Remove ads
From Wikipedia, the free encyclopedia
फिदेल कास्त्रो (स्पॅनिश: Fidel Alejandro Castro Ruz (मराठीत फिडेल कॅस्ट्रो) : जन्म : १३ ऑगस्ट १९२६; - २५ नोव्हेंबर २०१६). त्याच्या वडिलांचे नाव ॲंजल कॅस्ट्रो व आईचे नाव लीना रोझ होते. [१] हा मुळातला क्रांतिकारी, क्यूबा देशाचा शासक झाला. त्याने प्रथम पंतप्रधान व नंतर राष्ट्राध्यक्ष ह्या पदांद्वारे क्युबावर एकूण ४७ वर्षे सत्ता चालवली. कट्टर साम्यवादी मार्क्सवादी-लेनिनवादी विचारसरणीच्या कॅस्ट्रोच्या राजवटीदरम्यान क्यूबा पूर्णपणे एक-पक्षीय समाजवादी राष्ट्र बनले होते.
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.
नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. |
ह्या लेखाला एकही संदर्भ दिला गेलेला नाही. विश्वसनीय स्रोत जोडून या लेखातील माहितीची पडताळणी करण्यात मदत करा. संदर्भ नसल्याने प्रस्तुत लेखाची उल्लेखनीयता ही सिद्ध होत नाही. संदर्भहीन मजकूराची पडताळणी करता येत नसल्याने व उल्लेखनीयता सिद्ध होत नसल्याने हा लेख काढून टाकला जाऊ शकतो याची नोंद घ्यावी. |
फिडेल कॅस्ट्रो | |
क्यूबाचा १७वा राष्ट्राध्यक्ष | |
कार्यकाळ २ डिसेंबर १९७६ – २४ फेब्रुवारी २००८ | |
पंतप्रधान | स्वतः |
---|---|
उपराष्ट्रपती | राउल कॅस्ट्रो |
मागील | ओस्वाल्दो दोर्तिकोस तोरादो |
पुढील | राउल कॅस्ट्रो |
क्युबा कम्युनिस्ट पक्षाच्या मध्यवर्ती समितीचा सरसचिव | |
कार्यकाळ २४ जून १९६१ – १९ एप्रिल २०११ | |
मागील | ब्लास रोका काल्देरियो |
पुढील | राउल कॅस्ट्रो |
क्यूबाचा १६वा पंतप्रधान | |
कार्यकाळ १६ फेब्रुवारी १९५९ – २ डिसेंबर १९७६ | |
मागील | होजे मिरो कार्दोना |
जन्म | १३ ऑगस्ट, १९२६ बिरान, ऑल्ग्विन प्रांत, क्यूबा |
मृत्यू | २५ नोव्हेंबर, २०१६ (वय ९०) हवाना, क्यूबा |
राजकीय पक्ष | क्युबा कम्युनिस्ट पक्ष |
गुरुकुल | हवाना विद्यापिठ |
व्यवसाय | वकील |
सही |
१३ ऑगस्ट १९२६ रोजी क्युबा देशातील बिरान येथे फिडेल कॅस्ट्रो यांचा जन्म झाला. त्याच्या वडिलांचे नाव ॲंजल व आईचे नाव लिना होते. त्यांचे वडील ॲंजल कॅस्ट्रो हे एक श्रीमंत जमीनदार होते. तर आई लिना या शालेय शिक्षिका होत्या. [२]
कॅस्ट्रो यांनी क्यूबातील सॅन्टिॲगो येथे लष्कराविरोधात आघाडी उभारून २६ जुलै १९५३ रोजी संघर्षाला सुरुवात केली.
फिडेल कॅस्ट्रोने सॅन्टिॲगो येथील "मॉन्काडा" या लष्करी तळावर हल्ला करण्याआधी आपल्या १५५ सहाकाऱ्यांना उद्देशून केलेले स्फूर्तीदायक भाषण (२५जुलै १९५३)-
"आणखी काही तासांत आपण विजयी होऊ किंवा पराभूत होऊ. हे उघड होईलच. पण त्याहून महत्त्वाचं म्हणजे आपली चळवळ यशस्वी ठरेल यात शंकाच नाही. जर आपण विजयी झालो तर मार्तीचे स्वप्न लवकरच पूर्ण होईल. जर आपल्याला अपयश आले, तरी आपल्या कृतीमुळे क्युबातील लोकांना स्फूर्ती मिळेल आणि त्यातूनच क्युबासाठी मरायला तयार असलेले तरुण निर्माण होतील. हे तरुण आपल्या क्रांतीची ज्योत हाती घेऊन आपला लढा पुढे नेतील. ओरीएंट (क्युबातील एक स्थळ) आणि संपूर्ण बेटातील (क्युबातील) लोक आपल्याला पाठींबा देतील. १८६८ आणि १८९२ प्रमाणेच, ओरिएंट येथूनच आपण स्वातंत्र्य किंवा मृत्यू अशी आपली पहिली घोषणा देत आहोत." [३]
सॅन्टिॲगो येथील "मॉन्काडा" या लष्करी तळावर हल्ला केल्यानंतर त्यांना अटक झाली आणि सुटका झाल्यानंतर ते मेक्सिकोमध्ये गेले व तेथे त्यांनी बंडखोर लष्कराची स्थापना केली. आपले समर्थक आणि आपल्या लष्करासह ते पुन्हा क्यूबामध्ये दाखल झाले. या लष्करविरोधातल्या कटातील बहुतेक जणांना एक तर ठार केले नाही तर अटकेत ठेवले गेले. या कारवाईतून कॅस्ट्रोसह एक छोटा गट वाचला, आणि पूर्वकडील डोंगराळ भागात जाऊन लपून बसला. त्यानंतर त्यांनी एक अधिक मोठे लष्कर उभारले आणि फुलजेन्को बटिस्ताने १ जानेवारी १९५९ रोजी क्यूबातून पलायन केल्यावर क्यूबाची सत्ता हस्तगत केली.
क्यूबाने रशियाशी मैत्री करून केलेल्या अणुकरारानंतर युनायटेड स्टेट्सने क्यूबाबरोबरच्या व्यवहाराला विराम दिला. त्यानंतर तीन दशके क्यूबा आणि रशियाचे मैत्रिपूर्ण संबंध होते. पूर्व युरोपात डाव्या विचारांचा पराभव झाल्यानंतरही ते संबंध कायम राहिले. रशियाच्या विचारप्रणालीशी जवळीक असल्याने अमेरिकेचा फिडेलला विरोध होता. अमेरिका सतत त्याविरुद्ध कारवाया करत असे. असाच एक प्रयत्न १९६०साली करण्यात आला. अमेरिकेचे अध्यक्ष आयसेनहॉवर याने अमेरिकन गुप्तचर यंत्रणा सीआयएच्या मदतीने फिडेलचे सरकार पाडण्याचा प्रयत्न केला पण हा प्रयत्न निष्फळ ठरला. त्यानंतर १३ ऑक्टोबर, १९६०साली अमेरिकेने क्युबावर व्यापार बंदी लादली.अमेरिकेच्या कुरघोड्या सुरूच होत्या. एप्रिल १९६१मध्ये अमेरिकेच्या निमलष्करी दलाचा गट जो सीआयएद्वारे प्रशिक्षित होता तो दक्षिण क्युबातील पिग्सच्या आखातात घुसला व तिथून क्युबावर हल्ला करण्याची योजना होती. पण क्युबाने निव्वळ तीन दिवसात त्यांचा पराभव केला. १९६२मध्ये अमेरिकासारख्या महासत्तेविरुद्ध अमेरिकेच्या शत्रूचा; म्हणजेच रशियाचा क्षेपणास्र तळ क्युबामध्ये उभारण्याची हिंमत फिडेलने दाखवली. नंतर रशियाच्या निकिता ख्रूश्चेवच्या कमजोर नितीमुळे वा अमेरिकन अध्यक्ष जॉन केनेडीच्या मुत्सद्देगिरीमुळे तो तळ क्युबातून काढून टाकण्यात आला. [४]
फिडेलने आपल्या ४९ वर्षांच्या कारकिर्दीत महत्त्वपूर्ण कार्य केले. पहिल्या कृषिक्रांतीत त्याने दोन लाख शेतकऱ्यांना जमिनीचे स्वामित्व दिले. शिक्षण क्षेत्रात भरीव कामगिरी केली. एका वर्षात निरक्षरता नष्ट करून ९९% क्युबन जनता साक्षर केली. बालमृत्यूचे प्रमाण ४२% वरून ४% वर आणले. सत्तेत येताच पहिल्या सहा महिन्याच्या काळात १००० किमीचे रस्ते बांधले. दर महिन्याला ८०० घरांची उभारणी केली. अखेरच्या काळात त्याने क्यूबाच्या जीडीपीपैकी १२% उत्पन्न आरोग्यसेवेवर खर्च केले. खेळांना प्रोत्साहन दिले.
क्युबाच्या प्रगतीसाठी फिडेलने सर्वप्रथम आरोग्य, शिक्षण, घरे, अन्न ह्या प्राथमिक गरजांकडे लक्ष पुरवले. आजही क्युबाची आरोग्यसेवा जगातील सर्वोत्कृष्ट मानली जाते. २०००-०६ दरम्यान व्हेएनझुलिया-क्युबामध्ये एक महत्त्वपूर्ण करार झाला. त्यानुसार क्युबाने २०हजार डॉक्टर व्हेएनझुलियामध्ये पाठवावे व त्याबदल्यात व्हेएनझुलियाने क्यूबाला ५३ हजार बॅरल खनिजतेल (प्रतिदिन) सवलतीच्या दरात पाठवावे. २००४मध्ये हे प्रमाण ४० हजार डॉक्टर व ९० हजार बॅरल इतके वाढवले गेले. यामुळे क्युबाच्या अर्थव्यवस्थेला मोठ्या प्रमाणात फायदा झाला.
१९७६ साली फिडेल अलिप्ततावादी राष्ट्रांच्या गटाचा (Non-Aligned movement) जनरल सेक्रेटरी झाला. ही तीच अलिप्ततावादी चळवळ; जी सुरू करण्यात भारताचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा महत्त्वाचा वाटा होता. १९५९ साली स्वतंत्र झाल्यानंतर क्युबाला राष्ट्र म्हणून मान्यता देणारे जे सुरुवातीचे देश होते त्यात भारतही होता.
पंडित नेहरुंबद्दल एक आठवण भारताचे माजी परराष्ट्रमंत्री के.नटवरसिंग यांना सांगताना फिडेल म्हणाला की “१९६०साली न्यू यॉर्क येथील संयुक्त राष्ट्रांच्या सर्वसाधारण सभेसाठी आलो असताना हॉटेलमध्ये मला भेटायला येणारी पहिली व्यक्ती पंडित नेहरू होते. मी त्यांचे प्रभावी हावभाव कधीच विसरू शकत नाही. मी फक्त ३४ वर्षांचा होतो. तणावात होतो. नेहरुंनी माझी हिंमत, मनोधैर्य वाढवले व त्यामुळे माझा तणाव नाहीसा झाला.” [५]
त्यानंतर १९८३साली फिडेल कॅस्ट्रो अलिप्ततावादी गटांचे अध्यक्षपद इंदिरा गांधींकडे सुपूर्द करण्यासाठी भारतात आला. त्यावेळी त्याचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. भारत-क्युबा संबंधांचे त्याने कौतुक केले. भारत व क्युबा हे खरे मित्र आहेत, असे तो म्हणाला. इंदिरा गांधींनंतर राजीव गांधी ते मनमोहन सिंग यांच्या पर्यंत अनेक भारतीय पंतप्रधानांनी फिडेलची भेट घेतली आहे.[६]
१९९२ साली जेव्हा क्युबामध्ये आर्थिक अडचणी निर्माण झाल्या तेव्हा भारताने १०,००० टन गहू व १०,००० टन तांदूळ क्युबाला पाठवले. ह्या मदतीचे फिडेलने ‘ब्रेड ऑफ इंडिया’ असे वर्णन केले. क्युबा व भारत यांचे आजतागायत राजकीय, आर्थिक व सांस्कृतिक मैत्रीपूर्ण संबंधआहेत.[७]
इ.स. १९४८मध्ये फिडेल कॅस्ट्रो यांनी मिर्टा डाएज - बलार्ट यांच्याशी विवाह केला. या उभयतांना इ.स. १९४९ साली मुलगा झाला. त्याचे नाव फिडेल फेलिक्स कॅस्ट्रो डियाज - बलार्ट असे आहे. १९५५ साली त्यांचा घटस्फोट झाला. फिडल कॅस्ट्रो मान्य करत नसले तरी दलिया सोटो डेल वॅले नावाच्या शिक्षिकेबरोबर त्यांचा विवाह झाल्याचे वृत्त आहे. या शिक्षिकेपासून त्यांना पाच मुले असल्याचेही सांगण्यात येते. या व्यतिरिक्त त्यांची अनेक लग्ने झाली असल्याचे आणि त्यांना अनेक मुले असल्याचे सांगण्यात येते.
"नेहमी मानवी हक्कांबद्दल बोललं जातं, परंतु मानवतेच्या हक्कांबद्दल बोलणे देखील आवश्यक आहे. इतरांना महागड्या गाड्यांतून प्रवास करता यावा म्हणून काही लोकांनी अनवाणी चाललं पाहिजे का? इतरांना ७०वर्षे जगता यावं म्हणून काहींनी ३५ वर्षेच का जगायचं? इतरांनी गडगंज श्रीमंत होण्यासाठी काहींनी दीनदुबळं का असावं ?
ज्यांच्याकडे खायला भाकरीचा तुकडाही नाही अशा जगभरातल्या मुलांच्या वतीने मी बोलत आहे व ज्यांच्याकडे औषध नाही अशा आजारी लोकांच्या वतीने मी बोलत आहे. आणि त्यांच्याही वतीने, ज्यांचे जगण्याचे हक्क आणि आत्मसन्मान नाकारले गेले आहेत."
अतुल कहाते यांनी ‘फिडेल कॅस्ट्रो’ या नावाचे मराठी चरित्र लिहिले आहे. याशिवाय अरुण साधू यांचे क्यूबाच्या क्रांतीवरील ‘फिडेल,चे आणि क्रांती' नावाचे पुस्तक आहे. Ignacio Ramonet याने Fidel castro with Ignacio Ramonet MY LIFE हे फिडेल कॅस्ट्रोचे स्पॅनिश आत्मचरित्र लिहिले आहे व Andrew Hurley याने त्याचा इंग्रजी अनुवाद केला आहे.
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.
Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.