wikipedia, the free encyclopedia
फूच्यान (देवनागरी लेखनभेद: फूज्यान; चिनी: 福建省 ; फीनयीन: Fújiàn ;) हा चीन देशाच्या आग्नेय किनाऱ्यावरील प्रांत आहे. फूच्यान प्रांताच्या उत्तरेस च-च्यांग, पश्चिमेस च्यांग्शी, दक्षिणेस क्वांगतोंग हे प्रांत आहेत. याच्या पूर्वेस ताइवान सामुद्रधुनी असून त्यापलीकडे ताइवान बेट आहे. हान चिनी वंशीयांचे बाहुल्य असलेला हा प्रांत चीनच्या जनतेच्या प्रजासत्ताकातील सर्वाधिक भाषिक व सांस्कृतिक वैविध्य असलेला प्रांत आहे. २०२० साली फूच्यान प्रांताची लोकसंख्या सुमारे ४.१५ कोटी इतकी होती. फूचौ ही फूच्यानची राजधानी व सर्वात मोठे शहर असून च्यामेन, क्वानचौ ही इतर मोठी शहरे आहेत.
फूच्यान 福建省 | |
चीनचा प्रांत | |
फूच्यानचे चीन देशामधील स्थान | |
देश | चीन |
राजधानी | फूचौ |
क्षेत्रफळ | १,२१,४०० चौ. किमी (४६,९०० चौ. मैल) |
लोकसंख्या | ४,१५,४०,०८६ |
घनता | २९१ /चौ. किमी (७५० /चौ. मैल) |
आय.एस.ओ. ३१६६-२ | CN-FJ |
संकेतस्थळ | http://www.fujian.gov.cn/ |
फूच्यानाचा बहुतेक भाग चीनच्या जनता-प्रजासत्ताकाशी संलग्न असला, तरीही किन्मन व मात्सू हे द्वीपसमूह चीनच्या प्रजासत्ताकाशी (ताइवानाशी) संलग्न आहेत. थोडक्यात भूराजकीयदृष्ट्या 'ची.ज.प्र. फूच्यान' व 'ची.प्र. फूच्यान' असे दोन भिन्न प्रांत आहेत.
फूच्यान प्रांत ९ उप-प्रांतीय दर्जाच्या शहरांमध्ये विभागला गेला आहे.
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.
Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.