From Wikipedia, the free encyclopedia
प्रवाळाची बेटे ही निसर्गात अस्तित्वात असणाऱ्या असंख्य गुंतागुंतीच्या परिसंस्थापैकी सर्वाधिक वैविध्यपूर्ण आणि रहस्यमय अशी परिसंस्था (ecosystem) आहे. ही बेटे प्रामुख्याने समुद्राच्या उथळ, पारदर्शक भागात वाढतात. प्रवाळाच्या बेटांचा कठीण पृष्ठभाग चुनखडीचा बनलेला असतो.
सागरी पाण्याखाली विशिष्ट परिस्थितीत वाढणाऱ्या सिलेंटरेटा (phylum coelenterata) या वर्गातील (class Anthozoa)मधील लहान आकाराच्या प्राण्यांच्या वसाहती म्हणजे प्रवाळ.
१)आरोग्यपूर्ण(सक्षम)प्रवाळ २)तानलेले प्रवाळ ३)पांढरे(मृत) प्रवाळ
मालदीव व लक्षद्वीप येथे प्रवाळाची बेटे आहेत.
आधुनिक शास्त्रज्ञांच्या मते बेटांवर आढळणारे प्रवाळ हे तापमान बदलासंदर्भात अतिशय संवेदनशील असतात. समुद्राच्या पृष्ठभागाशी झालेल्या थोड्या बदलाने त्यांच्या रंगावर परिणाम होतो, म्हणूनच प्रवाळ हे जागतिक हवामान बदलाचे अतिसंवेदनक्षम निर्देशक आहेत.:-संदर्भ- (महाराष्ट्र राज्य शिक्षणमंडळाचे १० चे भूगोलाचे पुस्तक)
प्रवाळ हे खनिज / दगड नसून वनस्पती /जीव आहेत व त्यांच्या अतिउपयोगाने काही प्रदेशात त्यांची संख्या कमी झाली आहे. प्रवाळांची कमतरता म्हणजे थेट सागरी अन्नसाखळीला धोका आहे. हे लक्षात घेऊन दागिन्यांमध्ये पोवळे/प्रवाळ वापरू नयेत. काही कंपन्या मृत प्रवाळ वापरत असल्याचा दावा करतात मात्र प्रवाळाचे स्थान केवळ अन्नसाखळीत नसून प्रवाळ हे अनेक जिवांचे घरही असते हे सुद्धा लक्षात घेतले पाहिजे.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
== जेव्हा तापमानात बदल होतो तेव्हा प्रवाळ आपल्या पेशात राहणाऱ्या शेवाळंना बाहेर काढतात आणि याच शेवाळामुळे प्रवाळांना रंग प्राप्त होतो. सागरी तापमानाची जर दीर्घकाळ वाढ होत राहिली तर विरंजनाची प्रक्रिया घडते ज्यामुळे प्रवाळ रंगहीन होतात. जगातील 1/5 पेक्षा जास्त प्रवाळ कट्टे (समूह) नष्ट झाले आहेत. (ganehsraut) ==
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.
Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.