From Wikipedia, the free encyclopedia
पोप फ्रान्सिस (डिसेंबर १७, इ.स. १९३६:बुएनोस आइरेस, आर्जेन्टिना - ) हे एकविसाव्या शतकातील पोप आहेत. ते २६६वे[१] पोप आहेत ते अमेरिका खंडातून निवड झालेले सर्वप्रथम आणि पोप ग्रेगरी तिसऱ्यानंतर (इ.स. ७३१-७३४) पोपपदी येणारा पहिले युरोपाबाहेरचे पुरुष आहेत. पोप फ्रान्सिस यांचे मूळ नाव होर्हे मारियो बेर्गोलियो[२] होते.
पोप फ्रान्सिस | |
---|---|
जन्म नाव | होर्हे मारियो बेर्गोलियो |
पोप पदाची सुरवात | मार्च १३ २०१३ |
पोप पदाचा अंत | |
मागील | पोप बेनेडिक्ट सोळावा |
पुढील | सद्य |
जन्म | १७ डिसेंबर, १९३६ बुएनोस आइरेस, अर्जेंटिना |
फ्रान्सिस नाव असणारे इतर पोप | |
यादी |
२०२२ मध्ये पोप महाशयांनी कॅनडा या देशाला भेट दिली. त्यांनी स्थानिक लोकांची चर्च ने केलेल्या अत्याचारांबद्दल माफी मागितली.[३]
१८व्या शतकात कॅथलिक पाद्य्रांच्या डोक्यात कल्पना आली की, स्थानिक जमातींना कॅथलिक बनवून त्यांना त्यांची मूळ भाषा, चालीरिती, प्रथा-परंपरा, संस्कृती यांचा विसर पडला पाहिजे. अनेक ठिकाणी फक्त स्थानिक जमातीतल्या मुलामुलींसाठी निवासी शाळा उघडण्यात आल्या. सन १८८० पासून या उपक्रमाला सुरुवात झाली. या शाळांमध्ये स्थानिक जमातींची मुलं-मुली आई वडीलांपासून तोडली गेली. ही मुले जबरदस्तीने या ख्रिस्ती शाळांत भरती करण्यात आली. त्यांना त्यांच्या पद्धतीचे कपडे, वेशभूषा करण्यास मनाई होती. इतकंच काय, त्यांच्या भाषेत बोलण्यासही मनाई होती. अशी मनाई भारतातील ख्रिस्ती शाळांमध्ये आजही केलेली आढळून येते. निवासी शाळेतले गोरे पाद्री शिक्षक त्यांना गुलामाप्रमाणे स्वतःच्या खाजगी कामांसाठी राबवून घेत. निवासी शाळेत शिक्षकच लहान मुलांवर लैंगिक अत्याचार करत असत. कॅनडातल्या स्थानिक मुलांपैकी असंख्य मुलं अशा विविध अत्याचारांना बळी पडत राहिली. जर ही लहान मुले मरण पवली तर त्यांना गुपचुप दफन केले जात असे. आई वदीलांना याची कल्पनाही दिली जात नसे.. सन १८८० ते सुमारे १९७४ पर्यंत हे अनाचार चालत राहिले. १९७४ साली एका रस्त्याचे काम चालू असतांना अनेक लहान मुलांचे बेनामी सांगाडे सापडले. त्यातून या प्रकरणाला हळूहळू वाचा फुटत गेली. १९९० पर्यंत अनेक शाळांच्या परिसरात अशा अज्ञात दफनभूमी सापडत गेल्या. १९९७ साली या निवासी शाळा बंद करण्यात आल्या.[४]
पोपनी डॉक्ट्रीन ऑफ डिस्कव्हरी हा आदेश रद्द केलेला नाहे त्यामुळे ही वरवर असलेली मलमपट्टी आहे.[५] सोळाव्या शतकात पोप निकोलस पाच याने डॉक्ट्रीन ऑफ डिस्कव्हरी हा आदेश काढला. यानुसार नवनवीन प्रदेश शोधा, जिंका आणि तिथल्या लोकांना ख्रिश्चन करून सोडा असा आदेश पोप ने अनुयायांना दिला आहे. हा आदेश अजूनही रद्द केला गेले नाही. हा आदेश रद्द केला जावा अशी मागणी यावेळी केली गेली आहे.[६]
Seamless Wikipedia browsing. On steroids.