नाटकाचा एक विशिष्ट प्रकार From Wikipedia, the free encyclopedia
प्रहसन किंवा फार्स हा नाटकाचा तसेच चित्रपटाचा एक विशिष्ट प्रकार आहे. भरतमुनींनी आपल्या नाट्यशास्त्रात वर्णन केल्याप्रमाणे प्रहसन हा दहा रूपकांपैकी (नाट्यप्रकारांपैकी) एक प्रकार आहे. भरताने प्रहसनाचे दोन भेद सांगितले आहेत. शुद्ध आणि संकीर्ण. आणखी एक वैकृत नावाचा संकीर्ण प्रहसनाचा उपप्रकार आहे. प्रहसनात यथोचित 'वीथ्यंगे' उपयोजावीत, त्यात मुख व निर्वहण हे दोन 'संधि' असावेत आणि आवश्यकतेनुसार एक वा दोन अंक असावेत, असे भरताने म्हणले आहे. प्रहसनांत कैशिकी आणि आरभटी वृत्तींना थारा असू नये असे नाट्यशास्त्र व इतर सहग्रंथ म्हणतात.
प्रहसनाचे दोन्ही प्रकार हास्यरसप्रधान असतात. शुद्ध प्रहसनात पात्रे अनेक असली तरी हास्यकारण वागणूक बहुधा एकाचीच असते. संकीर्ण प्रहसनात वेश्य, चेट, विट, धूर्त, हिजडे आणि छिनाल स्त्रिया असू शकतात, तर शुद्ध प्रहसनात तपस्वी, साधू भिक्षू वगैरे.असतात.
शुद्ध प्रहसनाची उदाहरणे : शशि-विलास, सागरकौमुदी, कंदर्पकेलि वगैरे. भगवज्जुका, सैरंधिका आणि लटकमेलक ही संकीर्ण प्रहसनाची भरताने सांगितली उदाहरणे आहेत.
फार्स या इंग्रजी नाट्यप्रकावरून मराठीत आलेला प्रहसन हा आधुनिक प्रकार भरतप्रणीत प्रहसनापेक्षा वेगळा आहे. अतिशयोक्त, असंभवनीय घटना, विदुषकी चाळे, शाब्दिक कोट्या यांद्वारे प्रेक्षकांना मनसोक्त हसवणे हा या प्रहसनांचा उद्देश. यांत पात्रांचा गोंधळ आणि धिंगाणा प्रहसनभर चालू असतो. या प्रकारच्या मराठी प्रहसनांची उदाहरणे :
वगैरे वगैरे.
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.
Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.