From Wikipedia, the free encyclopedia
विकिपीडिया (www.wikipedia.org) हा एक मुक्त ज्ञानकोश आहे. विकी हे सॉफ्टवेअर वापरून हा ज्ञानकोश तयार केला आहे. विकिमिडिया फाउंडेशन ही विनानफ्याच्या तत्त्वावर चालणारी संस्था ह्या ज्ञानकोशाच्या व्यवस्थेचे आणि नियंत्रणाचे काम पाहत आहे.
विकिपीडिया हा विकिपीडिया वाचकांनीच एकत्रित पणे internet वर संपादित केलेला मुक्त ज्ञानकोश आहे. हे विकी वेबपेज आहे ज्याचा अर्थ कुणीही (अगदी तुम्ही सुद्धा,) ह्या वेबपेजची बहुतेक पाने/लेख 'संपादन' लिहिलेल्या कळीवर टिचकी मारुन संपादन सुरू करु शकता.
हा मुक्त ज्ञानकोश जगातील सर्व भाषांमध्ये लिहीला जात आहे,मराठीचा पण यात समावेश आहे. या मुक्त ज्ञानकोश चे वैशिष्ट्य हया ज्ञानकोशाचे कुणिही सहज संपादन करु शकते.विकिपिडीया चे स्वरुप स्वयंसेवी आहे internet उपलबद्ध असलेली कोणतिही व्यक्ति याचे लेखां मधील माहितीत सुयोग्य बदल घडवु शकते .अनेक मराठी बांधव व भगिनी यास हातभार लावत आहेत.
विकीतील नाव नोंदणी मुळे विकीचे संपादन सुकर होते, पण बहुतेक वेळा नाव नोंदणी हि अत्यावश्यक बाब नाही.नाव नोंदणीमुळे एकत्र येऊन लिखाण करण्याचे काम आणि संपर्क सुलभ रहाते.
मराठी विकिपीडीया ही एक *पाहिलीच पाहिजे* अशी साईट आहे. ह्यावर तुम्हाला सर्व प्रकारची माहिती मिळेल शिवाय जिथे माहिती उपलब्ध नाही तिथे भर घालण्याची संधी सुद्धा आहे. विषयांचा परिघ सामान्य ज्ञानकोशा पेक्षा व्यापक असतो.वेगाने बदल करणे सहज शक्य असल्यामुळे अद्ययावत माहिती उपलब्ध असु शकते.छापिल मजकुराची कागदाची मर्यादा नसल्या मुळे मजकुर त्रोटक आणि विस्तृत दोन्ही स्वरुपात उपलब्ध करून देता येतो.
लेखां मध्ये सहज परस्पर संदर्भ देता येतात. यापेक्षा आणखी काय हवे?अर्थात माहितीचा तारतम्याने वापर करणे अपेक्षित आहे कारण हि माहिती काही वेळा चुक असु शकते.विकिपिडियावरील लेख शोधाभ्यासासाठी अवलंबुन राहण्याइतपत खात्री लायक असतील हे नक्की नसते. परंतु एखाद्या संकल्पनेबद्दल इतरांची मते सहजपणे तौलनिकदृष्ट्या अभ्यासता येतात. अभ्यासाची किंवा शोध निबंध संकल्पनेची आणि शोधांची सुरवात करता येते.मराठीतील विकिपिडीया इतर भाषांप्रमाणेच गुगल सारखी शोधयंत्र वापरून शोधता येतो.
शिवाय हा एक समाजाभिमुख उपक्रम आहे. विकीपीडिया प्रकल्प हे लोकांचे, लोकांनी लोकांसाठी चालवलेले उपक्रम आहेत. याचा कोणी एक मालक किंवा प्रशासक नाही. सर्वांच्या योगदानातून एक मुक्त (सर्वांना विनामूल्य उपलब्ध असलेला) ज्ञानकोष तयार करणे हा विकीपीडियाचे उद्देश्य आहे.
चार लोकांनी एकत्र येऊन माहिती गोळा करून सूत्रबद्ध पद्धतीने मांडण्याचे विकि. हे एक माध्यम आहे. चार टाळकी एकत्र आली तर बर्याचदा ती भल्याभल्या तज्ञांपेक्षा जास्त चांगली कामगिरी करू शकतात . (इंग्रजी विकि मध्ये ते काही अंशी दिसून पण आलं आहे).
कोणत्याही वेबपेजचा ताजेपणा टिकवून ठेवणे सतत नवी माहिती चढवणे एक वेबपेज तयार करणार्या व्यक्ती समोरचे,संस्थे समोरचे मोठे आव्हाने असते.
मी साधारणता दीड वर्षापूर्वी माझी विकिशी ओळख झाली ती,तेंव्हा वस्तुतः मी त्यावेळी महाराष्ट्र मंडळ करिता-माझे अल्प स्वल्प trial and error ज्ञान वापरून- एक संकेत स्थळ बनवण्याच्या विचारात होतो, bbc world service वर विकिपीडिया चे संस्थापक जिमी वेल्स यांची मुलाखत ऐकल्यामुळे माझा असा गोड समज झाला की विकिवर संकेत स्थळ कोणत्याही विषयावर बनवता येते आणि कुणी पण संपादन करू शकते . मला अती आनंद झाला एकाच माणसावर म्हणजे माझ्या एकट्यावर वेबपेज अपडेटचे ओझे कमी झाले असते असे वाटून लगेच विकिपीडिया चा google वर शोध घेऊन प्रयोग काही वाक्ये लिहून सेव्ह केला . दुसरे दिवशी पेज उघडून बघतो तर त्या वर deletion ची चक्क नोटिस लागलेली. अधिक माहिती घेतली तर लक्षात आले community pages म्हणून विकिपीडिया वापरता येत नाही तो फक्त एक encyclopedia आहे.
मग इतर काही लेख वाचून दुसरा एक लेख लिहिला त्या लेखाला पण deletion notice का तर म्हणे यावर पहिले किंवा मुळलेखन प्रसिद्ध करायचे नसते. म्हटलं तकतकच आहे सगळी. मग काही काळ विकिपीडिया कडे दुर्लक्ष केले. नाही म्हणायला थोडे इंग्रजी विकिपीडिया वर वाचन चालू राहिले. कालांतराने एक दोन गोष्टी लक्षात आल्या एकतर विकिपीडिया गळ्याखाली उतरण्यास वेळ लागला तरी अगदीच तकलादू संकल्पना नाही,विकिपीडिया ची मराठी आवृत्ती पण आहे. पण तिथे हे लोक मराठीत लिहितात कसे हे कळत नव्हते.
तसा मराठी शब्दांच्या images बनवण्या साठी बराहा editor चा उपयोग सुरू केलेला होता. सहज चाचपण्या करिता एकदा baraha direct utility,उघडून पाहिली आणि लक्षात आले की सोय सोपी आहे. मराठी विकिपीडिया तील अविशिष्ट लेख टिचकी मारावी तिथे रिकामे त्यातील एक दोन लेख लिहून पाहिले पण समाधान नव्हतेच खूप थोडे लोक मराठी लेख लिहितात माझ्या सारख्या नवशा गवशांचे राज्य बर्या पैकी आहे असे लक्षात आले. अजून तज्ञ हौशी लोक यावेत त्यांनी काही लिहावे असे वाटले म्हणून हा सारा लेखन प्रपंच केला .
मनोगत संकेतस्थळावरील विकिपीडिया बद्दलचे विविध आक्षेप वाचले सर्वच आक्षेप चुकीचे नाहीत त्यात काही तथ्य आहे स्वतः विकिपीडिया चे संस्थापक जिमी वेल्स यांनी विद्यार्थी वर्गास विकिपीडिया चे संदर्भ शैक्षणिक संशोधनात उधृत न करण्याचा सल्ला देतात.विकिपीडिया संकल्पना वेगळी आहे याचा अर्थ विकिपीडिया पण पूर्ण टाकाऊ आहे असा निश्चित होत नाही.
विकिपीडिया ला नवशा आणि गवशांचा अजिबात त्रास होत नाही असे नाही परंतु तज्ञांचे योग्य पुरावायुक्त माहितीस हात लागू नये लागला तर तो सुधारला जावा इतपत हौसे तिथे नेहमीच उपलब्ध राहतं आले आहेत.काही हौसे फक्त लिहिण्याची हौस बाळगतात काही दुरुस्त्या करण्याची,काही आहे त्या चांगल्या लेखांना सांभाळण्याची. एकूण over a period of time balance साधला जातो.
पण विकिपीडिया ची खरंच गरज आहे का? मला वाटते ती तशी आहे.Google वरून मिळणारी searches विस्कळीत असतात एवढे करून सर्व माहिती एके ठिकाणी पाहण्यास मिळेल असे होत नाही.छापील मजकुराची कागदाची मर्यादा नसल्या मुळे मजकूर त्रोटक आणि विस्तृत दोन्ही स्वरूपात उपलब्ध करून देता येतो. विकिपीडिया एकतर ज्ञानकोश ची गरज भागवतो.विकिपीडिया चे स्वरूप स्वयंसेवी आहे internet उपलबद्ध असलेली कोणतीही व्यक्ती याचे लेखां मधील माहितीत सुयोग्य बदल घडवू शकते
एका पेक्षा अधिक व्यक्तींनी माहिती संपादीत करत गेल्या मुळे माहितीत ताजे पणा संतुलित पणा येतो.अधिकाधिक संपादना नंतर कालपरत्वे लेख परिपक्व होत जातात.वेगाने बदल करणे सहज शक्य असल्यामुळे अद्ययावत माहिती उपलब्ध असू शकते.
विकिपीडिया वरील लेख शोधाभ्यासासाठी अवलंबून राहण्याइतपत खात्री लायक असतील हे नक्की नसते. परंतु एखाद्या संकल्पनेबद्दल इतरांची मते सहजपणे तौलनिकदृष्ट्या अभ्यासता येतात. अभ्यासाची किंवा शोध निबंध संकल्पनेची आणि शोधांची सुरवात करता येते.
विषयांचा परिघ सामान्य ज्ञानकोशा पेक्षा व्यापक असतो. अत्यंत छोट्या भाषेतील भाषासमुहातील लोकांकडची छोट्यात छोट्या माहितीचे संकलन शक्य होते.
दुसरे तर प्रत्येक तज्ञ हा कुठेतरी माणूस असतो त्याच्या वैयक्तिक विचारांचा प्रभाव कुठे न कुठे लिखाणावर पडत असतो . विकिपीडिआवरील लेख पुन्हा पुन्हा आढावा घेऊन संपादित होतात त्यामुळे प्रत्येक आवृत्तीगणिक त्यातील एकांगी पणा कमी होण्यास मदत होते. कालांतराने तर्क निष्ठता वाढू शकते. विकिपीडियातील लेखांनी सर्व संबंधित बाजूंचा सर्वसमावेशक तपशील देणे अपेक्षित असते.
विकिपीडिआ:परिचय या लेखात नियमांची माहिती वाचण्यास मिळते.विकिपीडियाचे बहुसंख्य नियम बंधने अस्थायी आहेत. ते सहसा विकिपीडियातील लेखांच्या योग्य सुधारणांच्या आड येत नाहीत. सर्व नियम सर्वानुमते बनवले जातात.येथे कुणीही व्यक्ती peer reveiw नंतर administrator समन्वयक होऊ शकते.
विकिपीडिया, विकिपिडीयाची वैगुण्ये गृहीत धरून सुद्धा त्याच्या मुकत सार्वत्रिक उपलब्धते मुळे, विविध विषयांच्या व्यापक परिघामुळे, सहज शक्य असलेल्या चर्चा आणि सतत सुधारणां मुळे आज internet वरील सर्वाधिक वापरला जाणारा ज्ञानकोश झाला आहे.
फुल नाहीतर पाकळी ज्ञानयज्ञात वाहण्याची संधी विकिपीडिया मुळे मिळते. आणि हे जे मी इथे लिहू शकलो ते सर्व वैयक्तिक अनुभव विकिपीडिया वर लिहिता येत नाहीत म्हणून मनोगत सारखे मराठी ब्लॉग्स सुद्धा हवेत.
प्रसिद्ध मराठी संत समर्थ रामदास म्हणतात आपणासी जे जे ठावें, ते दुसऱयांसी सांगावे, शहाणे करूनी सोडावे, सकलजन. मराठी विकिपिडीयासाठीच जणू त्यांनी हे लिहून ठेवले होते! बिनधास्त पणे आपल्यास अवगत असलेल्या ज्ञानाचा परिचय लाभ स्वयंसेवी सहकारी पद्धतीने internet आणि विकीपिडीया वापरून करून द्या आणि त्यांचे हे वचन अमलात आणा.
नेहमी विचारले जाणारे प्रश्न आणि मनोगत व विकिपीडिया संकेतस्थळावरून मिळालेले वाचक प्रतिसाद.
१)विकिपीडिया समाज काय आहे?
२)विकिपीडिया समाज काय नाही?
आचार अथवा विचारांची युद्ध भुमी नाही.कोणतेही मतभेद कमी करण्या करिता विशिष्ट पद्धती[6]अवलंबणे अपेक्षीत आहे.विकीपिडिया चा उपयोग विकिपिडीयास किंवा कोणत्याही वापरकर्त्यास कोणत्याही प्रकारची त्रास/ धमकी देणे अपेक्षीत नाही. विकिपिडीया अनियंत्रित नाही.येथे बहुसंख्य निर्णय चर्चा करून एकमताने घेतले जातात विकिपिडीया राजकिय किंवा लोकशाहीचा प्रयोग नाही.निर्णय परस्पर विचार विमर्ष करून होतात एकमत चर्चेद्वारे घडवले जाते पण बहुमत असणे हि आवश्यक बाब नाही विकिपिडीया हा नियम बनवण्याचा चाकोरी बद्ध कार्यक्रमहि नाही.नियमांचा उपयोग केला जातो पण त्यांना घट्ट कवटाळुन बसणेही अपेक्षीत नाही. ३)उपरोल्लेखित विकिपीडिया मुक्त ज्ञानकोशात समाविष्ट होउ न शकणार्या काही गोष्टी विकी च्या इतर सहप्रकल्पात अंतर्भुत करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे काय?
होय विकिचे सहप्रकल्प पुढीलप्रमाणे
विक्शनरी मराठीचा मुक्त शब्दकोश विकिबुक्स मराठीतील मुक्त ग्रंथसंपदा मराठीतील मुक्त अवतरणे सुविचार, म्हणी, वाक्प्रचार, इत्यादी करिता विकिसोर्स मुक्त स्रोत मुळस्रोत किंवा मुळ संशोधन प्रसिद्ध करण्या करिता. विकि जैवकोश विकि बातम्या विकिकॉमनस् सामायिक भांडार सामायिक रित्या उपल्ब्ध केल्या जाणार्या छायाचित्र इत्यादी करिता ३)विकिपीडिया हा शब्द कसा तयार झाला ?खुलासा केल्यास उपकृत होईन.
Wikipedia(विकिपीडिया) Wiki आणि encyclopedia या दोन शब्दांची संधी आहे.Wiki हि एक encyclopedia च्या 'एंट्रीज' कुणालाही 'ऑनलाईन' 'इंटरनेट' वर करता येतील अशी संगणक प्रणाली आहे. विकी (Wiki / wiki ) हे वापर करणार्यांना उपलब्ध माहितीत भर घालायला, तसेच त्या माहितीचा वापर करणार्यांना बदल किंवा दुरुस्त्या करण्यास मुभा देणारे ।संकेतस्थळ आहे. विकीतील नाव नोंदणी मुळे विकीचे संपादन सुकर होते, पण बहुतेक वेळा नाव नोंदणी हि अत्यावश्यक बाब नाही.यामुळे एकत्र येऊन लिखाण करण्याचे काम आणि संपर्क सुलभ रहाते. विकी या संकेतस्थळ चे काम करणार्या संगणक प्रणालीस सुद्धा विकी असे म्हणतात.विकीचे पहिले प्रारुप "विकीविकीवेब" वॉर्ड कनिंघम यांनी इ.स.१९९५ यांनी केले. हवाई प्रदेशातील भाषेत 'विकी-विकी'चा अर्थ 'लौकर,चटकन' असा होतो.
४)विकीपेडिया, कुणीही संपादन करू शकत असल्यामुळे निर्दोष (ऍक्युरेट) राहणे शक्य आहे का? तो निर्दोष कसा राहू शकेल का? त्यातिल तथ्ये निश्चित कशी करता येतील (व्हॅलिडेशन)? दुरूस्ती आणि तथ्यांकन झाल्यावर ती माहिती स्थिरपद (लॉक) कशी करता येईल?त्यामुळे विश्वकोशाची विश्वासार्हता कशी पडताळायची?
दुसर्या स्रोताशी तूलना करून! जसं आपणं आजाराच्या बाबतीत सेकन्ड ओपीनियन घेतो तसं. सामान्य आजार असेल तर कोणताही डॉ. चालतो तसच सामान्यतः विकि. (इथे मला सध्या तरी इंग्रजी विकि अभिप्रेत आहे. मराठी विकि. अजून बाल्यावस्थेत आहे) मधली माहीती बरोबर असते. खोलात शिरायच असेल तर सेकन्ड ओपीनियन ला पर्याय नाह
एखाद्या विषयाची थोडीफार वरवरची कल्पना यायला ठीक आहे... (पण तपशील थोडेफार 'मिठाच्या खड्याबरोबरच घेतलेले' बरे!
विकिपिडीया ही कोणी एक व्यक्ती नाही. ते आपल्या मराठी समाजाचे एक प्रतिबिंब आहे. जर बहुतांशी समाजाला चुकीची माहिती टाकण्याची इच्छा असेल तर विकिपिडीयाची बहुतेक माहिती चुकीची होईल. विकिपिडीया समाजाचा असा मूलभूत सिद्धांत आहे कि सुधारणा करणारे आणि इच्छिणारे लोक विध्वंसक लोकांपेक्षा संख्येने जास्त आहेत. निदान इंग्रजी विकिपिडीयावर तरी कुठल्याही लेखाची केलेली नासधूस अगदी ५ मिनिटांत परतवली जाते.
विकी मी माझ्या महाविद्यालयीन दिवसांपासून वापरतोय. मला तरी ते एक 'महान' कार्य वाटते. (त्याच्या उणीवा काही का असेनात, अतिशय कामाला आलेले आहे ते आमच्या.) तात्या, जगातील सर्व लोकांनी एकत्र येऊन एकमेकांच्या सहकार्याने, एकमेकांसाठी बनवलेला 'मुक्त' ज्ञानसाठा... ही कल्पना किती सही आहे!मी आधीही एका चर्चा प्रस्तावात अशा प्रकल्पांना 'ह्या महाजालाच्या युगात मराठीचे काय होईल?' ह्या प्रश्नाचे उत्तर असे म्हणले आहे.
माझे वरचे प्रतिसाद वाचल्यास आपल्याला असे लक्षात येईल, की अचूक माहिती म्हणून लिहिलेल्या एन्सायक्लोपीडिया मध्ये देखील विज्ञानातल्या प्रत्येक लेखात (विज्ञानात, ज्यात द्रष्टानिरपेक्ष माहिती अपेक्षित आहे) सरासरी ३ चुका असतात. त्यामुळे तुम्हाला जी माहिती आहे (आणि ती महिती सरासरी मानवापेक्षा जास्तच मानावी लागेल) ती लिहिली तरी त्यापेक्षाही विद्वान जे लोक असतील ते संपादन करून बरोबर करून घेतील. आम्ही लिहिले म्हणून आमच्या चुका काढू नये अशी जर सगळ्यांचीच धारणा असली तर ज्ञानात भर कशी पडणार ? आपल्यासारख्या शोधवैज्ञानिकाकडून तरी अशी अपेक्षा नव्हती. लिहिलेलं चेक होत नाही, हा मुळी मुद्दाच चुकीचा आहे. उलट मुक्त स्वरूपामुळे लिहिलेले इतर कुठेही तपासले जाते त्यापेक्षा विकीपीडिया वर जास्तच तपासले जाते. (मी इथे इंग्रजी विकीपीडियाविषयी बोलतोय. मराठीची सदस्यसंख्या वाढली की तिथेही अशीच तपासणी वाढेल.) एखादा सदस्य सारखा खोटी माहिती देत असेल, छत्रपती मिलिन्द सारखी, तर त्याला विकीपीडियावरचे कार्यवाह हद्दपार देखील करू शकतात. असे सगळे असताना त्यावर कुणाचेही नियंत्रण नाही असे म्हणणे हे चुकीचे आहे. अहो वर्तमानपत्रात वार्ताहर बातम्या देतात, त्याच्या सत्यासत्यतेची तपासणी करायला संपादक जातात का ? वार्ताहर म्हणतो म्हणजे ते खरेच आहे असे मानतातच ना ? म्हणून काय आपण वर्तमानपत्रातल्या बातम्यांवर विश्वास ठेवणे सोडून दिले आहे काय ? एखाद्या बातमीत चूक वाचकाला आढळून येते, तो संपादकांना पत्राने कळवतो, आणि मग एका छोट्याशा रकान्यात संपादक "चुकीची दुरुस्ती" छापतो. विकीची महती अशी की चुकांचे परिमार्जन लगेच आणि मूळ बातमीतच करता येते. विकीमध्ये वापरल्या जाणार्या आज्ञावलीत सतत बदल होत असतात, त्यात विकीमधली माहिती अधिक उपयुक्त कशी व्हावी ह्यासाठी तांत्रिक बाबींचा सखोल विचार नेहमीच होत असतो. इंग्रजी विकीपीडियाला जितके महत्त्व प्राप्त झाले आहे तितके मराठी विकीपीडियाला देखील प्राप्त व्हावे ह्यासाठी सर्व मराठी जनांनी प्रयत्नाची आवश्यकता आहे. चुका आहेत हे तर निश्चितच पण विकिसारख्या प्रकल्पात चुकांची संख्या ही संपादकांच्या संख्येच्या व्यस्त प्रमाणात असते.मराठी विकि. अजून बाल्यावस्थेत आहे. संपादकांची संख्या खूपच कमी आहे. (याला माझ्या मते मुख्या कारण म्हणजे मराठी टंकित करण्या साठी विकि. कडे मनोगत सारखा interface नाही).
Nature या प्रसिद्ध शास्त्रीय नियतकालिकाने इंग्रजी विकी आणि एनसायक्लोपीडीया ब्रिटॅनिका यांतील अनेक महत्त्वच्या शास्त्रीय संदर्भांच्या विषयीच्या माहीतीची तूलना केली होती. त्यात असे आढळले की जवळ जवळ सर्व बाबतीत विकि. आणि ए.ब्रि. तुल्यबळ आहेत. अधिक माहिती साठी हा दुवा पाहणे. तात्पर्य असे की आपल्या सारख्या प्रत्येकाने स्वतः ला रुची असलेल्या विषयांचे संपादन केले तर चुका कमी होतील. मतभेद सोडवण्यासाठी, संदर्भ देण्यासाठी वगैरे इंग्रजी विकि. मध्ये Talk pages चा वापर फार चांगला केला आहे. मराठी विकि. ला अजून बरीच मजल गाठायची आहे.
५)आणि उद्या समजा आम्ही अशी एखादी चूक दुरूस्त केलीच, पण परवा अजून तिसरा कुणी येऊन त्याच्यावर आणखी काहीतरी लिहून ठेवणार नाही हे कशावरून?
संपादन इतिहास साठवलेला असतो. त्यामुळे कुणी वायफळ बदल केले तरी तुम्ही तुमच्या संपादना नंतरच्या आवृत्तीला परत एका क्लिक मध्ये जाऊ शकता.
पारंपारिक ज्ञानकोषां सारखा हा कोष नाही हे खर आहे. पण जसं "futures market" मध्ये जितके जास्त लोक bet करतात तितकी अचुकता वाढते तसेच इथेही आहे असं मला वाटत. मला वाटत विकीच महत्त्व हे त्याच्या जागतिक उपलब्धते मध्ये आहे. विशेषतः इंग्रजी विकि. मधली माहिती सामान्यतः बरोबर असते. (ही स्थिती येण्यासाठी इं. वि. ला अनेक संपादकांचा हातभार लागला आहे. तपशीलाच्या चुका असू शकतात आणि त्या विकतच्या कोषांमध्ये सुद्धा असतात.
ज्यांनी डोळ्यात तेल घातलंय, ते पुढार्याच्या भाषणापासून अग्रलेख, एन्साय्क्लोपीडिया आणि गीता-कुराणापर्यंत सगळंच तपासून बघतील
१०० % सहमत आहे. अभ्यासू चिकित्सकाला माहिती स्रोतांची वानवा नाही.
विकिच्या विश्वासहर्तेविषयी - माझ्या मते हे बरेचसे अवलंबून आहे तुम्ही विकिवरिल माहिती कशासाठी वापरता आहात ह्यावर. मी बर्याचदा विकि वापरतो अशा गोष्टींचा शोध घेण्यासाठी ज्यांचे मला फक्त कुतूहल आहे. चीन मधील प्रेक्षणीय स्थळे कोणती? --- ह्यावर माहिती मिळवण्यासाठी मला पूर्वी हा शोध गुगल वर घ्यावा लागे व त्यांतून हजारो विस्कळीत/असंबद्ध दुवे मिळत असतं ज्यावर हवी ती माहिती शोधणे खूप कठीण होते. आता विकिमुळे हीच माहिती मिळवणे अत्यंत सोपे झाले आहे.
आता हाच शोध मी प्रत्यक्ष चीन ला जाण्यासाठी करत असेन तर ही माहिती एकदा इतर संकेतस्थळांकडून पडताळून घेतले (उदा. चीन सरकारचे अधिकृत पर्यटन स्थळ) की झाले.
इतकी सुविधा आणि तीही विनामूल्य, जाहिरातींच्या जाचा शिवाय उपलब्ध केल्या बद्दल मी तरी विकिचे आभारच मानतो.पण हा उपक्रम काही आदर्श जगात चालत नाही. जिथे इतके लोक संलग्न आहेत तिथे समाजातील सगळ्या प्रवृत्ती दिसणारच. काही चुका अजाणता होतात काही जाणूनबुजून केल्या जातात. सर्वच लोक प्रगल्भ आणि निरपेक्ष/निस्वार्थी असत नाहीत (हे इतरत्रही पाहू शकतो)
काही दिवसांपूर्वी मी विकीवर सक्रिय होतो. मनोगतावरील 'तो' याने विकी बद्दल माहिती व प्रेरणा दिली. त्या नंतर मी विकीवर होतो. आताशा तितका सक्रिय नाही. मात्र मला स्वतःला विकी प्रकल्प आवडतो. त्याच्या ज्या दोषांबद्दल आपण ओरडतो आहोत त्यांसहित सुद्धा विकी हा जगातील एक नावाजलेला विश्वकोश आहे.
विकिपीडिया वरील आत्ता पर्यंतचे ५० मोठे लेख
विकिपीडिआ:संपूर्ण भाषासूची हैदराबाद मुक्तीसंग्राम अखिल भारतीय अण्णा द्रवीड मुनेत्र कळघम अमेरिकन गृहयुद्ध छत्रपती शिवाजीराजे भोसले पान कसे संपादायचे? विकिपीडिआ:चावडी/प्रगती/जुनी चर्चा १ विचार संगणक टंक शरद पवार इंद्रकुमार गुजराल अमेरिकन डॉलर विकिपीडिआ:चावडी/प्रगती/जुनी चर्चा २ छत्रपती संभाजी महाराज गोदावरी नदी विकिपीडिआ:चावडी/प्रगती/जुनी चर्चा २ विकिपीडिआ:परिचय मराठी वाक्प्रचार महाराष्ट्र पर्यटन इंग्रजी-मराठी पारिभाषिक संज्ञा मनोगत मनाचे श्लोक मनाचे श्लोक (उत्तरार्ध) सचिन तेंडुलकर मराठी गोविंद विनायक करंदीकर भाषा जुलै २० ऋतू संगणक विज्ञान विकिपीडिआ साहाय्य:संपादन विष्णुचे अवतार मुंबई शेअर बाजार विकिपीडिआ साहाय्य:Setup For Devanagari सीताराम केसरी इ.स. १९४५ अमृतानुभव अध्याय १ अब्राहम लिंकन चाणक्य मंडल बौद्धिक संपत्तिच्या मालकी बद्दलचे नियम अजिंठा-वेरूळची लेणी मराठा साम्राज्य आयुर्वेद पंडित भीमसेन जोशी गंजिफ़ा स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर शबरीकुंभ पु. ल. देशपांडे क्रिकेट विश्वकप बराहा मध्ये मराठी कसे टाइप करावे
-विकिकर
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.
Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.