Remove ads
From Wikipedia, the free encyclopedia
प्रा. पुष्पा भावे (माहेरच्या पुष्पा सरकार; (२६ मार्च, १९३९; - ३ ऑक्टोबर २०२०)[१] ह्या एक स्त्री चळवळीच्या कार्यकर्त्या, समीक्षक, रंगभूमीच्या भाष्यकार आहेत. भावे यांचे साहित्य-समाज आणि राजकीय चळवळीतील योगदान महत्त्वपूर्ण आहे.
या लेखात सत्यापनासाठी अतिरिक्त संदर्भ किंवा स्रोतांची आवश्यकता आहे. कृपया विश्वसनीय संदर्भ जोडून हा लेख सुधारण्यात मदत करा. स्रोतहीन सामग्रीला आव्हान दिले जाऊ शकते आणि काढले सुद्धा जाऊ शकते. |
मराठी व संस्कृत हे विषय घेऊन त्यांनी मुंबईच्या एल्फिन्स्टन महाविद्यालयातून एम.ए. ची पदवी प्राप्त केली आणि मुंबईतच सिडनहॅम महाविद्यालयात त्या प्राध्यापक म्हणून रूजू झाल्या. त्यानंतर दयानंद कॉलेज, म.ल. डहाणूकर वाणिज्य महाविद्यालय आणि चिनॉय महाविद्यालय येथे त्यांनी मराठीचे अध्यापन केले आणि शेवटी रुईया कॉलेजमधून त्या निवृत्त झाल्या.[ संदर्भ हवा ]
त्या मराठीच्या प्राध्यापक आणि विद्यार्थिप्रिय शिक्षक होत्या. मराठी भाषा आणि मराठी नाटक हा त्यांच्या जिव्हाळ्याचा विषय. त्यांनी नाटकांविषती आणि एकूण नाट्यसृष्टीविषयी भरपूर लेखन केले आहे. अनेक गाजलेल्या नाटकांची त्यांनी केलेली समीक्षणेही गाजली आहेत.[ संदर्भ हवा ]
विद्यार्थिदशेपासून राष्ट्र सेवा दल आणि लोकशाहीवादी चळवळींशी पुष्पाताईंचा संपर्क होता. संयुक्त महाराष्ट्र आंदोलन, गोवामुक्ती आंदोलन अशा सत्याग्रहांमध्ये त्यांनी भाग घेतला होता.[ संदर्भ हवा ] स्वातंत्र्योत्तर काळात महागाईविरोधी आंदोलनामध्ये अहिल्या रांगणेकर आणि मृणाल गोरे यांच्यासमवेत पुष्पाताई या लाटणे मोर्चात हिरिरीने सहभागी झाल्या होत्या. मुंबईतील गिरणी कामगार संघर्ष समितीच्या चळवळीला वैचारिक मार्गदर्शन करण्यापासून कामगारांना हक्काचे घर मिळावे यासाठी सरकारशी संघर्ष करण्यात पुष्पाताई अग्रभागी होत्या.[ संदर्भ हवा ] स्त्रीवादी चळवळीची पाठराखण करणाऱ्या पुष्पाताईंनी दलित स्त्रियांच्या संघटनेमध्ये स्वतंत्र वैचारिक भूमिका घेत संघटन केले. अंधश्रद्धा निर्मूलन समितीमध्ये त्या आरंभापासून होत्या. डॉ. बाबा आढाव यांच्या असंघटित कामगार चळवळीत हमाल, रिक्षावाले, कागद-काच-पत्रा वेचणारे अशा कष्टकऱ्यांच्या आंदोलनांमध्ये त्या समर्थक राहिल्या. सामाजिक कृतज्ञता निधी या सामाजिक कार्यकर्त्यांना मानधन देणाऱ्या उपक्रमामध्ये पुष्पाताई सतत अग्रभागी असत.[ संदर्भ हवा ]
मराठवाडा विद्यापीठ नामांतर, मंडल आयोग अशा प्रश्नांवर झालेल्या चळवळींवर पुष्पाताईंचा वैचारिक ठसा होता.[ संदर्भ हवा ] आणीबाणीविरोधात लोकनेते जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखाली उभ्या राहिलेल्या संपूर्ण क्रांती आंदोलनातून जन्माला आलेल्या जनता पक्षाचे पुष्पाताईंनी तडफेने काम केले.[ संदर्भ हवा ]
साने गुरुजी राष्ट्रीय स्मारक निधी, अनुवाद सुविधा केंद्र, भारत-पाकिस्तान पीपल्स फोरम फॉर पीस अॅण्ड डेमॉक्रसी, मृणाल गोरे साऊथ एशियन सेंटर, केशव गोरे स्मारक ट्रस्ट, मानवी हक्कांसाठी काम करणारी मेहेर संस्था अशा विविध संस्था-संघटनांमध्ये पुष्पाताई पदाधिकारी आहेत.[ संदर्भ हवा ]
इ.स. २०१३ सालच्या साहित्य संमेलनाच्या व्यासपीठाला शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळ ठाकरे यांचे नाव देण्याला भावे यांनी उघडपणे विरोध केला होता.[ संदर्भ हवा ]
त्यांच्या मते, ”बाळासाहेबांनी साहित्य संमेलनाला ’बैलबाजार’ असा शब्द वापरला होता. पर्यायाने साहित्यिकांना बैल म्हटंले होते. त्यानंतर बाळ ठाकरे यांनी अनेक वेळा पु.ल. देशपांडे यांच्यावरही टीका केली होती. त्यांनी पु.ल.देशपांडे यांना `मोडका पुल` असे म्हणले होते. साहित्यिकांवर आणि साहित्य संमेलनावर नेहमीच टीका करणाऱ्या बाळ ठाकरे यांचे नाव व्यासपीठाला देणे योग्य नाही. त्यामुळे त्यांच्या स्मृती ज्यांना कोणाला जागवायच्या असतील त्यांनी वेगळ्या प्रकारे जागवाव्यात” असे म्हणतं ज्येष्ठ समीक्षिका प्रा. पुष्पा भावे यांनी बाळासाहेबांच्या नावाला थेटपणे विरोध दर्शविला होता.[ संदर्भ हवा ]
'अभिरुची : ग्रामीण आणि नागर' या गो.म. कुलकर्णी यांनी संपादित पुस्तकात पुष्पा भावे यांचा एक लेख आहे.[ संदर्भ हवा ]
'मराठी टीका' या वसंत दावतर यांनी संपादित केलेल्या पुस्तकातही भावेंचा लेख आहे. 'महात्मा फुले गौरव ग्रंथा'साठी त्यांनी लेखन केले आहे.
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.
Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.